विधवा अनुदान योजना: मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र सरकारने विधवा अनुदान योजना सुरू केलेली आहे याची माहिती जाणून घेणार आहोत. तसेच याचे लाभ कोणते आहेत, त्याचबरोबर पात्रता काय आहे,
आवश्यक कागदपत्रे कोणती त्याचप्रमाणे अर्ज कुठे कसा करायचा याबद्दलची आज सर्व आपण माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया विधवा अनुदान योजना काय आहे ती.
अनुक्रमणिका
विधवा अनुदान योजना माहिती मराठीमध्ये
महाराष्ट्र सरकारने विधवा पेन्शन योजना राज्यातील आर्थिक दुर्बल विधवा महिलांसाठी सुरू केलेले आहे. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना अंतर्गत महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील असणाऱ्या गरीब कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा सहाशे रुपयांची आर्थिक मदत देखील केली जात आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी बनवले जात आहे. जेणेकरून या गरीब विधवा महिलांना आर्थिक समस्येचा सामना करावा लागू नये आणि त्यांचे वृद्ध काळातील जीवन हे सोयीचे होईल. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने येणाऱ्या वर्षांमध्ये 23 लाखांचे बजेट तयार केलेले आहे.
विधवा अनुदान योजना या योजनेचे उद्दिष्ट काय आहे
1) महाराष्ट्र विधवा पेन्शन योजना अंतर्गत महाराष्ट्र सरकारने राज्यातील गरीब असणाऱ्या कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा सहाशे रुपयांच्या आर्थिक मदत जाहीर केलेली आहे.
या योजनेअंतर्गत महिलांना स्वावलंबी केले जाणार आहे. ज्या अंतर्गत महिलांना आर्थिक मदत देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे.
2) महाराष्ट्र सरकारच्या योजना अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील विधवा महिलांच्या आर्थिक गरजा तसेच त्यांना स्वावलंबी बनवणे हे या योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे.
या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील ज्या विधवा महिलांना आधार नाही त्यांना अर्थिक आधार देऊन स्वावलंबी बनवण्यात येणार आहे.
विधवा अनुदान योजनेसाठी पात्रता काय आहे
1) अर्जदार महाराष्ट्र राज्याचा कायम रहिवासी असला पाहिजे.
2) विधवा अनुदान योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार महिलेचे वय हे 65 वर्षांपेक्षा कमी असावे.
3) अर्जदाराचे वार्षिक उत्पन्न हे 21 हजारांपेक्षा जास्त नसावे.
4) अर्जदाराचे राष्ट्रीयकृत बँकेमध्ये बँक खाते असले पाहिजे.
5) दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या सर्व विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात.
विधवा अनुदान योजनेसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे कोणती
1) अर्जदार महिलेचे मतदान कार्ड आणि आधार कार्ड लागत असते.
2) बँक पासबुक लागत असते.
3) पासपोर्ट आकाराचे फोटो लागत असतात.
4) मोबाईल नंबर लागत असतो.
5) वय प्रमाणपत्र लागत असते.
6) जातीचे प्रमाणपत्र लागत असते.
7) पतीचे मृत्यूचे प्रमाणपत्र लागत असते.
8) उत्पन्न प्रमाणपत्र लागत असते.
विधवा अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा
विधवा अनुदान योजनेसाठी अर्ज करण्यासाठी सर्वप्रथम आपण अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी. अधिकृत संकेतस्थळावर गेल्यानंतर तुम्हाला मुखपृष्ठ आपल्यासमोर उघडेल
या मुखपृष्ठावर आपल्याला महाराष्ट्र विधवा निवृत्ती वेतन योजनेचा अर्जाचा पीडीएफ डाउनलोड करावा लागेल हा पीडीएफ डाउनलोड केल्यावर तुम्हाला त्याची माहिती त्या पीडीएफ मध्ये मिळेल.
विधवा अनुदान योजना या योजनेसाठी कोणत्या महिला अर्ज करू शकतात
दारिद्र्य रेषेखालील असणाऱ्या सर्व विधवा महिला या योजनेसाठी अर्ज करू शकतात. महाराष्ट्र विधवा पेन्शन योजनेअंतर्गत
महाराष्ट्र शासनातर्फे राज्यातील गरीब असणाऱ्या कुटुंबातील विधवा महिलांना दरमहा सहाशे रुपयांचे आर्थिक मदत आपण अर्ज भरल्यानंतर मिळत असते.
निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती विधवा अनुदान योजना याबद्दलची माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.
मित्रांनो आपल्याला विधवा अनुदान योजना याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणत्याही अनुदान योजनेबद्दल माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की विचारा.
आम्ही माहिती लवकरात लवकर घेऊन येण्याचा प्रयत्न करू. तसेच मित्रांनो विधवा अनुदान योजना याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.