विहीर अनुदान योजना: मित्रांनो, आपल्याला शेतीसाठी पाण्याची गरज असेल आणि विहीर खोदायचे असेल तर आज आम्ही आपल्यासाठी विहीर अनुदान योजना घेऊन आलेलो आहोत.
मित्रांनो महाराष्ट्र सरकारच्या विहीर अनुदान योजना या योजनेसाठी अनुदान सुरू झालेले आहे. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया विहीर अनुदान योजना काय आहे याबद्दल अगदी सविस्तर माहिती.
अनुक्रमणिका
विहीर अनुदान योजना माहिती मराठीमध्ये Vihir Subsidy Scheme Information in Marathi
महाराष्ट्र सरकारने आता शेतकरी बांधवांना लखपती करण्याचा चंगच बांधलेला आहे. त्यामुळे मित्रांनो आता मागेल त्याला सिंचन विहीर मिळणार आहे.
महाराष्ट्र राज्यातील असणारे प्रत्येक कुटुंब लखपती करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत सिंचन विहिरीची कामे लवकरात लवकर पूर्ण केली जाणार आहेत.
विहीर अनुदान योजनेमध्ये लाभार्थ्याची निवड कशी केली जाते
मित्रांनो, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये विहीर अनुदान दिले जाते. यासाठी खालील प्रमाणे लाभधारकांची निवड केली जाते.
1) अर्जदार हा अनुसूचित जाती भटक्या जमाती यामध्ये असावा.
2) अर्जदार हा विमुक्त जाती यामध्ये देखील असावा.
3) दारिद्र्यरेषेखाली असणारा अर्जदार याला देखील विहीर मिळू शकते.
4) स्त्री कर्ता असलेली कुटुंबे यांना देखील विहीर अनुदानामध्ये प्रथम प्राधान्य दिले जाते.
5) इंदिरा आवास योजनेखालील असणारे लाभार्थी.
विहीर अनुदान योजनेमध्ये लाभार्थ्याची पात्रता काय असावी लागते.
1) अर्जदाराकडे किमान दीड एकर क्षेत्र सलग असावे लागते.
2) अर्जदाराकडे सातबारावर पूर्वी विहिरीची नोंद असू नये.
3) अर्जदाराकडे एकूण क्षेत्राचा दाखला असावा.
4) अर्जदाराकडे जॉब कार्ड असणे बंधनकारक आहे.
विहीर अनुदान योजनेसाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत
1) ऑनलाईन सातबारा उतारा लागत असतो.
2) जॉब कार्ड झेरॉक्स प्रत लागत असते.
3) सामुदायिक विहीर असेल तर पाणी वापराबाबत सर्व लाभार्थ्याचे करार पत्र लागत असते.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली विहीर अनुदान योजना याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो आपल्याला विहीर अनुदान योजना याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच मित्रांनो आपल्याला आणखी कोणतेही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.
विहीर अनुदान योजना याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.