Connect with us

business ideas

पोल्ट्री व्यवसाय माहिती Poultry Business Information in Marathi

Published

on

पोल्ट्री व्यवसाय माहिती

पोल्ट्री व्यवसाय माहिती : काय तुम्हाला पोल्ट्री व्यवसाय सुरु करायचा विचार करत आहात आज आम्ही आपल्यासाठी पोल्ट्री व्यवसाय माहिती घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो पोल्ट्री व्यवसाय सुरू करणे हे आजकालच्या काळामध्ये खूपच सोपे झालेले आहे

आपल्याला माहिती असल्यानंतर जर मित्रांना आपल्याला माहिती नसेल तर आपण पोल्ट्री व्यवसाय मध्ये नक्कीच तोटा घेऊ शकता. म्हणूनच आम्ही आपल्यासाठी पोल्ट्री व्यवसाय माहिती अगदी सविस्तर रीत्या घेऊन आलेलो आहोत.

कुकुटपालन माहिती मराठीमध्ये आम्ही आपल्यासाठी आणलेले आहे. यामध्ये आम्ही आपल्याला कोंबड्याचे प्रकार देखील सांगणार आहोत तसेच पोल्ट्री व्यवसाय सुरू केल्यानंतर पिल्लांच्या खाण्याची व्यवस्था कशी करावी हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया Poultry business information in marathi याबद्दल.

अनुक्रमणिका

पोल्ट्री व्यवसाय माहिती Poultry Business Information in Marathi

पोल्ट्री व्यवसाय कसा सुरु करावा

मित्रांनो, पोल्ट्री व्यवसाय या ग्रामीण भागांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जाणारा व्यवसाय आहे. आपण जर मुक्त गोठा मध्येच गाई म्हशी सोबत केला जाणारा असणारा पोल्ट्री व्यवसाय आहे.

यासाठी मित्रांनो आपल्याला वेगळे काही करण्याची गरज नाही देशी किंवा गावरान जातीच्या अतिशय काटक आणि उत्तम रोगप्रतिकारक क्षमता असणाऱ्या पिल्लांची निवड करणे गरजेचे असते.

तसेच पिल्ले रोग प्रतिकारक्षम असतात कुक्कुट पालन करताना असताना पिलांच्या जातींची निवड ही तुमच्या मार्केटच्या तसेच मार्केट साठी खूपच फायदेशीर असते.

कुकूटपालन व्यवसाय मध्ये अंडी आणि मांस हे उत्पादन आहे हे उद्दिष्ट खूपच मोठ्या प्रमाणावर कुकूटपालन व्यवसाय मध्ये असते.

कुकुट पालन म्हणजे नक्की काय

कुक्कुटपालन हा असा एक व्यवसाय ज्यामध्ये आपण जमिनीवर कोंबडीपालन करतो जेणेकरून आपण कोंबडीची अंडी आणि कोंबड्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये विकू शकतो. कुक्कुटपालनामध्ये आपल्याला कोंबडीची पिल्ले वाढवावी लागतात

यानंतर आपण कोंबडीची पिल्ले वाढवलेले अंडी आणि पिल्ले बाजार मध्ये विकू शकतो मांसाहारासाठी पाळल्या जाणाऱ्या कोंबड्यांना बॉयलर कोंबड्या असे म्हणतात काही ठिकाणी अंड्यांसाठी देखील कोंबड्यांना वाढवली जाते.

कुकुट पालना साठी आवश्यक असणारी माहिती

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये व्यवसाय कोणताही असो त्या व्यवसायाचे यश हे तुमच्या असणाऱ्या मेहनतीवर नेहमी अवलंबून असते जर मित्रांनो तुम्हाला कुकुट पालना बद्दल काही फारसे ज्ञान नसेल तर तुम्ही सर्वप्रथम त्याबद्दल कुकुट पालना बद्दल माहिती घेतली पाहिजे.

तसेच आपण जवळच असणाऱ्या पोल्ट्री फार्म ला तसेच पोल्ट्री फार्म च्या मालकांना भेटी दिल्या पाहिजेत. त्याचबरोबर आपण व्यवसाय पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय कसा सुरु करावा त्याचप्रमाणे बाजार मध्ये आपले सेल्समन कशा पद्धतीने पाठवावे याबद्दल देखील आपण माहिती गोळा करणे खूपच गरजेचे असते.

मित्रांनो जितकी तुमच्याकडे ज्यादा माहिती असेल तितकी तुमचे व्यवसाय मध्ये चांगली यशस्वी होण्यासाठी जिद्द ही खूपच मोठी असते. तसेच मित्रांनो आपल्याला जर पोल्ट्री फार्म बद्दल माहिती पाहिजे

असेल तर आपण इंटरनेटवर देखील शोधू शकता इंटरनेटवर तुम्हाला खूप काही माहिती पोल्ट्री फार्म बद्दल मिळेल तसेच तुम्हाला या लेखांमध्ये पोल्ट्री फार्म बद्दल सर्व माहिती देण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे.

कुक्कुट पालनातून उत्पन्न किती मिळते

मित्रांनो, आपण कोणता व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या व्यवसाय मधील असणारे खर्च आणि फायदा विषयी जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे असते.

अंडी आणि बॉयलर कोंबड्यांना वर्षभर मागणी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते अशा परिस्थितीमध्ये आपण जर बॉयलर कोंबड्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर हा व्यवसाय आपल्याला सर्वात फायदेशीर असा व्यवसाय आहे.

कुक्कुटपालन मधून आपल्याला मित्रांनो खूपच मोठ्या प्रमाणामध्ये उत्पन्न मिळत असते. आजकालच्या काळामध्ये तसेच येणाऱ्या काळामध्ये मटन खाण्याचे प्रमाण देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले आहे

म्हणूनच मित्रांनो आपण जर हेच विचार करून पोल्ट्री फार्मिंग चा व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर आपल्यासाठी ही एक खूपच महत्त्वाची बाब आहे. तसेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये या व्यवसायामध्ये यश हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळणार आहे. कुकुट पालना मधून उत्पन्नही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मिळत असते.

पोल्ट्री व्यवसाय माहिती


पोल्ट्री फार्मला खर्च किती येतो

मित्रांनो, पोल्ट्री फार्म व्यवसाय लहान प्रमाणा पासून खूपच मोठ्या प्रमाणावर उभारता येतो जर मित्रांनो तुम्हाला लहान प्रमाणामध्ये पोल्ट्री फार्म सुरू करायचा विचार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला पन्नास हजारांपासून ते दोन लाखांपर्यंत एवढा खर्च येऊ शकतो.

तुम्ही हळूहळू पोल्ट्री फार्म चा व्यवसाय देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढवू शकता तसेच मित्रांना पण उत्पन्न सर्व गुंतवणूक करून आपण आपला व्यवसाय खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढवू शकता

आणि या व्यवसाय मधून आपण खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवू शकता. मित्रांनो मध्यम आकाराचे पोल्ट्री फार्म उघडण्यासाठी आपल्या दीड ते तीन लाख रुपये खर्च येत असतो.

मित्रांनो हा खर्च आपण राष्ट्रीयीकृत बँकांमधून कर्ज घेऊन देखील पूर्ण करू शकतात यासाठी आपल्याला राष्ट्रीयीकृत बँक खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज देखील देत असतात.

आपल्याला जर माहित नसेल तर कुकुट पालना साठी कर्ज कसे घ्यायचे तर आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आम्ही आपल्यासाठी बँकेकडून कर्ज कशा पद्धतीने घेऊ शकतो हे आपल्याला नक्की सांगू.

कुकुट पालनासाठी बँकेकडून कर्ज कसे मिळते

मित्रांनो, आपल्याला जर पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला नाबार्ड करून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कर्ज मिळते. नाबार्डकडून आपल्याला कोणत्या व्यवसायासाठी 75 टक्के कर्ज मिळत असते तसेच यासाठी आपल्याला प्रशिक्षण आणि योग्य योजना देखील असणे आवश्यक असते.

तसेच आलिकडच्या काळामध्ये अनेक बँका देखील कुक्कुटपालनासाठी खूपच स्वस्त दरामध्ये कर्ज देत असतात. तुम्ही बँकांकडून अनुदानित कर्ज मिळवू शकता यासाठी तुम्हाला आधार कार्ड ची गरज लागेल तसेच आपल्या आयडी प्रूफ देखील पुरावा लागेल.

बँकांना आजकालच्या काळामध्ये कुकुट पालना विषयी संबंधित सर्व प्रकारची कर्ज जवळ प्रत्येक बँकेमध्ये उपलब्ध आहेत ही सर्व कर्जे कृषी स्वयंरोजगार अंतर्गत येत असतात.

पोल्ट्री व्यवसाय माहिती


कुक्कुटपालनासाठी तसेच पोल्ट्री फार्म साठी जागेची व्यवस्था

मित्रांनो, तुम्हाला पोल्ट्री फार्मिंग मध्ये कोणत्या कोंबड्या पाळायचे आहेत त्यानुसार तुम्हाला जमिनीची व्यवस्था तसेच जागेची व्यवस्था करावी लागेल. मित्रांनो एका कोंबडीसाठी 1ते अडीच चौरस फूट जमीन पुरेशी आहे यापेक्षा कमी असेल तर कोंबड्यांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अडचणी येऊ शकतात.

जर मित्रांनो तुम्हाला दीडशे कोंबड्या पोल्ट्री फार्मिंग साठी पाहिजे असतील तर तुम्हाला दीडशे ते दोनशे फूट जमीन लागेल तसेच मित्रांना पण जर पोल्ट्री फार्मिंग साठी शेड बांधण्याचा विचार करत असाल तर आपल्याला त्या ठिकाणची जागा स्वच्छ आणि मोकळी असावी.

तसेच जागा मोकळी पण सुरक्षित खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असावी. आजकालच्या काळामध्ये कोंबड्यांना खुली जागा असणे आवश्यक आहे. कारण कोंबड्यांना त्यातून मोकळे हवा मिळत राहील आणि भविष्यात त्यांना अनेक रोगांपासून कोंबड्या सुरक्षित राहतील.

कोंबड्यांच्या खाण्याची व्यवस्था कशी करावी

मित्रांनो, तुम्ही पोल्ट्री फार्मिंग साठी पिल्लांची देखी निवड केलेले आहे तसेच पिल्ले देखील आहेत तर तुम्हाला आता त्या पिल्लांना खाण्याची व्यवस्था करण्याची वेळ आलेली आहे.

मित्रांनो तुम्ही पिल्लांना अनेक प्रकारचे खाद्य देऊ शकता परंतु मित्रांनो तुम्हाला जर पिल्लांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढ पाहिजे असेल तर तुम्ही त्यांना फ्लेक्ससीड वगैरे खाण्यासाठी देऊ शकता हे दोन्ही अतिशय पौष्टिक आहेत आणि यांच्या वाढीसाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात.

या व्यतिरिक्त तुम्ही कोंबड्यांसाठी पिण्यासाठी पाण्याची व्यवस्था देखील करावी लागेल तसेच मित्रांनो कोंबड्यांना पिण्यासाठी पाणी हे स्वच्छ असले पाहिजे. त्याचप्रमाणे पाण्याचे भांडे देखील आपण स्वच्छ वेळोवेळी केले पाहिजे.

तसेच पिल्लांना रात्री खाण्यासाठी आहार दिला पाहिजे पोल्ट्री फार्मिंग मध्ये पिल्लांचे वजन हे खूपच महत्त्वाचे आहे. म्हणूनच मित्रांनो आपण पिल्लांच्या खाण्याकडे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष दिले पाहिजे.

कोंबड्यांचे प्रकार कोणकोणते आहेत

मित्रांनो, आपण जर कुकूटपालन व्यवसाय करण्याचा विचार करत असाल तर आपल्याला कुक्कुटपालनामध्ये कोणकोणत्या कोंबड्याचे प्रकार असतात हे देखील माहिती असणे गरजेचे आहे कुक्कुटपालनामध्ये कोंबड्यांच्या तीन प्रकार आहेत. त्यामध्ये लेयर चिकन, बॉयलर चिकन आणि देसी चिकन यांचा यामध्ये समावेश होत असतो.

अंडे मिळवण्यासाठी लेअर कोंबडी चा वापर केला जातो वयाच्या चार ते पाच महिन्याच्या नंतर ही कोंबडी अंडी घालू लागते यानंतर सुमारे एक वर्षापर्यंत ही कोंबडी अंडी घालते.

दुसरा प्रकार कोंबडीचा म्हणजे बॉयलर चिकन या कोंबडी चा वापर हा मटण खाण्यासाठी केला जातो या कोंबड्या इतर कोंबड्या च्या तुलनेमध्ये खूपच वेगाने वाढतात.

त्याच्यानंतर देशी कोंबडी या कोंबडी चा उपयोग अंडी आणि मांस दोन्ही मिळवण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. मित्रांनो तुम्हाला वरील प्रमाणे कोणते कोंबड्याचे प्रकार आपल्या कुक्कुटपालनामध्ये वाढवायचे आहेत हे जाणून घेतले पाहिजे.

पोल्ट्री व्यवसाय माहिती


कोंबड्यांसाठी असणारी बाजारपेठ

मित्रांनो, तुम्ही जर तुमच्या कुकुट पालनासाठी कोंबडी ची निवड केली असेल तर तुम्हाला तुमची पुढची पायरी म्हणजे त्या कोंबडी विकण्यासाठी बाजारपेठेची आवश्यकता असते.

मित्रांनो 35 ते 50 दिवसांमध्ये तुमचे असे कर्तव्य असते की ती कोंबडी किंवा अंडी विकण्यासाठी तुम्हाला बाजारपेठ शोधणे गरजेचे असते.

सर्वप्रथम तुम्ही स्थानिक बाजार मध्ये नेहमी लक्ष केंद्रित करा मित्रांनो तुमचे उत्पादन हे स्थानिक बाजार मध्ये विकले गेले तर तुम्हाला वाहतूक खर्च हा खूपच कमी येत असतो.

तसेच तुमचे उत्पादन सहजपणे ग्राहकांपर्यंत सुरक्षितपणे आपण पोहोचू शकता त्याच प्रमाणे मित्रांनो आपण आजूबाजूच्या बाजारपेठांमध्ये मटन आणि अंड्याचा वापर किती होतो हे देखील जाणून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

यामुळे तुम्हाला तुमच्या जवळच्या बाजारपेठेमधील अंड्याचा आणि मटन चा वापर हा किती होतो हे कळेल. मित्रांनो तुम्हाला जर अंडी आणि कोंबड्या विकायचे असतील तर तुम्ही स्थानिक बाजारपेठेमध्ये मटन शॉप आणि हॉटेल हे आपण पाहू शकता तसेच लोकांना किराणा दुकान मधून देखील अंडी देऊ शकता.

जर मित्रांनो तुमच्या कुक्कुटपालनामध्ये अंड्याची आणि त्यांची उत्पादन क्षमता ही खूपच मोठ्या प्रमाणात मध्ये होत असेल तर तुम्हाला याची विक्री करण्यासाठी शहरांमध्ये या अंडी आणि मांस विक्री करावी लागेल.

तुम्हाला एका अंड्याला चार ते पाच रुपये मिळू शकतात तसेच तुम्हाला मटन हे 75 ते 90 रुपये पर्यंत एक किलो ला भाव मिळू शकतो. कदाचित काही हंगामांमध्ये याचा भाव हा दीडशे ते दोनशे रुपयांपर्यंत देखील जातो.

मित्रांनो आपल्याला जर चांगल्या कोंबड्या असतील तर आपण त्या कोंबड्यांना चांगले अन्न देणे हे खूपच महत्त्वाचे आहे. पोल्ट्री फार्मिंग मध्ये कोंबड्याचे वजन अगदी खूपच महत्वाचा महत्त्वपूर्ण मुद्दा आहे.

