Connect with us

business ideas

अन्न प्रक्रिया उद्योग माहिती Food Processing Business Information Marathi

Published

on

अन्न प्रक्रिया उद्योग माहिती मराठी

अन्नप्रक्रिया उद्योग माहिती मराठी: मित्रांनो आजकालच्या काळामध्ये तसेच येणाऱ्या भविष्यामध्ये देखील माणसाचे अन्न ही मूलभूत गरज राहणार आहे. म्हणूनच खाद्यपदार्थांना नेहमीच भरपूर मागणी असणार आहे.

म्हणून मित्रांनो आज आपण अन्नप्रक्रिया उद्योग कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न घालवता जाणून घेऊया अन्न प्रक्रिया उद्योग कोणकोणते आहेत याबद्दलची सर्व माहिती अगदी सविस्तर रीत्या.

अन्नप्रक्रिया उद्योग माहिती मराठीमध्ये Food Processing Industry Information in Marathi

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये ज्यांना व्यवसाय सुरू करायचा असेल तसेच त्यांच्याकडे भांडवल हे कमी असेल तसेच मोठी जागा देखील नसेल अशांसाठी अन्नप्रक्रिया उद्योग हा खूपच चांगला उद्योग आहे. विविध प्रकारचे अन्नधान्य वापरून टिकाऊ खाद्य पदार्थ बनवणे ह्या उद्योगाचे स्वरूप असते.

मित्रांनो भारत देशाचा जर आपण विचार केला तर भारत देशामध्ये अन्नधान्य क्षेत्राची वाढ ही प्रचंड वेगाने होत आहे. यात नफा होण्याचे प्रमाण देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे.

तसेच या क्षेत्रामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये संधी देखील उपलब्ध आहेत. भारतीय अन्न आणि किराणा बाजार हा जगातील सहा नंबरचा सर्वात मोठा बाजार असून अन्नप्रक्रिया उद्योग एकूण खाद्य पदार्थ बाजाराच्या 32 टक्के इतका वाटा आहे.

मित्रांनो, आपला भारत देश हा मोठ्या लोकसंख्येचा असणारा देश आहे. त्यामुळे दाट लोकवस्तीच्या देशात आपल्या भारत देशामध्ये उत्पादनांना नेहमीच बाजार उपलब्ध होत असतो.

शिवाय बँका आणि इतर वित्तीय संस्था देखील विविध प्रकारची आर्थिक आणि अनुदानही या उद्योगासाठी देत असतात.

त्यामुळे असे कोणते उद्योग आपण करू शकतो खूपच योग्य ठरत असते. चला तर मित्रांनो आपण आजकालच्या काळामध्ये अन्नप्रक्रिया उद्योग कोणकोणते करू शकतो याची माहिती जाणून घेऊया.

1) काजू प्रक्रिया उद्योग

अन्न प्रक्रिया उद्योग माहिती मराठी

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये कमीत कमी गुंतवणुकीमध्ये चांगला फायदा देणार हा व्यवसाय आहे. मित्रांनो कच्चा काजू हा दीडशे रुपये किलो मिळत असतो आणि काजू वर प्रक्रिया करून याचे मूल्य हे वाढत असते. तसेच यासाठी आपल्याला हजार ते बाराशे रुपयांपर्यंत देखील भाव मिळू शकतो.

मित्रांनो कच्चा काजू हा दीर्घकाळ टिकत असल्यामुळे त्याची वाहतूक अडचणीमध्ये काही अडचण येत नाही. त्यामुळे आपण कुठेही व्यवसाय सुरू करू शकतो मित्रांनो काजू व्यवसायासाठी लागणारी यंत्रसामग्री ही अगदी कमीत कमी आहे.

आणि यासाठी यंत्रसामग्री ही महाग देखील नाही. आपण एका खोलीमध्ये देखील काजू प्रक्रिया उद्योग सुरू करू शकतो. काजू अजून विविध प्रकारे आहारामध्ये समाविष्ट केले जातात. काजूच्या बोंडापासून तयार होणारा रंग हा उद्योग क्षेत्रामध्ये खूपच मागणी असणारा पदार्थ आहे.

काजू हे अनेक प्रकारे खाल्ले जातात. त्यामध्ये नुसते तयार केलेले काजू, खारवलेले काजू, तळलेले काजू असे अनेक प्रकारे काजू खाल्ले जातात.

तर मिठाई बनवणारे हलवाई बिस्किटे बेकरी चॉकलेट बनवणाऱ्या कंपन्या यांना देखील काजूची खूपच मोठ्या प्रमाणामध्ये गरज असते. म्हणूनच मित्रांनो आपण काजू प्रक्रिया उद्योग सुरू केल्यानंतर आपल्याला यामध्ये खूपच चांगल्या प्रकारे फायदा मिळणार आहे.

2) केळी वेफर्स

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये केळी वेफर्स ला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे. केळ्याचे काप तयार करून विशिष्ट द्रवामध्ये बुडवून नंतर ते ओवन मध्ये वाळवले जातात.

मित्रांनो आजकालच्या काळामध्ये जेवण झाल्यानंतर तोंड शुद्ध करण्यासाठी तोंडात टाकण्यासाठी वेफर्स ला खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे.

वेफर्स हे स्थानिक बाजारांमध्ये देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये विकले जाते. तसेच त्याची निर्यात देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असते.

मित्रांनो केळी वेफर्स या उद्योगाची सुरुवात ही छोट्या प्रमाणावर करता येते तसेच हे केळी वेफर्स हे खाद्य प्रकारांमध्ये मोडत असतात.

3) डाळी

अन्न प्रक्रिया उद्योग माहिती मराठी

भारत देशामध्ये रोजच्या आहारामध्ये डाळींचा समावेश हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. मित्रांनो डाळी तयार करण्याचा व्यवसाय नक्कीच फायदेशीर ठरू शकतो.

भारत देशामध्ये डाळ पिकांचे उत्पादन हे मोठ्या प्रमाणावर होत असते. तसेच डाळीचे उत्पादन हे सर्व राज्यांमध्ये घेतले जात असते. डाळी बनवण्याचा उद्योग जर मित्रांनो आपण सुरू केला तर मोठ्या प्रमाणामध्ये यामधून नफा मिळत असतो.

भारत देशामध्ये अन्नप्रक्रिया उद्योगात डाळि तयार करणे हा तीन नंबरचा मोठा उद्योग आहे. भारत देशामध्ये कच्च्या मालाचा पुरवठा हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो.

तसेच कच्चामाल हा सतत उपलब्ध होत असतो आपल्याकडे भारत देशामध्ये तूर, उडीद, मूग, मसूर, मटकी, पावटा, हरभरा अशा अनेक धान्यांपासून डाळी बनवले जात असतात. आणि या डाळींना रोजच्या रोज खूपच मोठ्या प्रमाणामध्ये मागणी आहे.

4) आले लसूण पेस्ट

भारतीय पदार्थांमध्ये वापरले जाणाऱ्या मसाल्यामध्ये हळद, हिंग, मोहरी, जिरे याप्रमाणेच आले आणि लसूण यांचा वाटा देखील खूप महत्त्वाचा आहे.

आपण तयार करत असणाऱ्या पदार्थाला खमंग चव तिखटपणा देण्यासाठी आणि औषधी गुणधर्माने परिपूर्ण म्हणून आले लसून वाटण विविध पदार्थांमध्ये वापरले जाते.

पचनक्रियेला उत्तेजन देणारे हे पदार्थ खूपच महत्त्वाचे आहे. म्हणूनच आपण अन्नप्रक्रिया उद्योगांमध्ये आले लसूण यांची पेस्ट तयार करून विकण्याचा प्रयत्न करावा हा देखील व्यवसाय आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा असा असणारा व्यवसाय आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे अन्नप्रक्रिया उद्योग माहिती याबद्दल दिलेले माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला अन्नप्रक्रिया उद्योग याबद्दल दिलेले माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणतीही प्रकारची माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच अन्नप्रक्रिया उद्योग याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending