Connect with us

Goat Farming

शेळी आजार व उपचार कोणते आहेत, शेळीला होणारे आजार, लक्षणे आणि उपचार

Published

on

शेळी आजार व उपचार

शेळी आजार व उपचार नमस्कार मित्रांनो, आज आपण शेळ्यांना होणारे कोणकोणते आजार आहेत. तसेच त्यांच्यावर कोणते उपचार केले पाहिजेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो बेरोजगार लोकांसाठी शेळीपालन हा अत्यंत उपयोगी आणि नफा मिळवून देणारा प्रसिद्ध असा व्यवसाय आहे. आज आपण शेळीचे आजार व उपचार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

शेळीचे आजार व उपचार कोणते आहेत

शेळी आजार व उपचार

1) घटसर्प आजार

  • मित्रांनो, शेळ्यांना हा आजार क्वचित प्रमाणामध्ये होतो या आजारांमध्ये त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असतो.
  • शेळ्यांच्या घशामधून खरखर आवाज यामध्ये येत असतो. तसेच या आजारांमध्ये शेळ्यांना ताप हा मोठ्या प्रमाणामध्ये येत असतो.

2) गर्भपात

  • शेळ्यांच्या कळपात राहणाऱ्या नराकडून हा रोग नेहमी प्रसारित होत असतो. दोन ते अडीच महिन्याच्या गर्भधारणेनंतर गर्भपात होत असतो. नंतर शेळी माजावर न येणे, कायमची भाकड होणे, वारंवार गर्भपात होणे असे प्रकार या रोगांमध्ये होत असतात.
  • या रोगामध्ये रक्त तपासणी करणे आवश्यक असते.
  • नेहमी गाभण शेळीचा गर्भपात झाल्यास गर्भ हा खोल खड्डा करून त्यावर चुना टाकून पुरून टाकावा.

3) हगवण

  • हा रोग व्यवस्थापन योग्य नसेल तर होत असतो.
  • घाणीमुळे हा रोग खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पसरत असतो.
  • हा रोग होऊ नये म्हणून शेळ्यांच्या गोठ्यावर स्वच्छता ठेवणे आवश्यक असते.

4) फऱ्या

  • या रोगामध्ये पुढच्या किंवा मागच्या फऱ्यावर सूज येते. तसेच शेळीची कातडी काळी पडत असते.
  • या रोगामध्ये शेळी खात पीत नाही या रोगाचा उपचार न केल्यास शेळी आठ ते 24 तासांमध्ये मरण पावते. त्यामुळे आपण लक्षणे दिसतात शेळीवर उपचार सुरू केले पाहिजेत.
  • बाजारामध्ये घटसर्प आणि फर्या अशी एकत्रितपणे असणारी लस देखील उपलब्ध आहे.

5) स्तनदाह

  • हा रोग हा सडामधून झालेल्या जखमेतून जंतूचा प्रसार हा काचेमध्ये होत असतो.
  • कासेमध्ये दूध राहिल्यानंतर देखील हा रोग होत असतो.
  • या रोगामध्ये कास घट्ट दगडासारखे होते. तसेच दुधामध्ये गाठी दिसून येतात दूध नासत असते.
  • कासेमध्ये दूध राहणार नाही याची आपण दक्षता घ्यावी व उपचार करून घ्यावेत.

6) ETV

खाद्यपदार्थाच्या बदलामुळे हा रोग होत असतो. तसेच अवकाळी पावसाळ्यानंतर तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला होणाऱ्या हिरव्या गवतामुळे देखील हा रोग होत असतो.

मरण्यापूर्वी शेळीची फार लक्षणे यामध्ये दिसत नाही संध्याकाळी उशिरा एक दोन उड्या मारून किंवा चक्कर खाऊन शेळी हातपाय झाडत प्राण सोडत असते.

  • या रोगामध्ये लसीकरण फार महत्वाचे आहे. या रोगाची लस ही पावसाळा सुरू होण्यापूर्वी तसेच नोव्हेंबर, डिसेंबर मध्ये द्यावी दरवर्षी द्यावी.
  • करडांना कधीही ताजा पाला खाण्यासाठी देऊ नये.
  • सुकलेला चारा तसेच एक दिवसाचा शिळा चारा नेहमी करडांना द्यावा.

7) धनुर्वात

  • शेळी विन्यापूर्वी तसेच शेळीला कोणतेही मोठी जखम झाली असल्यास प्रतिबंधक लस टोचून घ्यावी.

8) फुफूसदाह

  • मित्रांनो, हा रोग हा शेळ्यांना पावसात भिजल्यामुळे किंवा वातावरणातील अचानक झालेल्या बदलांमुळे होत असतो. जेव्हा जनावरांची प्रतिकारशक्ती कमी होत असते तेव्हा या रोगाची लागण होण्याची शक्यता जास्त असते.
  • मित्रांनो, या रोगाची लक्षणे दिसल्यास आपण लवकरात लवकर नजीकच्या पशुवैद्यक अधिकाऱ्याशी संपर्क साधून उपचार करून घ्यावेत.
  • मित्रांनो, आपण कुठल्याही परिस्थितीमध्ये करडे आणि शेळ्या पावसामध्ये भिजणार नाहीत याची काळजी घ्यावी.

9) खुरी FMD

  • या रोगाला तोंड खोरी किंवा पायखुरी असे देखील म्हटले जाते.
  • या रोगांमध्ये जीभ तोंड खुरांचे बेचके तसेच स्थानांवर फोड आलेले दिसून येतात.
  • या रोगामध्ये शेळी लंगडत चालत असते. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी याचे लसीकरण करून घ्यावे.

शेळी आजार आणि लसीकरण

ETVशेळीच्या वयाच्या पहिल्या महिन्यामध्ये एकदा आणि पंधरा दिवसानंतर बूस्टर डोस द्यावा आणि नंतर सहा महिन्यांनी नियमितपणे लसीकरण करावे.
घटसर्पयाचे लसीकरण वयाच्या चौथ्या महिन्यांमध्ये पहिल्यांदा आणि नंतर दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावी.
खुरीयाचे लसीकरण वयाच्या सहा महिन्यानंतर करावे तसेच दरवर्षी पावसाळा सुरू होण्यापूर्वी करावे.
धनुर्वातगाभण शेळ्यांसाठी विण्यापूर्वी एक महिना आधी लसीकरण करावे.
PPRयामध्ये लसीकरण तीन महिन्याच्या करडांना सुरुवातीला एकदा आणि दर सहा महिन्यांनी एकदा लसीकरण करावी.

शेळीचे आजार व उपचार याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, शेळीचे आजार व उपचार याबद्दल दिलेली वरील प्रमाणे माहिती आपल्याला आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला शेळींचे आजार व उपचार याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला शेळ्यांबद्दल आणखी माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. शेळीचे आजार व उपचार याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending