Connect with us

business ideas

टिफिन बनवण्याचा उद्योग माहिती | Tiffin Making Business Marathi Information

Published

on

टिफिन बनवण्याचा उद्योग माहिती

टिफिन बनवण्याचा उद्योग माहिती: आजकालच्या काळामध्ये अनेक लोक शिक्षण नोकरी व्यवसाय आणि इतर कारणांमुळे घर आणि कुटुंबापासून नेहमी दूर कुठेतरी राहत असतात. अशा परिस्थितीमध्ये त्यांना घरासारखे अन्न मिळणे ही आजकालच्या काळामध्ये सर्वात मोठी समस्या बनलेली आहे.

म्हणूनच आपण जर टिफिन सेवेचा व्यवसाय सुरू करून अशा लोकांना घरबसल्या जेवण पूर्वत असाल तर ही आपल्यासाठी खूपच मोठी व्यवसाय संधी निर्माण होऊ शकते.

मित्रांनो आज आपण टिफिन बनवण्याचा उद्योग व्यवसाय याबद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेऊया जेणेकरून आपला उद्योग हा खूपच चांगल्या प्रकारे सुरू होईल.

टिफिन बनवण्याचा उद्योग व्यवसाय याबद्दल माहिती मराठीमध्ये

ज्या महिलांना कमी पैशांमध्ये आपल्याला घरबसल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा असेल असा विचार करत असेल त्या महिलांसाठी हा व्यवसाय खूपच महत्त्वपूर्ण बनणार आहे.

भविष्यामध्ये कठोर परिश्रम घेऊन सर्वाधिक कमाई करणारा हा व्यवसाय खूपच मोठा बनू शकतो यासाठी तुम्हाला हा व्यवसाय खूपच चांगल्या पर्यायाने नफा कमवून देऊ शकतो. मित्रांनो कोविड-19 च्या काळामध्ये काळापासून या व्यवसायामध्ये लक्षणीय पद्धतीमध्ये वाढ झालेली आहे.

टिफिन बनवण्याचा व्यवसाय कसा सुरु करावा

मित्रांनो, आपण हा व्यवसाय दोन प्रकारांमध्ये सुरू करू शकता स्वतःची जागा असल्यास हा व्यवसाय आपण सुरू करू शकता. तसेच ऑफिसमध्ये तसेच कामाच्या ठिकाणी टिफिन सेवा देऊन देखील हा व्यवसाय आपण सुरू करू शकता.

मित्रांनो, पहिल्या प्रकारांमध्ये आपल्याकडे नेहमीच जागेची उपलब्धता असावी लागत असते. तसेच आपल्या आजूबाजूच्या असणाऱ्या कामाच्या ठिकाणी किंवा कॉलेजमध्ये शिकणारे विद्यार्थी राहत असेल तर आपण आपल्या ठिकाणी तसाच सेटअप देखील करू शकता. आपल्याला टेबल खुर्चीची देखील आवश्यकता लागत असते.

तसेच मित्रांनो दुसऱ्या प्रकारांमध्ये तुम्हाला जर तुमच्याजवळ स्वतःचे वाहन असेल तर तुम्ही टिफिन सेवा सहज पोहोच करू शकता. बरेच ठिकाणी ऑफिस कॉलेज जवळ मेस नसतात अशा ठिकाणी तुम्ही तुमची सेवा अगदी उत्तम रित्या देऊ शकता.

टिफिन उद्योगासाठी लागणारे साहित्य कोणकोणते आहेत

1) मित्रांनो, जेवण बनवण्यासाठी आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये भांडी लागत असतात त्याचबरोबर इतर भांडी देखील लागत असतात.

2) टिफिन सेवा देण्याकरिता तुम्हाला टिफिन ची आवश्यकता देखील खूपच चांगल्या प्रकारे लागत असते.

3) टेबल खुर्च्या देखील आपल्याला लागत असतात तसेच किती ग्राहक आपल्याकडे येणार आहेत याच्या हिशोबाने देखील आपल्याला टेबल खुर्च्या खरेदी करावे लागत असतात.

4) जेवण बनवण्यासाठी इतर सामग्री देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लागत असते.

टिफिन सेवा तसेच टिफिन बनवण्याच्या उद्योगासाठी लागणारे परवाने

1) शॉप ॲक्ट लायसन लागत असते.

2) FSSAI लायसन लागत असते.

3) ट्रेड लायसन्स मित्रांनो हे लायसन्स आपल्याला महानगरपालिके मार्फत दिले जाते. जे महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये व्यवसाय करतात त्यांच्यासाठी हे लायसन दिले जाते.

4) फायर बी ग्रेड ची एनओसी देखील लागत असते.

टिफिन सेवा तसेच टिफिन बनवण्याच्या उद्योगासाठी मार्केटिंग कशी करावी

मित्रांनो, प्रत्येक व्यवसायाचा महत्त्वाचा पार्ट असतो तो म्हणजे मार्केटिंग या व्यवसायासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते. ती जेवणाची चव आणि दर्जा जर मित्रांनो आपल्याकडे जेवणाची चव आणि कॉलिटी चांगली असेल तर ग्राहक आपल्याकडे चांगल्या प्रकारे येऊ शकतात.

मित्रांनो या व्यवसायांमध्ये ग्राहकांना एकदा कळलं की या ठिकाणी चांगले दर्जेदार जेवण भेटत असते. तर तुम्हाला जास्त काही करण्याची गरज देखील लागत नाही.

तसेच मित्रांनो तुम्ही तुमच्या टिफिन बनवण्याचे सेवा असेल टिफिन बनवत असतील या सर्विस साठी तुम्ही कार्ड देखील छापून वेगवेगळ्या ऑफिसला भेट देऊन तुम्ही तिथून ग्राहक देखील मिळू शकतात. तसेच तुमच्या भागामध्ये देखील तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकता.

टिफिन सेवा आणि टिफिन बनवण्याच्या उद्योगासाठी गुंतवणूक किती लागते

मित्रांनो, टिफिन सेवा आणि टिफिन बनवण्याच्या उद्योगासाठी गुंतवणूक ही जवळ पर्यंत एक लाखापर्यंत लागते. ज्या भांडे खुर्ची टेबल इतर सामान जागेचे भाडे असा सर्व मिळून एक लाखांपर्यंत खर्च येत असतो.

टिफिन सेवा आणि टिफिन व्यवसाय मध्ये घ्यायची काळजी

1) आपल्या टिफिन बनवण्याच्या उद्योगांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या असतील हे देखील आपण लक्षात ठेवले पाहिजे. लोकांना ऑप्शन नुसार घेता येईल अशा भाज्या पण मेनूमध्ये ठेवल्या पाहिजे.

2) मित्रांनो, व्हेज बरोबर नॉनव्हेज खाणारे लोक देखील असतील त्यांच्यासाठी आपण आठवड्यातून दोन दिवस नॉनव्हेज ठेवू शकता.

3) मित्रांनो, आपण स्वच्छतेच्या बाबतीमध्ये तडजोड करू नये. तसेच पिण्यासाठी स्वच्छ पाणी राहील याची देखील आपण काळजी घेतली पाहिजे.

4) रेगुलर जेवणामध्ये पापड, लोणचे, चटणी अशा इतर गोष्टी नेहमी असाव्यात बऱ्याच लोकांना याची आवड खूपच मोठ्या प्रमाणामध्ये असते.

5) आपल्याकडे काही सण उत्सव वेळी पुरणपोळी तसेच गोड पदार्थ करत असतात. आपण पण अशा गोष्टी केल्या तर लोक नक्कीच आपल्याकडे आकर्षित होत असतात.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला टिफिन बनवण्याचा उद्योग तसेच टिफिन सेवा याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो टिफिन बनवण्याचा उद्योग तसेच टिफिन सेवा याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला आणखी कोणतेही व्यवसाय बद्दल माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो वरील प्रमाणे दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending