सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना: नमस्कार मित्रांनो आज आपण घेऊन आलेलो आहोत सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना याबद्दलची माहिती.
मित्रांनो आपण जर शिक्षण पूर्ण केले असेल तरी देखील आपल्याला कुठे नोकरी नसेल तरी आपण एखादा व्यवसाय करायचा विचार करत असाल.
तर आपल्याला भांडवल कमी पडत असेल यासाठी आम्ही आज आपल्यासाठी सुशिक्षित बेरोजगार योजना काय आहे याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना काय आहे.
अनुक्रमणिका
सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना सर्व माहिती मराठीमध्ये
सुशिक्षित बेरोजगारांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे पाच लाख रुपयांचे बीज भांडवल कर्ज योजना सुरू केलेली आहे.
जिल्ह्यातील असणारे सुशिक्षित बेरोजगारांसाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे पाच लाख रुपयांचे बीज भांडवल कर्ज योजना महाराष्ट्र सरकारने सुरू केलेले आहे. जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मार्फत ही योजना राबविण्यात येते.
महाराष्ट्र मधील सर्व जिल्ह्यांसाठी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यासाठी दीडशे प्रकरणाचे उद्दिष्ट महामंडळांकडून देण्यात आलेले आहे. हे उद्दिष्ट राष्ट्रीयकृत बँकांना देण्यात आलेला आहे.
सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना या योजनेअंतर्गत बेरोजगार उमेदवारांना पाच लाखांपर्यंत व्यवसायासाठी अर्थसाह्य उपलब्ध करून देण्यात येते.
यामध्ये राष्ट्रीयकृत बँकेचा सहभाग हा 60% असतो. तर महामंडळाचा 35 टक्के सहभाग असतो. तर उर्वरित पाच टक्के रक्कम अर्जदाराची असते.
राष्ट्रीयकृत बँकांनी मंजूर केलेल्या प्रकल्प रकमेच्या 35 टक्के रक्कम महामंडळातर्फे बीज भांडवल म्हणून देण्यात येते. तसेच या भांडवलावर फक्त चार टक्के व्याज आकरण्यात येते.
या भांडवलाचा परतफेडीचा कालावधी हा पाच वर्षाचा असतो त्यासाठी वसुली ही मासिक तसेच त्रैमासिक तसेच सहामाही किंवा वार्षिक याप्रमाणे करण्यात येते.
सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना यासाठी कोणत्या अटी आहेत
1) अर्जदार हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
2) अर्जदार हा खुले प्रवर्गात मधील असावा.
3) अर्जदाराने जिल्ह्यातील स्थायी वास्तव्य किमान मागील तीन वर्षे केलेल्या असावे.
4) अर्जदाराचे वय हे 18 ते 45 या दरम्यान असावे.
5) अर्जदाराचे नाव हे जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र मध्ये नोंदवलेले असावे.
6) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे सहा लाखाच्या आत असावे.
7) अर्जदाराच्या कुटुंबातील व्यक्ती ही कोणत्याही बँकेची थकबाकीदार नसावी.

सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना यासाठी सविस्तर माहिती कोठे मिळेल
मित्रांनो, आपल्याला सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना याबद्दल अधिक माहिती घ्यायची असेल तर आपण महास्वयम या वेबसाईटला भेट द्यावी.
तसेच जिल्हा विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांना देखील भेट द्यावी. तसेच यांच्या कार्यालयामध्ये आपण संपर्क साधावा. मित्रांनो एकूण प्रकरणाची संख्या ही दीडशे इतकी असल्यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर त्वरित संपर्क आणि चौकशी करावी.
मित्रांनो बेरोजगार युवकांसाठी ही एक महत्त्वाची महाराष्ट्र शासनातर्फे योजना आहे. उमेदवारांनी या योजनेचा लाभ घेऊन स्वयं रोजगार प्राप्त करावा.
सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना याबद्दल महाराष्ट्र सरकार बेरोजगार भत्ता
भारत देशातील तसेच महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांना आर्थिक मदत करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र बेरोजगारी भत्ता सुरू केलेला आहे.
मित्रांनो ही योजना राज्यातील सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र सरकारकडून प्रति महिना पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता दिला जातो.
मित्रांनो सुशिक्षित बेरोजगार तरुणांना महाराष्ट्र सरकार हे आर्थिक सहाय्य हे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत असते. बेरोजगार भत्ता योजनेमधून राज्यातील तरुणांना स्वतःचे आणि कुटुंबातील चांगली काळजी घेता येणार आहे.
तसेच बेरोजगारीत भत्ता यामधून बेरोजगार तरुणांना दूरवरच्या नोकऱ्या शोधण्यास देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होणार आहे.
निष्कर्ष
मित्रांनो, वरील प्रमाणे दिलेली माहिती सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना याबद्दल दिलेली माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना याबद्दल दिलेली माहिती आपल्याला खूपच उपयोगी पडणार आहे. तसेच आपल्याला नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी देखील खूपच उपयोगी पडणार आहे.
मित्रांनो आपल्याला सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.
One thought on “सुशिक्षित बेरोजगार कर्ज योजना Sushikshit Berojgar Loan Yojana in Marathi, बेरोजगारांना मिळणार आता कर्ज”