Schemes
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे Sharad Pawar Gram Samrudhi Yojana, कागदपत्रे,पात्रता अर्ज कसा करावा

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना मित्रांनो महाराष्ट्र सरकारने शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरू केलेली आहे. ठाकरे सरकारने शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरू केलेली योजना महाविकास आघाडी सरकारने शरद पवार ग्रामसमृद्धी योजना सुरू करावी यासाठी प्रस्ताव मंत्रालयाकडे दिलेला होता.
मंत्रालयाने शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी दिलेला प्रस्ताव हा मान्य केलेला आहे. आज आपण शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे तसेच या योजनेमधून शेतकरी मित्रांना कोणत्या पद्धतीचा फायदा होऊ शकतो. तसेच कोणत्या पद्धतीचे अनुदान आहे हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया शरद पवार ग्रामसमृद्धी योजना याबद्दल अगदी सविस्तर रीत्या.
अनुक्रमणिका
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना काय आहे (Sharad Pawar Gram Samrudhi Yojana)
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही योजना ग्रामीण भागामध्ये सुरू करण्यात आलेली आहे. महाविकास आघाडीने शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेत साठी मंत्रालयाकडे प्रस्ताव पाठविला होता हा प्रस्ताव मंत्रालयाने देखील मान्य केलेला आहे.
तसेच शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेला मान्यता देखील दिलेली आहे. चला तर मग जाणून घेऊया शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमधून आपण कोणत्या पद्धतीने फायदा घेऊ शकतो.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आहे
महात्मा गांधी रोजगार हमी योजने अतर्गत शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमध्ये काही योजना राबवण्यात येणार आहेत.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमध्ये जनावरांसाठी पक्का गोठा बांधण्यासाठी गाय म्हैस यांचा गोठा बांधण्यासाठी 77 हजार 118 रुपये इतके अनुदान दिले जाणार आहे. जनावरांचा गोठा बांधण्यासाठी हे अनुदान असणार आहे.
जर आपल्याकडे सहापेक्षा अधिक जनावरे असतील तर आपल्याला अनुदानाची रक्कम ही वाढवून मिळणार आहे.
तसेच आपल्याला शेळ्यांसाठी देखील शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमधून अनुदान मिळणार आहे. यासाठी आपल्याला दहा शेळ्यांसाठी 49 हजार 284 रुपये हे अनुदान दहा शेळ्यांसाठी मिळणार आहे. त्याचप्रमाणे आपण जर शेळ्यांची संख्या वाढवली तर हेच अनुदान आपल्याला दुपटीने देखील मिळणार आहे.
तसेच कुकुट पालन शेड बांधण्यासाठी आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत शेड बांधण्यासाठी 49 हजार 760 रुपये कुक्कुटपालन शेड बांधण्यासाठी आपल्याला शरद पवार ग्राम समृद्धी योजने मधून अनुदान दिले जाते.
तसेच शेतामधील असणारा कचरा एकत्र करून त्या कचऱ्यापासून कंपोस्ट खत बनवण्यासाठी देखील शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमधून खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अनुदान दिले जाते याला संजीवनी नाडेप कंपोस्टिंग असे म्हटले जाते. यासाठी दहा हजार 537 रुपये अनुदान शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमधून दिले जाते.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी अर्ज कसा करावा
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा आपल्याला जर लाभ घ्यायचा असेल तर सर्वप्रथम आपण शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी आपण आपल्या ग्रामपंचायत मध्ये यांचा अर्ज दाखल करावा लागेल.
आपण अर्ज करत असताना आपण ज्यांच्या कडे अर्ज करत आहोत त्यांच्या नावासमोर ठीक करावी ज्यामध्ये आपण सरपंच, ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांच्याकडे अर्ज करत असाल तर त्यांच्या नावासमोर आपण टिक मार्क करावी.
त्याच प्रमाणे अर्जामध्ये आपण ज्याच्या नावावर अर्ज करत आहात त्याचे नाव पत्ता मोबाईल नंबर हे सर्व जोडायचे आहे हे जोडल्यानंतर आपल्याला सरपंच तसेच ग्रामसेवक यांचा ग्रामसभेचा ठराव देखील शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी घ्यावा लागणार आहे.
यानंतर तुमच्या असणारे कागदपत्रांची छाननी केली जाईल छाननी केल्यानंतर तुम्हाला तुम्ही अर्ज केल्याची पोचपावती देखील पंचायत समिती कडून तुम्हाला मिळेल.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमधून कोणत्या कामासाठी अनुदान मिळते
- शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमधून गाय म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणी यासाठी देखील अनुदान मिळते.
- शेळी पालन करण्यासाठी तसेच शेळीपालनासाठी शेड बांधण्यासाठी देखील शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमधून अनुदान मिळत असते.
- कुकुट पालनासाठी शेड बांधण्यासाठी देखील शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमधून अनुदान मिळत असते.
- भू संजीवनी नाडेप कंपोस्टिंग यासाठीदेखील शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमधून अनुदान मिळत असते.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता काय आहे
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी खालील प्रमाणे पात्रता असणे आवश्यक आहे.
सदर व्यक्ती हा भूमिहीन आसला पाहिजे तसेच शेतकरी असला पाहिजे. |
तसेच शरद पवार ग्रामसमृद्धी योजना या योजनेसाठी अर्ज करणाऱ्या व्यक्तीकडे जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे. |
ज्यांना गाय गोठा यासाठी अनुदान हवे असेल त्यांना जनावरांचे tagging असणे गरजेचे आहे. |
अशा प्रकारे शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्रता आहे.
शरद पवार ग्राम समृद्धी योजनेसाठी कोणती कागदपत्रे लागतात
शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी खालील प्रमाणे कागदपत्रे लागतात.
- अर्जदाराचे आधार कार्ड
- अर्जदाराचे रेशन कार्ड
- अर्जदाराचा रहिवासी दाखला
- अर्जदाराचे पासपोर्ट आकाराचे फोटो
- अर्जदाराचे जॉब कार्ड
अशा प्रकारे शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेसाठी वरील प्रमाणे कागदपत्रे लागतात.

शरद पवार ग्रामसमृद्धी योजना (Sharad Pawar Gram Samrudhi Yojana) निष्कर्ष
मित्रांनो, आपण जर ग्रामीण भागांमध्ये राहत असाल तर शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही आपल्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण आणि लाभदायी अशी योजना आहे . मित्रांनो आपल्याला जर शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. मित्रांनो आपल्याला शरद पवार ग्रामसमृद्धी योजना याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट्स द्वारे नक्कीच कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.
शरद पवार ग्रामसमृद्धी योजना (Sharad Pawar Gram Samrudhi Yojana) FAQ
1) शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आहे का
हो, शरद पवार ग्रामसमृद्धी योजना ही महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत आहे.
2) शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमधून कोणत्या कामासाठी अनुदान मिळते
शेळीपालन, कुकुट पालन, भू संजीवनी नाडेप कंपोस्टींग या योजनेसाठी अनुदान मिळते.
-
business ideas9 months ago
लघु उद्योग माहिती प्रकल्प मराठी Laghu Udyog Project Information in Marathi
-
Schemes10 months ago
जिल्हा उद्योग केंद्र योजना District Industries Centre Scheme in marathi
-
Information6 months ago
अंगणवाडी भरतीसाठी लागणारी कागदपत्रे, अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती महाराष्ट्र
-
Information6 months ago
डोमासाईल प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे, Domicile Certificate Documents Marathi, डोमेसाइल प्रमाणपत्र कसे काढाल
-
Information7 months ago
आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय | Disaster Management in Marathi, आपत्ती व्यवस्थापन कायदा, 2005
-
business ideas11 months ago
किराणा दुकान माहिती मराठी Grocery Store Information in Marathi
-
business ideas8 months ago
व्यवसाय कोणता करावा । नवीन व्यवसाय कोणता करावा । ग्रामीण भागात सुरु होणारे व्यवसाय
-
business ideas12 months ago
महिला बचत गटाचे फायदे Mahila Bachat Gat Benefits in Marathi
Pingback: पैशाची गुंतवणूक कशी करावी ज्यामुळे सर्वात जास्त (Profit) मिळेल