Connect with us

Information

रेशन कार्ड माहिती मराठी Ration Card Information in Marathi

Published

on

रेशन कार्ड माहिती मराठी

रेशन कार्ड माहिती मराठी नमस्कार मित्रांनो आज आपण रेशन कार्ड माहिती मराठी याबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो प्रत्येकाच्या घरांमध्ये रेशनकार्ड असते तसेच आपल्या भारत देशात मध्ये प्रत्येक नागरिकाला रेशन कार्ड असणे हा देखील एक मुख्य अधिकार आहे.

आज आपण रेशन कार्डचे प्रकार हे कोणकोणत्या आहेत. तसेच रेशन कार्ड च्या सवलती कोणकोणते आहेत. तसेच रेशन कार्ड असण्याचे फायदे कोणकोणते आहेत याची देखील माहिती आज आपण जाणून घेऊया. चला तर मग रेशन कार्ड बद्दल माहिती सर्व जाणून घेऊया.

रेशन कार्ड माहिती मराठी Ration Card Information in Marathi

सर्वप्रथम मित्रांनो आपण पाहूया की रेशन कार्डचे फायदे कोणकोणते आहे. तसेच रेशन कार्डचे फायदे आपल्या कुटुंबाला कशा प्रकारे होतात हे देखील आज आपण जाणून घेऊया.

रेशन कार्डचे असणारे फायदे कोण कोणते आहेत

  • आपले असणारे रेशन कार्ड हे आपल्या ओळखीचा पुरावा तसेच आपण राहत असलेला पुरावा देखील मानला जाते.
  • आपल्याला भारत देशामध्ये कायदेशीर कागदपत्रे लागू करण्यासाठी रेशन कार्डचा फायदा हा होत असतो. रेशन कार्ड हे आपले रहिवासी प्रमाणपत्र म्हणून देखील एक प्रकारे ओळखले जाते.
  • जर आपल्याला टू व्हीलर फोर व्हीलर यांचे परवाना देखील काढायचा असेल तरी देखील आपल्याला रेशन कार्ड हे लागते. तसेच आपल्या ओळखीचा पुरावा म्हणून देखील रेशन कार्ड त्या ठिकाणी आपल्याला पाहिले जाते.
  • आपण आपल्या घरामध्ये वापरत असणारा गॅस या गॅस साठी नवीन कनेक्शन साठी आपल्याला रेशन कार्ड खूप महत्त्वाची भूमिका बजावत असते.
  • जर आपण आधार कार्ड काढले नसेल तर आपण रेशन कार्ड हा ओळखीचा पुरावा म्हणून देखील त्या ठिकाणी जोडू शकता.
  • रेशन कार्ड हे मुख्यपणे अनुदानामध्ये इंधन आणि खाद्यपदार्थ खरेदी करण्यासाठी वापरत असतात.

रेशन धारकांसाठी सरकारकडून असणाऱ्या खास सवलती कोणत्या

  1. जी पी आर द्वारे जोडल्या जाणार्‍या महिलांना सरकार कडून रेशन कार्ड प्रदान करण्याचा मुख्य निर्णय घेतला गेलेला आहे.
  2. कापूस गिरणी साखर कारखाने या ठिकाणी काम करत असलेल्या कामगारांना सरकारकडून तात्पुरते पिवळे रेशन कार्ड लाभ देण्याचा निर्णय देखील घेण्यात आलेला आहे.
  3. जर कोणी नवीन बालकाने एखाद्या कुटुंबामध्ये जन्म घेतला तर त्या बालकाचे नाव रेशन कार्ड मध्ये नोंद होणे अत्यंत गरजेचे असते.

रेशन कार्ड साठी असणारी पात्रता काय आहे

  • जर कोणी भारत देशांमध्ये विवाहित असेल तर त्याला त्यांच्या कुटुंबामध्ये रेशन कार्ड मध्ये नाव नोंदवण्याचा अधिकार आहे.
  • जर कोणी एका जागेवरून दुसर्‍या जागेवर कामा निमित्ताने तसेच काही कारणास्तव जात असेल तर त्याला नवीन जागेची नोंद करणे हे देखील आवश्यक आहे.

डिजिटल रेशन कार्ड चे फायदे काय आहेत

  1. हे सरकारचे नवीन तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानामुळे प्रत्येक व्यक्तीस योग्यरीतीने रेशन मिळेल तसेच स्वच्छ असे रेशन मिळेल.
  2. रेशन दुकानांमध्ये होणारी ग्राहकांची फसवणूक टाळण्यासाठी हे तंत्रज्ञान खूपच उपयोगी पडणार आहे. जर आपण आपल्या हाताचा अंगठा दिल्यानंतरच आपल्याला रेशन मिळणार आहे.
  3. ही प्रक्रिया पूर्णपणे बायोमेट्रिक पद्धतीने तयार केलेले आहे. ज्यामुळे रेशन दुकानदारांना काळाबाजार यामध्ये करता येणार नाही.

