Connect with us

Schemes

प्रधानमंत्री कृषी अनुदान योजना मराठीमध्ये । Pradhan Mantri Krishi Anudan Yojana in Marathi

Published

on

प्रधानमंत्री कृषी अनुदान योजना

प्रधानमंत्री कृषी अनुदान योजना: आपण जर शेती करत असाल तर आपल्यासाठी शेतीबरोबर सरकारचे योग्य अनुदान देखील शेतीसाठी खूपच महत्त्वाचे असते.

मित्रांनो शेती करण्यासाठी सरकारी अनुदानाची गरज ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. हेच लक्षात घेऊन आम्ही तुमच्यासाठी प्रधानमंत्री कृषी अनुदान योजना कोणकोणत्या या बद्दलची अगदी सविस्तर माहिती घेऊन आलेलो आहोत.

आपण जर यामध्ये दिलेली माहिती संपूर्णपणे लक्षात ठेवली तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला प्रधानमंत्री अनुदान योजनेमध्ये आपले नाव नक्कीच दिसेल चला तर मग जाणून घेऊया. प्रधानमंत्री कृषी अनुदान योजना कोणकोणत्या आहेत त्या.

प्रधानमंत्री कृषी अनुदान योजना मराठीमध्ये सर्व माहिती

मित्रांनो, प्रधानमंत्री कृषी अनुदान योजना ही योजना केंद्र पुरस्कृत कशी असणारी योजना आहे. यामध्ये केंद्र शासनाचा 60 टक्के सहभाग असतो तसेच राज्य शासनाचा 40 टक्के सहभाग असतो.

या योजनेमधून शेतकऱ्यांना विविध प्रकारच्या कृषी यांत्रिकीकरणासाठी अनुदान दिले जाते. यामध्ये ट्रॅक्टर, पावर टिलर, स्वयंचलित अवजारे, रोटावेटर, पलटी नांगर, पेरणी यंत्र, मळणी यंत्र, काढणी यंत्र अशाप्रकारे अनुदान दिले जाते.

तसेच मिनी राईस मिल, मिनी दाल मिल, पॅकिंग मशीन, ग्राइंडर यांसाठी देखील शेतकऱ्यांना अनुदान दिले जाते.

प्रधानमंत्री कृषी अनुदान योजनेमध्ये किती टक्के अनुदान मिळत असते

मित्रांनो, प्रधानमंत्री कृषी अनुदान योजनेमध्ये अल्पभूधारक अनुसूचित जाती जमाती महिला शेतकरी यांना 50 टक्के पर्यंत अनुदान मिळत असते.

तसेच इतर शेतकऱ्यांना 40 टक्के अनुदान मिळत असते. मित्रांनो मात्र राईस मिल पॅकिंग मशीन यांसारख्या बाबतीमध्ये 60 टक्के तर इतर लाभार्थी यांना 50 टक्के देखील अनुदान मिळत असते.

अनुदानासाठी जीएसटी रक्कम गृहीत धरण्यात येत नाही हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे. तसेच शेतकरी उत्पादक कंपनी तसेच शेतकरी गट यांना कृषी अवजारे बँक स्थापन करण्यासाठी 60 टक्के त्याचबरोबर 24 लाख रुपये पर्यंत अनुदान देखील मिळत असते.

प्रधानमंत्री कृषी अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणती

सातबारा
बँक पासबुक
आधार कार्ड
कोटेशन
जातीचा दाखला
परीक्षण अहवाल

अशा प्रकारचे कागदपत्रे प्रधानमंत्री कृषी अनुदान योजनेसाठी लागत असतात.

प्रधानमंत्री कृषी अनुदान योजनेसाठी लाभार्थी निवड कशा प्रकारे केली जाते

मित्रांनो, प्रधानमंत्री कृषी अनुदान योजनेसाठी संगणकीय प्रणाली द्वारे सर्व योजनांसाठी एकत्रितपणे ऑनलाईन सोडत देखील सोडले जाते.

निवड झालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या मोबाईलवर एसएमएस देखील येत असतो. ज्या लाभार्थ्यांची निवड झाली नाही आणि ते प्रतीक्षा यादीत आहेत अशा लाभार्थ्यांना पुढील वर्षी त्याच बाबतीसाठी लाभ घेण्यास इच्छुक असल्यास त्यांना महाडीबीटी पोर्टलवर मागील वर्षाचा अर्ज ग्राह्य धरण्याचा देखील पर्याय निवडाव लागत असतो.

तसेच त्यांना पुन्हा अर्ज करण्याची देखील आवश्यकता लागत नाही शेतकरी यांना अर्जाची व कागदपत्रांची ऑनलाइन छाननी करण्यात येत असते.

पात्र ठरलेल्या शेतकरी यांना सर्व संमती व आदेश ऑनलाईन देण्यात येत असतो. त्याबाबत sms शेतकरी यांच्या मोबाईलवर देखील पाठवला जात असतो.

शेतकरी यांना पूर्व संमती आदेश महाडीबीटी पोर्टलवर व त्यांच्या लॉगिन मध्ये देखील उपलब्ध होत असतो.

पूर्व संमती आदेश पाहण्यासाठी शेतकऱ्यांनी त्यांचा युजर आयडी व पासवर्ड टाकून देखील पाहू शकतात. त्याचप्रमाणे अर्जाच्या विविध टप्प्यावर लाभार्थी शेतकऱ्यांना sms देखील येत असतात.

प्रधानमंत्री कृषी अनुदान योजनेमध्ये लाभार्थी निवडीसाठी प्राधान्य आहे का

मित्रांनो, प्रधानमंत्री कृषी अनुदान योजनेसाठी लाभार्थी निवडीसाठी 30 टक्के निधी हा महिला खातेदारांसाठी असतो. तर तीन टक्के निधी हा दिव्यांग व्यक्तींसाठी आरक्षित असतो.

परंतु पुरेशा प्रमाणामध्ये अर्जदार आले नाहीत तर सदर निधी इतर खातेदार शेतकरी यांच्यासाठी वापरला जात असतो.

प्रधानमंत्री कृषी अनुदान योजनेसाठी अवजारे कुठून खरेदी करावे

मित्रांनो, प्रधानमंत्री कृषी अनुदान योजनेमध्ये पूर्वसंबंधी मिळाल्यानंतर लाभार्थ्यांनी खुल्या बाजारांमधील आपल्या पसंतीच्या अधिकृत विक्रेत्यांकडून यंत्रे अवजारे तसेच सर्व विविध मुदतीत खरेदी करणे आवश्यक असते.

विहित मुदतीत खरेदी केले नाही तर पूर्वसंबंधी रद्द होऊ देखील शकते. लाभार्थी यांना खरेदी करायची अवजारे केंद्रीय तपासणी संस्था किंवा केंद्र शासनाने मान्यता दिलेल्या संस्थांकडून तपासणी केली असणे बंधनकारक असते.

तसेच त्यांनाच अनुदान देय असते. यासाठी लाभार्थ्यांनी विक्रेते यांच्याकडून सदर यंत्र व अवजाराबाबत सक्षम संस्थेने दिलेले परीक्षण प्रमाणपत्राचा पुरावा सादर करणे देखील बंधनकारक असते.

अवजारे खरेदी करताना त्यावर परीक्षण अहवाल व मॉडेल क्रमांक दिलेला असतो याची खात्री करून अवजार खरेदी करावे.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिले प्रधानमंत्री कृषी अनुदान योजना याबद्दलची माहिती नक्कीच आपल्या उपयोगी पडणार आहे.

तसेच मित्रांनो आपल्याला प्रधानमंत्री कृषि अनुदान योजना याबद्दल लिहिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो प्रधानमंत्री कृषी अनुदान योजना याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापि विसरू नका.

Trending