पोल्ट्री व्यवसाय माहिती


पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय चे फायदे कोणकोणते आहेत

  • इतर असणारे अनेक बेरोजगारांना पोल्ट्री फार्म दोन वेगवेगळ्या प्रकारचे काम मिळत असते हादेखील पोल्ट्री फार्म चा खूपच मोठा फायदा आहे.
  • आजकालच्या काळामध्ये भारत देशामध्ये जवळजवळ सर्व प्रकारच्या दुग्ध व्यवसायामध्ये आणि कुक्कुटपालन व्यवसाय मध्ये उत्पादनही खूपच मोठ्या प्रमाणात मध्ये वापरले जातात त्यामुळे त्यांना त्याची मोठी अपेक्षा असते.
  • भारत देशामध्ये आजकालच्या काळामध्ये कुकुट पालन आणि दुग्ध व्यवसाय फार पद्धतशीरपणे होत नाही म्हणूनच भारत सरकार यांना प्रोत्साहन देण्यासाठी खूपच मोठ्या वेळेत विविध योजना तसेच शून्य टक्के व्याजदर देखील उपलब्ध करून देत आहे.
  • मित्रांनो, पोल्ट्री फार्मिंग हा असा व्यवसाय आहे तो आपण चांगल्या पद्धतीमध्ये चालवला तर एक वेळी आपण सर्व प्रकारची असणारी कर्ज फेडून एका चांगल्या कुकुट पालनाचा मालक देखील आपण बनू शकता.

मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन करण्याचे फायदे कोणकोणते आहेत

  1. मुक्त संचार पद्धतीने आपण जर कुकुट पालन केले तर आपले खर्च हा मजुरीवर खूपच कमी होतो. तसेच खाद्यावरील खर्च मध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बचत होत असते.
  2. मित्रांनो, सुधारित जातीच्या असणारे कोंबड्या नैसर्गिकच स्वतःचे खाद्य शोधून पोट भरू शकतात. कोंबड्या किडे , कोवळे गवत तसेच टाकाऊ अन्नपदार्थ खाऊन ह्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जगत असतात हा देखील मुक्त संचार पद्धतीचा खूपच महत्वपूर्ण असणारा फायदा आहे.
  3. मित्रांनो त्यांचा मुक्त संचार पद्धतीने कुक्कुटपालन केले असेल तर आपल्याला कोंबड्यांच्या निवाऱ्यासाठी फक्त रात्री ची गरज लागते त्यामुळे स्वच्छता करणे अत्यंत सोपे असते.

पोल्ट्री फार्मिंग साठी विशेष टीप

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये शहरी भागांमध्ये चांगल्या दर्जाची अंडी आणि चिकन कमी दरामध्ये उपलब्ध होत नाही त्यामुळे चांगली किंमत देऊन देखील चिकन खरेदी करायला लोक खूपच मोठ्या प्रमाणामध्ये तयार असतात.

तसेच शहरी भागांमध्ये ऑरगॅनिक म्हणजे नैसर्गिक रित्या हानिकारक औषधे केमिकल चा वापर न करता उत्पादन तयार केलेल्या आणला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे.

अशाप्रकारे आपण जर ऑरगॅनिक पद्धतीने कोंबड्यांचा वापर करून तसेच कोंबड्यांना अन्न देऊन तयार करत असाल तर आपल्याला शहरी भागांमध्ये या कोंबड्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये चांगला दर मिळू शकतो.

त्याचप्रमाणे आपल्याला जर शहरी भागांमध्ये कोंबड्यांसाठी चांगला दर पाहिजे असेल तर सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन डीमार्ट, रिलायन्स मार्ट यांसारख्या होलसेलर सोबत करार करण्याचा प्रयत्न देखील केला पाहिजे.

पोल्ट्री व्यवसाय माहिती Poultry Business Information in Marathi Conclusion

मित्रांनो, आपल्याला जर कुकुट पालन तसेच पोल्ट्री फार्मिंग करायचा असेल तसेच विचार करत असाल तर आपल्याला Poultry Business information in Marathi दिलेली माहिती आपल्याला पोल्ट्री फार्मिंग व्यवसाय मध्ये यशस्वी होण्यासाठी खूपच महत्वपूर्ण आहेत तसेच आपल्याला पोल्ट्री फार्मिंग मध्ये फायदा करून घ्यायचा असेल तर खूपच महत्वपूर्ण आहे.

तसेच आपल्याला जर पोल्ट्री फार्मिंग साठी कर्ज मिळत नसेल तर तसे देखील आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्ही आपल्यासाठी ती माहिती देखील लवकरात लवकर घेऊन येऊ.

तसेच मित्रांनो आपल्याला पोल्ट्री व्यवसाय माहिती दिलेली कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो.

Trending