Farmers Guide
चंदन झाडांची माहिती Sandalwood Trees in Marathi

चंदन झाडांची माहिती : नमस्कार मित्रांनो आज आपण या लेखांमध्ये चंदनाच्या झाडाची माहिती जाणून घेणार आहोत. प्रत्येकाने आपल्या आयुष्यामध्ये चंदनाचे झाड हे पाहिलेले आहे किंवा त्याचे नाव देखील ऐकले आहे. मित्रांनो चंदनाचे झाडे अत्यंत सुवासिक असते
बरेच लोक घरे सजवण्यासाठी चंदनाच्या लाकडाचा नेहमी वापर करतात. चंदनापासून अनेक प्रकारची उत्पादने बनवली जातात. त्यामध्ये अगरबत्ती धूप वगैरे पूजेच्या वस्तूचा देखील चंदनाच्या काड्या पासून बनवल्या जातात. मित्रांनो आजकालच्या काळामध्ये चंदन हे एक महाग असणारी वस्तू आहे
म्हणून चंदनाची तस्करी देखील केली जाते. आज आम्ही आपल्याला चंदन झाडाची माहिती अगदी सविस्तर रीत्या सांगितलेले आहे. चला तर मग जाणून घेऊया चंदन झाडाची माहिती काय आहे ती.
अनुक्रमणिका
चंदन झाडांची माहिती Sandalwood Trees in Marathi
चंदन झाड म्हणजे नक्की काय असते
चंदन ही एक मित्रांनो औषधी वनस्पती आहे. चंदन हे सुवासिक आणि थंड असल्यामुळे लोकांना ते नेहमी आनंद देत असते म्हणूनच त्याला चंदन असे म्हणतात.
चंदनाचे झाडे हिरव्या रंगाचे असते तसेच चंदनाचे झाडे दहा मीटरपर्यंत उंच असते. चंदनाच्या झाडाच्या फांद्या वाकलेले असतात चंदनाच्या झाडाची साल ही लाल रंगाची किंवा तपकिरी रंगाचे असते.
चंदनाचे फुलेही तपकिरी रंगाचे असतात चंदनाच्या बिया या कठोर लंबवर्तुळ आणि गोलाकार असतात. चंदन हे सहसा 20 वर्षांनंतरच वाढतात चंदनाच्या झाडाचा असणारा अंतर्गत भाग हा हलका पिवळा आणि सुवासिक असतो. वयाच्या 40 ते 60 वर्षानंतर चंदनाचे झाड अगदी सुगंधित होत असते.
चंदनाच्या झाडाला जून ते सप्टेंबर या महिन्यांमध्ये फुलं येत असतात तसेच नोव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यांमध्ये चंदनाच्या झाडाला फळे येत असतात.
चंदनाच्या झाडाचा उपयोग कशाकशासाठी होतो
चंदनाचे झाडाचा उपयोगात चंदनाच्या झाडाच्या मूल्यवान तेल काढण्यासाठी केला जातो चंदनाचे मौल्यवान झाड हे मध्यभागातून तेल देत असते . तसेच चंदनाच्या झाडाचा मूल्य हे पन्नास ते साठ वर्षाहून अधिक झाल्यानंतर जास्त होत असते.
चंदनाच्या झाडा पासून साबण, सौंदर्यप्रसाधने, मेणबत्या, धूप, औषध, परफ्यूम बनवण्यासाठी चंदनाच्या झाडाची पावडर वापरली जाते. तसेच त्वचेचे आरोग्य सुधारण्यासाठी चंदनाच्या झाडाच्या तेलाचा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जातो.
आजकालच्या काळामध्ये बौद्ध हिंदू ख्रिश्चन आणि इस्लाम यांचा अनेक धार्मिक समाजामध्ये चंदनाच्या तेलाचे मूल्य खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. प्राचीन काळापासून अत्तर बनवण्यात चंदनाचे तेल हे प्रमुख घटक आहे. अशाप्रकारे चंदनाच्या झाडाचा उपयोग हा केला जातो.