रेशन कार्ड चे कोणकोणते प्रकार पडत असतात

1) पिवळे रेशन कार्ड (Yellow ration card)

पिवळे रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना कमी किमतीमध्ये खाद्यतेल गहू तांदूळ हे मिळत असते. तसेच पिवळे रेशन कार्ड हे दारिद्र्यरेषेखालील असणाऱ्या कुटुंबांना मिळत असते.

2) केसरी रेशन कार्ड

केसरी रेशन कार्ड हे पंधरा हजारा पर्यंत तसेच पंधरा हजारांच्या वर वार्षिक उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना दिले जाते. तसेच एक लाखाहून कमी उत्पन्न असणाऱ्या कुटुंबांना केसरी रेशन कार्ड दिले जाते.

3) बीपीएल कार्ड (BPL card)

बीपीएल रेशन कार्ड हे दारिद्र रेषेखालील असणाऱ्या कुटुंबांना दिले जाते. ज्या कुटुंबाकडे जमीन नाही त्या कुटुंबांना हे रेशन कार्ड दिले जाते. बीपीएल रेशन कार्ड असणाऱ्या कुटुंबांना प्रतिमहा 35 किलो तांदूळ हा दोन रुपये दराने दिला जातो.

तसेच बीपीएल कार्ड असणाऱ्या कुटुंबांना गहू, तांदूळ, खाद्यतेल, मीठ, साखर हे देखील कमी किमतीमध्ये बीपीएल कार्डधारकांना पुरविली जाते. तसेच बँकांमार्फत कर्ज देखील कमी व्याजदरांमध्ये बीपीएल कार्डधारकांना पुरविली जाते.

4) पांढरे रेशन कार्ड

ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा अधिक आहे तसेच त्या कुटुंबाकडे चार चाकी वाहन आहे अशा कुटुंबांना पांढरे रेशन कार्ड दिले जाते. तसेच त्या कुटुंबाकडे चार हेक्टर पेक्षा अधिक जमीन सिंचनाखाली आहे अशा कुटुंबांना पांढरे रेशन कार्ड घेण्यास पात्र असतात.

रेशन कार्ड बद्दल कोणत्या गोष्टी माहित असणे गरजेचे आहे

  • भारत देशातील कोणत्याही रेशन कार्ड धारकाला तसेच महाराष्ट्र राज्यातील कोणते रेशन कार्ड धारकाला कोणत्याही राज्यांमधून तसेच कोणतेही गावांमधून रेशन घेण्याचा अधिकार आहे.
  • रेशन कार्ड हे स्वतःकडे ठेवण्याचा तसेच रेशन कार्ड रद्द करण्याचा अधिकार हा रेशन दुकानदारांना नाही.
  • रेशन दुकान हे साप्ताहिक सुट्टी वगळता सकाळी चार तास व संध्याकाळी चार तास उघडे असायला हवे.
  • रेशन दुकानांमध्ये सर्वांना पष्टपणे वाचता येईल तसेच दिसू शकतील अशा पद्धतीमध्ये फलक लावणे गरजेचे असते तसेच बंधनकारक देखील असते. या फलका मध्ये दुकानाचा नंबर दुकानाचे नाव तसेच धान्य वाटप हे नमूद करणे आवश्यक असते.

रेशन कार्ड मध्ये नाव वाढवण्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात

रेशन कार्ड मध्ये नवीन सदस्याचे नाव जोडण्यासाठी खालील प्रमाणे कागदपत्रे आवश्यक असतात.

  • आधार कार्ड
  • विवाह प्रमाणपत्र
  • जुन्या रेशन कार्ड मधुन नाव वगळण्याचा दाखला

अशी कागदपत्रे आपल्याला नवीन रेशन कार्ड मध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी लागत असतात.

रेशन कार्ड माहिती मराठी Ration Card Information in Marathi निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला रेशन कार्ड माहिती मराठी याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडले असेल. आम्ही वरील माहिती मध्ये रेशन कार्ड चे प्रकार कोणकोणते आहेत तसेच रेशन कार्ड असण्याचा फायदा हा आपल्यासाठी कशा प्रकारे होऊ शकतो याची देखील माहिती आपल्यासाठी आम्ही अगदी सविस्तर रीत्या घेऊन आलेलो आहोत तसेच दिलेली आहे.

मित्रांनो आपल्याला रेशन कार्ड बद्दल माहिती आणखी हवे असल्यास आपण रेशन कार्ड घर बसल्या कशा पद्धतीने काढू शकतात याबद्दल देखील आपल्याला माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

आम्ही आपल्याला घरबसल्या आपण रेशन कार्ड कशा पद्धतीने काढू शकतात हे देखील माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू . तसेच आपल्याला रेशन कार्ड माहिती मराठी याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

2 Comments

2 Comments

  1. Pingback: समृद्धी महामार्ग माहिती Samruddhi Highway Information (Latest)

  2. Pingback: कापसाची माहिती Cotton information in Marathi (100% New)

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending