Connect with us

Farmers Guide

सेंद्रिय खत प्रकल्प माहिती Sendriya Khat Project in Marathi

Published

on

सेंद्रिय-खत-प्रकल्प-माहिती

नमस्कार मित्रांनो आज आपण सेंद्रिय खत प्रकल्प माहिती याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो आपण जर शेती करत असाल तर आपल्यासाठी ही माहिती खूपच महत्वपूर्ण आहे.  तसेच आजकालच्या शाळांमध्ये प्रकल्पासाठी देखील ही माहिती खूपच मोठ्या प्रमाणामध्ये विचारली जाते म्हणूनच मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी ही माहिती घेऊन आलेलो आहोत.

मित्रांनो नेहमी वर्षानुवर्षे जमिनीमध्ये घेत असलेल्या पिकांमुळे जमीन ही अधिक उत्पादन देणाऱ्या पिकांच्या नवीन वाणा  मुळे जमिनीतील सर्वत्र अन्नद्रव्यांचा साठा हा दिवसेंदिवस खूपच कमी होत चाललेला आहे.

जमिनीमध्ये असणाऱ्या अन्नद्रव्यांचे योग्य प्रमाण ठेवण्यासाठी आपण नेहमी एकात्मिक खतांचा संतुलित वापर करणे आवश्‍यक आहे यामुळे जमिनीमधील अन्न द्रवांचे प्रमाण योग्य राहील.

सेंद्रिय खत प्रकल्प माहिती Sendriya Khat Project in Marathi

सेंद्रिय खते म्हणजे काय

मित्रांनो वनस्पती आणि प्राणी यांच्या अवशेषांपासून जे खते तयार होतात किंवा खते  मिळत असतात त्या खतांना सेंद्रिय खते असे म्हणतात.  या सेंद्रिय खतांचे प्रामुख्याने दोन प्रकार पडत असतात त्यामध्ये पहिला प्रकार हा भरखते आणि दुसरा प्रकार हा जोरखते होय.

भरखते

भर खतांमध्ये पोषण द्रव्याचे प्रमाण हे कमी असल्यामुळे भर खते ही रासायनिक खतांपेक्षा नेहमी मोठ्या प्रमाणामध्ये वापरावी लागत असतात तसेच भर खते ही पिकांना सावकाशपणे लागू पडत असतात.

मित्रांनो आपण जर शेतीमध्ये भर  खते ही मोठ्या प्रमाणामध्ये वापरली तर जमिनीच्या प्राकृतिक गुणधर्मांमध्ये नेहमी सुधारणा होत असते.  त्यामुळे जमिनीचा पोत हा नेहमी सुधारत असतो.  त्याचप्रमाणे जलधारणशक्ती देखील जमिनीची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते.  रासायनिक खतांचा कार्यक्षम वापर होण्यास नेहमी मदत होत असते.

जोर खते

मित्रांनो जोर खतांमध्ये पोषण द्रव्याचे प्रमाण हे अधिक प्रमाणामध्ये असते त्यामुळे जोर खते ही कमी प्रमाणामध्ये पिकांना द्यावी लागतात जोर खते ही उदाहरणार्थ सर्व प्रकारच्या पेंडी मासळी खत यामधून तयार होतो.

सेंद्रिय शेतीचे फायदे व तोटे 

1) सेंद्रिय खताचे फायदे

  • सेंद्रिय खतामुळे जमिनीची रचना आणि जमिनीचा पोत सुधारत असतो.
  • सेंद्रिय खतामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा योग्य प्रमाणामध्ये राहत असतो.
  • सेंद्रिय खतामुळे जमीन ही भुसभुशीत होत असते त्यामुळे हवा खेळती राहते.
  • सेंद्रिय खतामुळे जमिनीमध्ये असणाऱ्या सूक्ष्म जिवाणूंची वाढ होत असते.
  • सेंद्रिय खतामुळे पिकांचा जोम वाढत असतो.
    सेंद्रिय खत प्रकल्प माहिती


2) सेंद्रिय खताचे तोटे

  • सेंद्रिय खत हे नेहमी खर्चिक व वेळखाऊ पद्धतीने मध्ये असते, सेंद्रिय खतास मजुरी जास्त लागत असते.
  • जमिनीच्या मशागती साठी जास्त खर्च लागतो.
  • पीक थोडे उशिरा मिळते.
  • पिक काही वेळा दिसाय चांगले नसते, परंतु पिकाची चव ही खूपच चांगली असते.
    सेंद्रिय खत प्रकल्प माहिती

सेंद्रिय खत प्रकल्प माहिती Sendriya Khat Project in Marathi  निष्कर्ष

मित्रांनो आपल्याला सेंद्रिय खत प्रकल्प माहिती वरील प्रमाणे दिलेले आहे . आपल्याला वरीलप्रमाणे दिलेली माहिती खूपच महत्वपूर्ण आणि उपयोगी पडणार आहे म्हणूनच मित्रांनो आपण जर ही माहिती आपल्या जीवनामध्ये खूपच उपयोगी पडणार आहे .

आपल्याला सेंद्रिय खत प्रकल्प माहिती या बद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे .  आपल्याला सेंद्रिय खत प्रकल्प माहिती या बद्दल आणखी माहिती हवी असल्यास आपण आम्हाला नक्कीच कंमेंट बॉक्स मध्ये सांगा . आम्ही आपल्यासाठी ती माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू .

Trending