चंदनाचे झाडाचे आरोग्यासाठी असणारे फायदे
मित्रांनो, चंदनाचे तेल हे आरोग्यवर्धक तेल आहे जे कोरडी त्वचा, सुरकुत्या पडणे यांसारख्या त्वचेवरील आजारावर खूपच मदत करत असते. त्याचप्रमाणे आपल्या त्वचेवर असणारे मुरूम, काळे डाग, लालसरपणा आणि त्वचेवर जळजळ होण्याची शक्यता असणाऱ्यांसाठी चंदनाचे तेल हे खूपच आरोग्यदायी आणि फायदेशीर असते.
चंदनाचे तेल हे त्वचेच्या पेशी तसेच पेशी सुधारण्यासाठी मदत करत असते. तसेच त्वचेचा रंग देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढ होत असते. त्वचेचे सौंदर्य आणि चमक सुधारण्यासाठी चंदन पावडर तसेच सर्व प्रकारच्या त्वचेसाठी चांगले काम करत असते. चंदनाचे तेल देखील केस समस्या साठी खूपच महत्वपूर्ण असते डोक्यातील कोंडा घालवण्यासाठी चंदनाचे तेल हे खूपच गुणकारी आहे.
तसेच केसांची चमक वाढवण्यासाठी चंदनाचे तेल हे खूपच फायदेशीर ठरते. चंदनाच्या तेलाने रोगप्रतिकारक शक्तीला चालना मिळत असते. तसेच आपल्या शरीर हे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास नेहमी मदत करत असते.
चंदनाचे तेल हे पांढऱ्या पेशींचे उत्पादन उत्तेजित नेहमी करत असते. तसेच आपल्या शरीरामधील रोग प्रतिकार शक्ती नेहमी वाढवते आणि आपल्याला अनेक रोगांपासून दूर ठेवत असते.

चंदनाचे झाडाचे असणारे आयुर्वेदिक उपयोग
मित्रांनो, चंदनाच्या झाडाला वैदिक पुस्तकांमध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व आहे. चंदनाचे झाड हे भगवान इंद्राच्या नावावर नेहमी ठेवलेले आहे कारण ते संपूर्ण स्वर्गामध्ये नेहमी सुगंध पसरवत असते. देवीचे निवासस्थान शुद्ध करण्यासाठी तसेच पवित्र विधींमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चंदन वापरले जाते.
चंदनाच्या तेलाच्या साबणात नैसर्गिक प्रतीची व्यथा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते. तसेच चंदनाचे तेलामध्ये गुणधर्म खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असतात. चंदनाचे तेल हे शरीराच्या तीन दोषांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये बरे करते.
त्यामध्ये वात उपचार चंदनाचे तेल करत असते. पित्तावर चंदनाचे तेल काम करत असते. तसेच आपले शरीर हे नेहमी संतुलित ठेवण्याचे काम चंदनाचे तेल करत असते.

चंदनाचे झाडाचे असणारे दुष्परिणाम
चंदनाचे पावडर आणि चंदनाचे तेल हे शिफारस केलेल्या मात्रेमध्ये नेहमी सुरक्षित मानले जाते. तथापि आपण जर त्या मात्रेमध्ये कमी-जास्त करत असाल तर आपल्याला याचे दुष्परिणाम आढळत असतात. जसे की त्वचारोग खाज सुटणे वाचन समस्या इत्यादी चंदनाचे दुष्परिणाम असू शकतात.

चंदन शेती साठी असणारे अनुदान
मित्रांनो, भारत देशामध्ये अनेक प्रकारच्या बँक उपलब्ध आहेत ज्या शेतकऱ्यांनी नेहमी चंदन वृक्ष लागवडीसाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान आणि कर्जाची सुविधा नेहमी पुरवत असतात. मित्रांनो तुम्ही अधिक वर्तमान अनुदानासाठी तसेच कर्जाच्या माहितीसाठी तुम्ही तुमच्या जवळच असणाऱ्या बँकांची थेट संपर्क साधू शकता.
चंदन झाडाची माहिती Sandalwood Trees in Marathi Conclusion
मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली चंदन झाडाची माहिती नक्कीच आवडली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो वरील प्रमाणे दिलेले आपल्याला चंदन झाडाची माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
आम्ही नेहमी आपल्यासाठी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. तसेच आपल्याला चंदन झाडाची माहिती याबद्दल काही शंका असतील ते देखील आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा.
-
business ideas9 months ago
लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी Laghu Udyog Project Information in Marathi
-
Schemes10 months ago
जिल्हा उद्योग केंद्र योजना District Industries Centre Scheme in marathi
-
Information6 months ago
अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती महाराष्ट्र
-
Information6 months ago
डोमासाईल प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे, Domicile Certificate Documents Marathi, डोमेसाइल प्रमाणपत्र कसे काढाल
-
Information7 months ago
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय | Disaster Management in Marathi, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005
-
business ideas11 months ago
किराणा दुकान माहिती मराठी Grocery Store Information in Marathi
-
business ideas8 months ago
व्यवसाय कोणता करावा । नवीन व्यवसाय कोणता करावा । ग्रामीण भागात सुरु होणारे व्यवसाय
-
business ideas12 months ago
महिला बचत गटाचे फायदे Mahila Bachat Gat Benefits in Marathi