Connect with us

Schemes

शेततळे अनुदान योजना । Shet Tale Anudan Mahiti, मागेल त्याला शेततळे योजना

Published

on

शेततळे अनुदान योजना

शेततळे अनुदान योजना: मित्रांनो, आज आपण शेतकऱ्यांच्या फायद्यासाठी असणारे शेततळे याबद्दलची अनुदान योजना माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई सर्वांनाच भासत असते परंतु आपल्याकडे जर शेततळे असेल तर आपण या टंचाईपासून मुक्त होऊ शकता.

हेच विचार करून आपण जर शेततळ्यासाठी अनुदान योजना शोधत असाल तर आज आपण योग्य ठिकाणी आहात. चला तर मित्रांनो जाणून घेऊया शेततळे अनुदान योजना काय आहे याबद्दलचे अगदी सविस्तर माहिती.

शेतकऱ्यांसाठी शेततळे अनुदान योजना काय आहे

मित्रांनो, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत असणाऱ्या वैयक्तिक लाभासाठी शेततळ्यासाठी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज आजकालच्या काळामध्ये सुरू झालेले आहे.

शेतकऱ्यांनी लवकरात लवकर शेततळ्यासाठी या पोर्टल वर जाऊन अर्ज करावा असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आलेले आहे.

मित्रांनो महाराष्ट्र मध्ये बऱ्याच शेतकऱ्यांना नेहमी पावसावर अवलंबून राहावे लागत आहे. कारण बहुतांश शेतकऱ्यांच्या जमिनी प्रथा हा कोरडवाहू असल्यामुळे पाण्याची तितकी उपलब्ध या जमिनीमध्ये होत नाही.

परिणामी जमीन खडकाळ असल्याने शेतकऱ्यांना पाणी अभावी भरघोस उत्पन्न देखील घेता येत नाही म्हणून महाराष्ट्र शासनाने शेततळे अनुदान योजना राबवलेली आहे. ही योजना महाराष्ट्र मधील असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खूपच फायद्याची ठरणार आहे.

शेततळे अनुदान योजना काय आहे

शेततळे अनुदान योजना ही डोंगराळ भागातील जमीन अशा प्रकारच्या जमिनीमध्ये बोरवेल अथवा विहिरी सुद्धा पाणी लागण्याची शक्यता फारच कमी असते.

अशा सर्व अडचणीचा विचार करून शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी शेततळे अनुदान योजना राबवली जात आहे. ज्यामध्ये मागील त्याला शेततळे असे या योजनेचे उद्दिष्ट आहे.

शेततळे अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहे

1) शेतकऱ्याच्या नावावर कमीत कमी दीड एकर जमीन असणे आवश्यक आहे.

2) शेतकऱ्यांनी यापूर्वी शेततळे सामूहिक शेततळे अनुदान योजनेचा लाभ देखील घेतलेला नसावा.

3) लाभार्थी शेतकऱ्यांनी शेततळ्याचे काम पूर्ण केल्यानंतर सातबारा उताऱ्यावर शेततळ्याची नोंद करणे बंधनकारक आहे.

4) शेततळे अनुदान योजनेमध्ये जितक्या आकाराचे शेततळे मंजूर झालेले आहे तेवढेच अकराचे शेततळे खोदणे बंधनकारक आहे.

5) शेततळ्याची काळजी घेणे व निगा राखणे ही शेतकऱ्यांची प्राथमिक जबाबदारी आहे.

6) कृषी विभागामार्फत शेततळे तपासणीसाठी आलेल्या नंतर ज्या ठिकाणी जागा निश्चित केलेली आहे त्याच ठिकाणी शेततळे खोदणे नेहमी बंधनकारक असते.

7) शेततळे मंजूर झाल्यास पुढील तीन महिन्यांमध्ये काम पूर्ण करणे बंधनकारक असते.

शेततळे अनुदान योजना यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत

1) लाभार्थ्याचे आधार कार्ड लागत असते.

2) शेत जमिनीचा सातबारा उतारा लागत असतो.

3) कागदाचे कोटेशन लागत असते.

4) जात प्रमाणपत्र लागत असते.

5) हमीपत्र लागत असते तसेच शेतकरी करारनामा लागत असतो.

6) बँक पासबुक लागत असते.

7) मोबाईल क्रमांक लागत असतो.

शेततळे अनुदान योजनेमध्ये लाभार्थी निवड कशी केली जाते

दारिद्र्यरेषेखालील असणाऱ्या कुटुंबांना तसेच शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे ज्या शेतकऱ्यांची आत्महत्या झालेली आहे असल्यास अशा शेतकऱ्यांच्या वारसांना निवड प्रक्रियेमध्ये प्राधान्य दिले जाते.

याव्यतिरिक्त सर्व असणाऱ्या प्रवर्गातील शेततळे मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांना निवड ही प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य याप्रमाणे शेततळ्याची निवड करण्यात येत असते.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली शेततळे अनुदान योजना याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला शेततळे अनुदान योजना याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणतीही अनुदान बद्दल माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो शेततळे अनुदान योजना याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending