Swast Dhanya Dukan Information in Marathi । स्वस्त धान्य दुकान माहिती, रेशनिंग चे नियम, दुकान परवाना, आवश्यक कागदपत्रे

स्वस्त धान्य दुकान माहिती

स्वस्त धान्य दुकान माहिती: नमस्कार मित्रांनो आज आपण स्वस्त धान्य दुकान याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो प्रत्येकाच्या गावांमध्ये स्वस्त दुकान असतेच आणि हे सरकारी आहे. याचेच काही नियम हे आहेत तेच आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया स्वस्त धान्य दुकान माहिती.

स्वस्त धान्य दुकान माहिती मराठी मध्ये

मित्रांनो, लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर बहुतांशी जीवनावश्यक वस्तू स्वस्त धान्य दुकानांमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न हा शासनाच्या वतीने केलेला होता. तसेच इतर वेळी देखील शासन जीवनावश्यक वस्तू स्वस्त धान्य दुकानलाच देत असते.

परंतु असे असले तरी नागरिकांना स्वस्त धान्य दुकानाबद्दल त्यांच्या हक्काबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहित नसतात. याचाच गैरफायदा घेत दुकानदारांकडून ग्राहकांची लुट ही खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते आणि तक्रारी देखील वाढत असतात.

रेशनिंग चे नियम

1) आपल्याला मिळणारे धान्य हे स्वस्त धान्य दुकानात चार आठवड्यामध्ये कोणतेही वेळी घेता येते.

2) मित्रांनो, स्वस्त धान्य दुकानांमध्ये एकाच दिवशी एकच पावती फाडता येते असा कोणताही नियम नाही.

3) स्वस्त धान्य दुकानांमध्ये घेतलेल्या वस्तूंचे पावती मिळालीच पाहिजे. कारण पावतीवर रेशन दुकानाचा क्रमांक देखील असतो.

4) दुकानदाराला रेशन कार्ड स्वतःकडे ठेवून घेण्याचा किंवा तो रेशन कार्ड रद्द करण्याचा अधिकार देखील नाही.

5) मित्रांनो, स्वस्त धान्य दुकानांमध्ये लोकांना स्पष्टपणे वाचता येतील असे माहिती फलक असणे खूपच गरजेचे आहे. या फलकावर दुकानाची वेळ सुट्टीचा दिवस दुकान क्रमांक तक्रार वही उपलब्ध असल्याची नोंद तसेच रेशन कार्यालयाचा पत्ता व फोन नंबर रेशन कार्ड ची संख्या व उपलब्ध असलेला कोटा ही माहिती असणे अनिवार्य आहे.

6) प्रत्येक स्वस्त धान्य दुकानांमध्ये बीपीएल व अंत्योदय व अन्नपूर्णा लाभार्थ्यांची यादी ही दुकानांमध्ये लावलेली असते.

7) स्वस्त धान्य दुकानांमध्ये रॉकेल घासलेट पहिले पंधरावाड्यात न घेतल्यास महिना अखेरपर्यंत देखील घेता येते त्याचा हप्ता बुडत नाही.

8) ज्या व आपल्या पाहिजे एवढ्याच वस्तू आपण घेऊ शकतो.

9) इतर वस्तू घेतल्याशिवाय रॉकेल मिळणार नाही असे दुकानदार आपल्याला म्हणू शकत नाही.

10) रेशन दुकान हे रोज सकाळी चार तास व सायंकाळी चार तास उघडे असलेच पाहिजे.

11) रेशन दुकान हे आठवडी बाजाराच्या दिवशी उघडे असलेच पाहिजे.

12) आठवड्यातून फक्त एकदाच दुकान बंद ठेवता येते.

13) रेशन दुकानांमध्ये लोकांना स्पष्टपणे वाचता येईल असा माहिती फलक असला पाहिजे.

नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना कोणाला मिळू शकतो

मित्रांनो, स्वस्त धान्य दुकानाचा परवाना हा ग्रामपंचायत किंवा स्थानिक स्वराज्य संस्था नोंदणी झालेले स्वयंसहायता बचत गट, सहकारी संस्था ज्या संस्थांची महाराष्ट्र सहकार कायदा 1960 अंतर्गत नोंदणी झालेली आहे. अशा संस्थांना स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मिळू शकतो.

स्वस्त धान्य दुकान परवाना अर्ज दाखल केल्यानंतर लाभार्थ्यांची निवड ही कशा प्रकारे केली जाते 

मित्रांनो, आपण जर स्वस्त धान्य दुकान परवाना मिळवण्यासाठी अर्ज केला असेल तर परवाना हा समितीकडे जेवढे अर्ज प्राप्त झाले असतील त्या अर्जाची सर्वप्रथम प्राथमिक पणे तपासणी केली जाते.

तपासणी केल्यानंतर अर्जाचे छाननी केली जाते. त्यानंतर जागेची तपासणी देखील केली जाते. आणि इतर आवश्यक तपासणी देखील केल्या जातात नंतर पात्र लाभार्थ्यांना परवाना देण्यात येतो.

स्वस्त धान्य दुकानाचा परवाना मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे

1) ग्रामसभेचा ठराव लागत असतो.

2) सातबारा मालकीपत्र लागत असते.

3) गट स्थापन केल्याचे नोंदणी प्रमाणपत्र लागत असते.

4) गटाचा वार्षिक लेखापरीक्षण अहवाल लागत असतो.

5) आधार कार्ड लागत असते.

6) गुन्हा दाखल नसल्याबाबत शपथपत्र लागत असते.

वरील प्रमाणे कागदपत्रे ही स्वस्त धान्य दुकान परवाना मिळवण्यासाठी लागत असतात.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली स्वस्त धान्य दुकान याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला स्वस्त धान्य दुकान याबद्दलची आणखी माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेले माहिती आपल्याला कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो स्वस्त धान्य दुकान याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Swast Dhanya Dukan Information in Marathi । स्वस्त धान्य दुकान माहिती, रेशनिंग चे नियम, दुकान परवाना, आवश्यक कागदपत्रे

Leave a Reply

Your email address will not be published.

Scroll to top