Connect with us

business ideas

शिवणकाम उद्योग कसा सुरु करावा । Sewing Business Information in Marathi

Published

on

शिवणकाम उद्योग कसा सुरु करावा

शिवणकाम उद्योग कसा सुरु करावा: मित्रांनो, आज आपण शिवणकाम उद्योगाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. शिवणकाम उद्योग म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कपडे शिवून ते विकणे तसेच वेगवेगळ्या फॅशनचे कपडे तयार करून ते विकणे आणि त्यापासून मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवणे असे या उद्योग व्यवसायाचे उद्दिष्ट आहे. मित्रांनो चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया शिवणकाम उद्योग याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

शिवणकाम उद्योग व्यवसाय माहिती मराठी मध्ये Sewing Business Information in Marathi

मित्रांनो, तुम्हाला चांगल्या प्रकारचे कपडे आणि ॲट्रॅक्टिव्ह डिझाईन प्रमाणे शिवणकाम करता येत असेल तर तुम्हाला हा व्यवसाय खूपच महत्त्वपूर्ण असणारा व्यवसाय आहे.

मित्रांनो शिवणकाम हा उद्योग तुम्ही घरच्या घरी देखील सुरू करू शकता. त्यासाठी तुम्हाला फक्त मशीन घेण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे धागे, सुई, वगैरे देखील साहित्य लागत असते. सुरुवातीला तुम्ही शिवणकाम करून घरातील कपडे देखील शिव शकता.

त्यानंतर तुम्ही तुमच्या ओळखीचे आजूबाजूच्या लोकांची देखील कपडे शिवण्यासाठी घेऊ शकता. तुम्ही मित्रांनो नवीन कपडे शिवून किंवा जुनी कपडे उसवलेले शिवून देऊन सुद्धा यामधून खूपच चांगल्या प्रकारे नफा कमवू शकता.

मित्रांनो आजकाल रेडिमेड, ब्लाऊज रेडीमेड साडी सुद्धा तयार केली जात आहे. त्याचबरोबर तुम्ही छोट्या छोट्या बाजारासाठी लागणारे पिशव्या बटवे सुद्धा तयार करून नफा मिळवू शकता. शिवणकाम करून नफा मिळवण्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये आजकालच्या काळामध्ये संधी देखील उपलब्ध आहेत.

शिवणकाम करणाऱ्या मशीन ची किंमत किती असते

शिवणकामासाठी लागणारे मशीन ची किंमत ही साधारणपणे पंधरा हजार रुपये पर्यंत असते. जर आपण जर ऑटोमॅटिक मशीन घेतली तर ती थोडी महाग देखील पडू शकते.

परंतु आजकालच्या काळामध्ये खूपच चांगल्या ब्रँडच्या मशीन दहा हजार रुपये पर्यंत आपण सहजपणे खरेदी करू शकता.

मशीन सोबत आपल्याला धागे, कात्री, सुया, टेप, बटन्स हे देखील फ्री मध्ये मिळू शकते. पहिल्यांदा आपण कोण कोणत्या गोष्टी शिवणकाम व्यवसाय मधून करू शकता याची यादी आपण जाणून घेऊया.

शिवणकाम व्यवसाय मध्ये तुम्ही काय शिवू शकता

1) मित्रांनो, तुम्हाला जर एकाच गोष्टींमध्ये वेगवेगळ्या व्हरायटी करून त्यामध्येच तुम्हाला स्पेशल व्हायचे असेल तर तुम्हाला सर्वात जास्त चांगले शिवणकाम करता यायला पाहिजे. यासाठी तुम्ही तुमच्या कलेप्रमाणे वेगवेगळ्या डिझाईन देखील तयार करून विकू शकता.

2) मित्रांनो, तुम्ही जर प्रोफेशनली कोर्स करून शिवणकाम शिकला तर तुम्ही सर्व प्रकारचे कपडे शिवून तुमचा उद्योग देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये सुरू करू शकता. यामध्ये ब्लाउज, पेटिकोट, कृती, छोट्या पिशव्या इत्यादींचा देखील समावेश होत असतो.

3) मित्रांनो, काही लोकांना फंक्शन साठी किंवा एखाद्या फेस्टिवल साठी भाडेतत्त्वावर नेहमी कपडे लागत असतात. तुम्ही तशी कपडे सुद्धा बनवून भाडेतत्त्वावर देखील देऊ शकता.

4) मित्रांनो, तुम्ही ऋतूप्रमाणे लागणारे कपडे देखील विकायला ठेवू शकता.

5) मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये शाळेचा गणवेश बनवण्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी असते. तुम्ही शाळेमध्ये जाऊन गणवेशासाठी चांगली मोठी ऑर्डर देखील घेऊ शकता हे देखील आपल्यासाठी खूपच मोठा उद्योग बनू शकतो.

6) मित्रांनो, साडीला पिको फॉल करण्यासाठी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कस्टमर मिळत असतात. हे सुद्धा काम करून तुम्ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये इन्कम करू शकता.

7) मित्रांनो, तुम्ही छोट्या छोट्या तसेच लहान वेगवेगळ्या प्रकारच्या असणाऱ्या डिझाईन देखील तयार करू शकता. यामध्ये देखील आपण खूपच चांगल्या प्रकारे नफा कमवू शकता.

8) आजकालच्या काळामध्ये रेडिमेड साड्यांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. सणासुदीच्या काळामध्ये लहान मुलींना रेडीमेड साड्या, तसेच ट्रॅडिशनल डे च्या दिवशी खूपच लागत असतात. तुम्ही जर त्या बनवून विकल्या तर तुम्हाला यामध्ये चांगला नफा देखील मिळू शकतो.

9) मित्रांनो, तुम्ही लहान मुलींसाठी फ्रॉक्स बनवून देखील त्याची विक्री करू शकता हा व्यवसाय देखील खूपच चालणारा व्यवसाय आहे.

10) मित्रांनो, कंपनीसाठी काही ठिकाणी नेहमी युनिफॉर्म लागत असतात. त्याची ऑर्डर घेऊन सुद्धा तुम्ही कंपनीतून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये नफा कमवू शकता.

11) मित्रांनो, तुम्ही जर स्कार्फ, स्वेटर, मफलर यांसारख्या वस्तू बनवायला शिकला तर यामधून देखील खूपच चांगल्या प्रकारे नफा कमवू शकता.

शिवणकाम व्यवसाय मधून मिळणारे प्रॉफिट किती आहे

मित्रांनो, तुम्ही शिवणकाम केल्यास भरपूर प्रमाणामध्ये कमवू शकता. त्यामध्ये तुम्हाला फक्त एकच चांगली गोष्ट निवडून त्यामध्ये तुमचे वेगवेगळ्या प्रकारचे कला कौशल्य वापरून तुम्ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अट्रॅक्टिव्ह डिझाईन तयार करून तुम्ही तुमचा व्यवसाय हा खूपच मोठ्या पद्धतीमध्ये वाढवू शकता.

मित्रांनो सुरुवातीच्या काळामध्ये तुम्ही स्वतः काम करू शकता. परंतु जसजसे तुमच्याकडे काम वाढत गेले तर तुम्ही हाताखाली कामगार ठेवून तुमचा बिजनेस चांगल्या रीतीने वाढवू शकता.

तुमच्या वस्तूची जशी मागणी वाढत जाईल तसे तुम्ही आणखी व्यवसाय वाढू शकता. मित्रांनो तुम्ही शिवणकाम व्यवसाय मध्ये वेगवेगळे कौशल्य वाढवून तुमचा उद्योग खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढू शकतात.

शिवणकाम व्यवसाय मध्ये कोणती काळजी घेतली पाहिजे

1) मित्रांनो, शिवणकाम व्यवसाय मध्ये काळजीपूर्वक वेगवेगळे पॅटर्न तयार केले पाहिजेत.

2) शिवणकाम व्यवसाय मध्ये काही चुका होत असतील तर त्या देखील सुधारल्या पाहिजेत.

3) शिवणकाम व्यवसाय मध्ये चांगल्या दर्जाचे नेहमी फॅब्रिक वापरणे हे देखील महत्त्वाचे ठरते.

4) वेगवेगळ्या प्रकारचे ऑटोमॅटिक उपकरणे वापरणे ज्यामुळे कमी वेळेमध्ये चांगला माल तयार होत असतो.

5) लोकांना नेहमी हवे असतील त्या प्रकारची कपडे शिवून देणे तसेच त्यांच्यासाठी डिझाईन उपलब्ध करून देणे.

6) माल नेहमी वेळेच्या वेळी तयार करून ठेवणे.

7) मालाची पॅकेजिंग नेहमी व्यवस्थितपणे करणे.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेला शिवणकाम उद्योग हा व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती खूपच उपयोगी पडणार आहे.

तसेच मित्रांनो शिवणकाम उद्योगाबद्दल व्यवसाय बद्दल आपल्याला दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला शिवणकाम उद्योगाबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला कोणतेही आणखी माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट करा नक्की कळवा.

मित्रांनो आपल्याला शिवणकाम व्यवसाय याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या कुटुंबापर्यंत तसेच मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending