Connect with us

business ideas

ससे पालन माहिती Sase Palan Mahiti in Marathi

Published

on

ससे पालन माहिती

ससे पालन माहिती: मित्रांनो, आपल्याला जर एक व्यवसाय सुरू करायचा असेल तर आज आम्ही आपल्यासाठी असा सुंदर असा व्यवसाय घेऊन आलेला आहोत. ससे पालन हा एक व्यवसाय आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा ठरणार आहे.

ससे पालन मधून आपण लाखोचे उत्पादन मिळवू शकता. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया ससे पालन याबद्दलचे अगदी सविस्तर माहिती. जेणेकरून आपल्याला ससे पालन व्यवसाय मधून कसा जास्तीत जास्त फायदा होईल याची माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

ससे पालन माहिती मराठीमध्ये Information on raising rabbits in Marathi

मित्रांनो, ससे पालन व्यवसाय आपण का सुरू करावा तसेच ससे पालन हा व्यवसाय शेतकऱ्यांसाठी जोडधंदा म्हणून कसा उपयोगी पडेल याबद्दलची अगदी सविस्तर माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

मित्रांनो गेल्या काही दिवसांपासून तसेच काही वर्षांपासून ससे पालन हा व्यवसाय बंदिस्त पद्धतीने केला जात आहे. ससे पालन करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे मांस. सध्या शेतीतून मिळणारे कमी उत्पन्न, त्याचप्रमाणे बाजार भाव समस्या, तसेच बदलते असणारे हवामान यामुळे शेतीचे नियोजन करणे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कठीण होत आहे.

अशा सर्व गोष्टींचा विचार करता शेतीबरोबर आणखी काहीतरी जोडधंदा करणे ही एक आजकालच्या काळामध्ये काळाची गरज बनलेली आहे. ससे पालन हा अत्यंत कमी जागेमध्ये आणि कमी भांडवलामध्ये सुरू होणारा खूपच चांगला व्यवसाय आहे.

आपण ससे पालन का करावे

1) मित्रांनो ससे पालन मधून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत मिळत असतो.

2) भारत देशामध्ये सशाच्या मांस ला सतत असणारी मागणी ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

3) ससे पालन हा कमी खर्चामध्ये आपण व्यवसाय सुरू करू शकता.

4) ससे पालन हा शेतीबरोबर आणखी एक जोडधंदा म्हणून देखील आपण हा व्यवसाय सुरू करू शकतात.

ससे पालन करून कुटुंबासाठी प्रथिनियुक्त मांससाचे उत्पादन करता येते. मित्रांनो सशांचा आहार म्हणून सहजपणे उपलब्ध असणारा पाला, टाकून दिलेला भाजीपाला, तसेच घरात उपलब्ध असलेले धान्य इत्यादीचा वापर करता येतो.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये बॉयलर सशांचा वाढीचा वेग हा खूपच जास्त आहे. तीन महिन्याचे सशाचे पिल्लू सुमारे दोन किलोग्रॅम एवढे वजनाचे असते.

ससे पालन व्यवसायाचे महत्व

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये वाढत्या लोकसंख्येला मासाची आवश्यकता खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेले असून देशांतर्गत मांस उत्पादन कमी पडत आहे.

ढोबळमानाने देशांमध्ये मांस उत्पादन आणखी चार ते पाच पटीने वाढण्याची आवश्यकता आहे. मित्रांनो कमी पडत असलेल्या मटणाची गरज भागवण्याकरता कमीत कमी वेळेमध्ये जास्त मटण उत्पादन करणारे प्राणी व भारतासारख्या विकसनशील देशांमध्ये अन्नाची स्पर्धा न करता जगणारी प्राणी म्हणजे ससा हा अत्यंत उपयुक्त असा आहे.

ससेच्या दोन पिढीतील अंतर सहा ते आठ महिने असते. व एका वेळेस ससेची मादी पाच ते दहा किंवा त्यापेक्षा जास्त पिल्ले देत असते. तसेच ससेच्या मटणाला एक विशिष्ट प्रकारची चव असून हे मटन रुचकर असल्यामुळे भारत देशामध्ये याला मागणी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

ससे पालन माहिती

सशाच्या जाती

1) न्यूझीलंड ब्लॅक

2) न्यूझीलंड वाईट

3) ग्रे व्हाईट

4) रशियन ससा

सशाच्या आहाराचे नियोजन आपण कसे कराल

1) मित्रांनो, ससा हा पूर्णपणे शाकाहारी प्राणी आहे.

2) मित्रांनो, आपण सशाला पालेभाज्या तसेच लसुन, घास, कोबी, पालक इत्यादी भाज्या खायला देऊ शकता.

3) बाजार मध्ये अनेक प्रकारच्या सप्लीमेंट आलेले आहेत यादेखील आपण ससा ला देऊ शकता.

4) प्रत्येक सशाला रोजच्या रोज स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध करून द्यावे.

ससे पालन माहिती

ससे पालनातून आर्थिक फायदा किती होतो.

1) मित्रांनो, सशाचे एक युनिट म्हणजे चार नर आणि सहा मादी होय.

2) मित्रांनो, यापासून आपल्याला सरासरी 100 ते 130 पर्यंत पिल्ले मिळतात.

3) ससे पालनातून अनेक प्रकारचे उत्पन्न आपण मिळू शकता.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली ससे पालन माहिती याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला ससे पालन याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा.

तसेच मित्रांनो ससे पालन याबद्दलची दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending