Connect with us

Information

स्कॉलरशिपसाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे । Scholarship Form Document in Marathi

Published

on

Scholarship form document in Marathi

Scholarship form document in Marathi: स्कॉलरशिप एक शैक्षणिक दृष्ट्या एक आर्थिक मदत असते जी आर्थिक दृष्ट्या मागास विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणासाठी दिले जात असते.

आज आपण स्कॉलरशिप फॉर्म साठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊ या स्कॉलरशिप फॉर्म साठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत त्याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

Scholarship Form Document in Marathi स्कॉलरशिप फॉर्म साठी लागणारी कागदपत्रे

विद्यार्थी मित्रांनो आपल्याला जर कॉलरशिप मिळवायचे असेल तर संबंधित कॉलरशिप योजनेद्वारे आवश्यक केलेल्या कागदपत्रांची आपण पूर्तता करणे खूपच गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊया कोणकोणती कागदपत्रे लागतात स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी.

1) ओळखीचा पुरावा

यामध्ये विद्यार्थ्यांची ओळख सिद्ध करण्यासाठी ओळखीचा पुरावा लागत असतो. ओळखीचा पुरावा म्हणून विद्यार्थी मित्रहो आपण आधार कार्ड हे सादर करू शकता.

2) पत्त्याचा पुरावा

पुरावा सिद्ध करण्यासाठी विद्यार्थी हे निवासी पत्ता सिद्ध करण्यासाठी रेशन कार्ड, आधार कार्ड हे सादर करू शकतात.

3) शिक्षणाचा पुरावा

विद्यार्थ्यांसाठी शिक्षण सिद्ध करण्यासाठी शिक्षणाचा पुरावा आवश्यक असतो. शिक्षणाचा पुरावा म्हणून विद्यार्थी शाळा सोडल्याचा दाखला तसेच बोनाफाईट मार्कलिस्ट डिप्लोमा याबद्दलचे कागदपत्रे सादर करू शकतात.

4) आर्थिक परिस्थितीचा पुरावा

विद्यार्थ्यांनी आपली आर्थिक परिस्थिती सिद्ध करण्यासाठी आर्थिक परिस्थितीचा पुरावा देणे आवश्यक आहे. आर्थिक परिस्थितीचा पुरावा म्हणून आपण उत्पन्नाचा दाखला तसेच पालकांच्या उत्पन्नाचा दाखला तसेच गरिबी रेषेखालील असलेल्या दाखला यापैकी कोणते एक कागदपत्र सादर करणे आवश्यक असते.

5) अन्य इतर कागदपत्रे

स्कॉलरशिप योजनेनुसार इतर काही कागदपत्रे देखील आपल्याला जोडणे आवश्यक असू शकतात. उदाहरणार्थ काही स्कॉलरशिप योजनेसाठी जात प्रमाणपत्र हे देखील आवश्यक असते.

Scholarship form document in Marathi

स्कॉलरशिप साठी आवश्यक कागदपत्रे जमा करताना घ्यायची काळजी

1) आपण सादर करत असलेली सर्व कागदपत्रे ही पूर्णपणे भरलेली आणि सही केलेली असावी.

2) कागदपत्रावर संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असणे आवश्यक आहे.

3) कागदपत्राचे स्कॅन केलेले तसेच स्कॉलरशिप योजनेद्वारे आवश्यक असल्यास ते देखील सादर करावे.

4) अर्ज करण्याची अंतिम तारीख लक्षात ठेवणे गरजेचे असते.

5) आपण अर्जाचा नमुना फॉर्म काळजीपूर्वक भरला पाहिजे.

6) अर्जाची फी वेळेवर जमा केली पाहिजे.

स्कॉलरशिप साठी आवश्यक कागदपत्रे वेळेवर जमा करणे खूपच गरजेचे असते स्कॉलरशिप योजनेद्वारे निर्धारित केलेल्या मुदतीतच आपण कागदपत्रे जमा करावी. असे न केल्यास आपला अर्ज अर्धवट समजला जातो आणि अर्ज देखील रद्द केला जातो काही वेळा.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी लागणारी कागदपत्रे याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला स्कॉलरशिप फॉर्म भरण्यासाठी दिलेली माहिती कशी वाटली ते आपण मला कमेंट द्वारे नक्की कळवा तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिहि विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending