सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची माहिती: मित्रांनो आज आपण सोयाबीन प्रक्रिया उद्योग कोणकोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो सोयाबीन हे खरीप हंगामातील अत्यंत चांगले असणारे पीक आहे.
सोयाबीन मधून 40% उच्च दर्जाचे प्रथिने आणि 20% तेल असणारे पीक आहे. चला तर मित्रांनो जाणून घेऊया सोयाबीन प्रक्रिया उद्योग कोणकोणते आहेत याची अगदी सविस्तर माहिती.
अनुक्रमणिका
सोयाबीन प्रक्रिया उद्योगाची माहिती Soybean Processing Industry Information in Marathi
मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये एकूण गळीत धान्य उत्पादनामध्ये सोयाबीन या पिकाचा फार मोठा वाटा आहे. मनुष्याच्या आहारामधील पौष्टिक पदार्थ तसेच पशुखाद्य आणि औद्योगिक दृष्ट्या सोयाबीनला खूप मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व देखील आहे.
1) सोयाबीन पेंड उत्तम पशुखाद्य (सोयाबीन प्रक्रिया उद्योग)
पशुखाद्य निर्मितीमध्ये सोयाबीनचा वापर हा दिवसेंदिवस खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत चाललेला आहे. सोयाबीन पासून तेल काढल्यानंतर उरलेल्या ढेपेचा पशु पक्षांना खाद्यात एक अत्यावश्यक घटक म्हणून वापर केला जातो.
यामधून दर्जेदार भरपूर दूध उत्पादन मिळू शकते. दुभत्या गाई म्हशींसाठी वाढ प्रजनन आणि दूध उत्पादनासाठी आवश्यक सर्व पोषक घटक सोयाबीनमध्ये असतात.
सोयाबीनमध्ये प्रथिनांचे व ऊर्जेचे प्रमाण हे जास्त प्रमाणामध्ये असते. सोयाबीनमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्रथिने, स्निग्ध पदार्थ, कर्बोदके, कॅल्शियम, फॉस्फरस, लोह, जीवनसत्व हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात.
2) सोया दूध
सोयाबीन पासून तयार केलेले दूध हे आरोग्यदायी असते. तसेच या दुधापासून पनीर, लस्सी तयार करता येत असते. दूध काढून झाल्यानंतर राहिलेल्या लगद्यापासून शेव, चकली, शंकरपाळी देखील तयार करता येते. बाजारपेठेमध्ये या पदार्थांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे.
3) सोया बिस्किट
मित्रांनो, बहुतेक बिस्किटे हे मैद्यापासून तयार करत असतात. परंतु मैद्यामध्ये ऊर्जेचे प्रमाण अधिक असते. त्याचबरोबर प्रथिनांचे प्रमाण हे कमी असते.
म्हणून प्रथिनांचे प्रमाण वाढवण्यासाठी सोयाबीन हा फार मोठा पर्याय आहे. सोयाबीन पासून उत्तम प्रकारचे बिस्किटे तयार करता येतात.
4) सोया पनीर
सोया दुधाप्रमाणेच सोया पनीरला देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. सोया पनीर ची किंमत ही दोनशे ते अडीचशे रुपये प्रति किलो आहे.
सोया पनीर मध्ये प्रथिने हे मोठ्या प्रमाणामध्ये असतात. परदेशामध्ये विविध भागांमध्ये सोया पनीरला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे.
एक किलो सोयाबीन पासून दीड किलो पनीर तयार होत असते. म्हणून हा व्यवसाय खूपच परवडणारा असा असणारा व्यवसाय आहे.
5) सोया खरमुरे
खरमुरे तयार करण्यासाठी सोयाबीन हे दहा ते पंधरा मिनिटे पाण्यामध्ये भिजवली जाते. त्यानंतर त्याला पाच ते सहा तास उन्हामध्ये सुकवून नंतर वाळूत भाजले जाते. वाळूत भाजताना चवीपुरते त्यामध्ये मीठ टाकले जाते. अशा प्रकारे सोयाबीन खरमुरे तयार केले जातात.
सोयाबीन प्रक्रिया उद्योगाचे फायदे
1) मित्रांनो, सोयाबीन प्रक्रिया उद्योग उभारल्यामुळे शेतीच्या उत्पन्नामध्ये वाढ होत असते.
2) ग्रामीण भागातील मजुरांना रोजगार प्राप्त होत असतो.
3) मजुरांचे स्थलांतर काही प्रमाणामध्ये कमी होत असते.
4) ग्राहकांना नेहमी सोयाबीनचे प्रक्रिया युक्त पदार्थ उपलब्ध होत असतात.
5) सोयाबीन प्रक्रिया उद्योगामुळे सोयाबीन कच्च्या मालाचे किमतीमध्ये वाढ होत असते.
6) सोया पनीर आणि सोयाबीन या पदार्थांचा मानवी आहारामध्ये खूपच चांगल्या प्रकारे उपयोग होत असतो.
7) मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये सोयाबीन उद्योगासाठी विविध शासकीय योजनांचा लाभ घेता येत असतो.
8) सोयाबीन पिकाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोनामध्ये बदल होत असतो.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला सोयाबीन प्रक्रिया उद्योगांची माहिती याबद्दल दिलेले माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा. तसेच वरील प्रमाणे दिलेले माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.