Connect with us

business ideas

भाजीपाला विक्री व्यवसाय कसा करावा | How to Start a Vegetable Selling Business in Marathi

Published

on

भाजीपाला विक्री व्यवसाय कसा करावा

भाजीपाला विक्री व्यवसाय कसा करावा: मित्रांनो, आज आपण एक वेगळीच व्यवसाय कल्पना घेऊन आलेलो आहोत. मित्रांनो आज आपण भाजीपाला विक्री व्यवसाय बद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

मित्रांनो हा व्यवसाय आपण आपल्या घरापासून देखील सुरू करू शकता या व्यवसायासाठी आपल्याला खूप काही गुंतवणुकीची गरज नसते. चला तर मित्रांनो सविस्तर माहिती जाणून घेऊया भाजीपाला विक्री व्यवसाय बद्दल.

भाजीपाला विक्री व्यवसाय कसा करावा How to Start a Vegetable Selling Business in Marathi

मित्रांनो, आपण जर शेतकरी असाल तर भाजीपाला पिकवून तो विक्री करण्याचा व्यवसाय खूपच चांगल्या पद्धतीने करू शकता आणि तुम्ही स्वतःला देखील निरोगी ठेवू शकता.

सर्वप्रथम भाजी कशी विकायची ते शिका

जर मित्रांनो तुम्ही भाजीपाला व्यवसाय मध्ये नवीन असाल आणि तुम्हाला जास्त यामधल्या ज्ञान नसेल तर त्यामुळे तुम्ही कोणतेही जुन्या भाजी विक्रेत्याकडून याबद्दलची अधिक माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करावा.

तसेच आपण स्वतः जवळच्या भाजीपाला मार्केटमध्ये जाऊन भाजीपाला किती भावांमध्ये येतो ते पाहावे. आणि किती नफ्यावर भाजीपाला विकला जातो याचे देखील माहिती जाणून घेणे खूपच गरजेचे असते.

साधारणपणे चार ते पाच दिवसांमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी समजतील त्यानंतर तुम्ही तुमचा व्यवसाय अगदी सहजपणे कोठेही सुरू करू शकतात.

भाजीपाला कोठून खरेदी करावा

जर मित्रांनो तुम्ही शेतकरी असाल तर तुम्ही तुमचा पिकवलेला भाजीपाला देखील विक्रीसाठी पाठवू शकता. जर तुम्ही शेती करत नसाल तर तुम्ही कोणतेही बाजारामधून भाजीपाला विकत घेऊ शकता आणि त्याचा व्यवसाय सुरू करू शकता.

तसेच मित्रांनो आपण थेट शेतकऱ्यांशी संपर्क साधून भाजीपाला खरेदी करू शकता. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेल्या भाजीपाल्यामध्ये तुम्हाला अधिक मोठ्या प्रमाणामध्ये नफा मिळेल इतर भाजीविक्रेत्यांपेक्षा कमी दरामध्ये भाजीपाला विक्री करण्यामध्ये तुमचा फायदा देखील होईल.

भाजीपाला या व्यवसायासाठी काही परवाना लागतो का

जर मित्रांनो तुम्हाला तुमच्या गावांमध्ये किंवा छोट्या बाजारामध्ये भाजीचे दुकान सुरू करून पैसे कमवायचे असतील तर तुम्हाला यासाठी कोणतेही प्रकारच्या परवान्याची गरज लागत नाही.

परंतु मित्रांनो तुम्हाला हा व्यवसाय दीर्घकाळ चालवायचा असेल तर तुम्हाला भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण यांच्याकडून उद्योग आधारचा परवाना घ्यावा लागेल. यासाठी तुम्हाला तुमच्या दुकानाची नोंदणी देखील करावी लागेल आणि वेळोवेळी कर देखील भरावा लागेल.

भाजीपाला होलसेल विक्रीचा व्यवसाय कसा करावा

मित्रांनो, भाजीपाल्याचा होलसेल व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला एक ते अडीच लाखापर्यंत खर्च येत असतो. जेवढा खर्च येत असतो तेवढाच नफा देखील तुम्हाला होलसेल मध्येच मिळत असतो. अशा पद्धतीने आपण भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू करू शकता.

भाजीपाला व्यवसाय जास्त प्रमाणामध्ये कसा वाढवावा

मित्रांनो, तुम्ही तुमच्या व्यवसाय मध्ये ग्राहकांना होम डिलिव्हरी देखील देऊ शकता. मित्रांनो तुम्हाला व्यवसायाच्या सुरुवातीला थोड्या टप्प्यांमध्ये कमी नफ्यामध्ये भाजीपाला विकावा लागतो.

हे पाहून तुमच्याकडे जास्त ग्राहक येत असतात. आणि तुमचा व्यवसाय वाढण्यात देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मदत होत असते. ग्राहकांना नेहमी ताजी भाजी आपण द्यावी.

अशा ग्राहकांना बांधून ठेवा जेणेकरून त्यांना तुमच्याकडे वारंवार यायला आवडेल. अशा पद्धतीने तुम्ही आपला व्यवसाय हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढवू शकता.

भाजीपाला विक्री व्यवसाय मध्ये नफा किती मिळत असतो

मित्रांनो, भाजीपाला हा व्यवसाय असा व्यवसाय जो कधीही बंद होऊ शकत नाही. मग तुम्हाला याचा फायदा हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. मित्रांनो भाजीपाला व्यवसाय मध्ये 50 टक्के नफा होत असतो.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे भाजी विक्री व्यवसाय कसा करावा याबद्दलची दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला भाजीपाला विक्री व्यवसाय याबद्दल दिलेले माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला वरील प्रमाणे माहिती भाजीपाला विक्री बद्दल आणखी माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो भाजीपाला विक्री व्यवसाय बद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कधीही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending