Upsc exam information in Marathi: मित्रांनो, भारतीय प्रशासन व्यवस्था चालवण्यासाठी नेहमी उत्तम प्रशासकांची गरज असते. उत्तम प्रशासकांची निवड करण्यासाठी लोकसेवा आयोग नेहमी कार्यरत असतो.
केंद्रीय पातळीवर संघ लोकसेवा आयोग नेहमी कार्यरत असतो. चांगल्या प्रशासकांची निवडीसाठी आयोग विविध परीक्षा घेत असतो. आज आपण यूपीएससी परीक्षेबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो चला तर कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया upsc exam information in Marathi.
अनुक्रमणिका
Upsc exam information in Marathi
केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या विविध परीक्षा होत असतात. देशातील सर्वोच्च अशी नागरी सेवा परीक्षा केंद्रीय लोकसेवा आयोग घेत असतो या परीक्षेमधून आयएस आयपीएस आणि आयएफएस असे अनेक अधिकारी निवडले जात असतात.
मित्रांनो आपल्यापैकी बऱ्याच विद्यार्थ्यांना नेहमी प्रश्न पडलेला असतो की कलेक्टर होण्यासाठी नक्की काय करावे लागते. मित्रांनो कलेक्टर होण्यासाठी केंद्रीय नागरी सेवा परीक्षा द्यावी लागते.
मित्रांनो या परीक्षेसाठी आयुष्याची बरेच वर्षे खर्ची करावी लागत असतात. देशातील सर्वोच्च अशी ही परीक्षा आहे याचे भान तयारी करताना प्रत्येक उमेदवाराने ठेवावे लागत असते.
परीक्षा ही खूप कठीण असते याचा अर्थ असा होत नाही की अशक्य आहे. योग्य मार्गदर्शन आणि वेळेचा प्रभाव वापर केलास तर कमी कालावधीमध्ये देखील युपीएससी परीक्षा पास होणे सहज आणि शक्य आहे.
Upsc म्हणजे काय
मित्रांनो, संघ लोकसेवा आयोग ही एक स्वतंत्र असे असणारे संस्था आहे यूपीएससी द्वारे प्रत्येक वर्षी परीक्षा घेतल्या जातात. यामधून एकूण 24 पदांची भरती केली जात असते. ही 24 पदे देशातील सर्वोच्च नागरी सेवा देणारी पदे आहेत. भारतामध्ये घेतल्या जाणाऱ्या सर्वात कठीण परीक्षांमध्ये यूपीएससी चे नाव असते.
मित्रांनो यूपीएससीचे मुख्यालय हे नवी दिल्ली येथे आहे. यूपीएससीची संस्थेची स्थापना १ ऑक्टोंबर 1926 रोजी करण्यात आली होती नंतर यूपीएससी ला भारतीय संविधानानुसार मान्यता देखील देण्यात आली.
यूपीएससीचे संस्था पूर्णपणे केंद्र सरकारच्या नियंत्रणात असते. राज्य सरकारला यामध्ये हस्तक्षेप करण्यास अनुमती नसते. संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेतून आयएएस आयपीएस असे विविध अधिकारी निवडले जातात.

यूपीएससी परीक्षेसाठी पात्रता काय आहे
यूपीएससी साठी परीक्षेसाठी पात्रताही विद्यार्थी हा मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा. मुक्त विद्यापीठातील पदवीदेखील ग्राह्य मानले जात असते.
पदवीही किमान पात्रता आहे सर्वोच्च पात्रता कोणती असू शकते. फक्त भारतीय नागरिक यूपीएससी साठी पात्र असतात तसेच वयोमर्यादा ही कमीत कमी 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 37 वर्ष आहे. यामध्ये कास्ट नुसार वयोमर्यादा देखील सामील आहे.
यूपीएससी परीक्षेचे स्वरूप काय आहे
1) पूर्व परीक्षा
2) मुख्य परीक्षा
3) मुलाखत

यूपीएससी चा फुल फॉर्म काय आहे
युनियन पब्लिक सर्विस कमिशन हा यु पी एस सी चा फुल फॉर्म आहे.
यूपीएससी परीक्षेचा इंटरव्यू कोणत्या भाषेमध्ये घेतला जातो
मित्रांनो, सामान्यपणे यूपीएससीचा इंटरव्यू घेणारे बोर्ड हे इंग्रजीमध्ये प्रश्न विचारात असते त्यामुळे तुम्हाला इंग्रजी येणे खूपच गरजेचे आहे. तसेच तुम्ही तुमच्या मातृभाषेमध्ये हिंदी किंवा मराठीमध्ये देखील इंटरव्यू देऊ शकता. त्यासोबत तुम्हाला इंग्रजी येणे खूपच गरजेचे आहे.

यूपीएससीची कार्य कोणते आहेत
1) भारताच्या राष्ट्रपतींनी आयोगाला नियुक्त केलेल्या कोणत्याही विषयावर नेहमी सरकारला सल्ला देणे.
2) भारत देशामध्ये सरकारी सेवा आणि पदांसाठी भरती नियम तयार करणे आणि त्यामध्ये सुधारणा करणे.
3) केंद्रीय सेवांमध्ये नोकरी शोधणाऱ्यांसाठी भरती परीक्षा घेणे.
4) मुलाखतींच्या निवडी द्वारे देखील थेट उमेदवारांची भरती करणे.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला जर कलेक्टर तसेच भारतातील सर्वोच्च पदाची नोकरी करायचे असेल तर आपल्याला यूपीएससी परीक्षा द्यावी लागणार आहे.
मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली युपीएससी परीक्षेबद्दल सर्व माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणतेही परीक्षेबद्दल माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा.
तसेच आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. यूपीएससी एक्झाम याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.