जिल्हा उद्योग केंद्र योजना नमस्कार मित्रांनो आज आम्ही आपल्यासाठी जिल्हा उद्योग केंद्र योजना कोणकोणते आहेत याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत.
मित्रांनो आपल्याला जर व्यवसाय सुरू करण्याचा आपण जर विचार करत असाल तर आपल्याला खूपच शासनाच्या योजना आहेत. तसेच येणारा काळ हा व्यवसाय करण्याचा असणारा काळ आहे म्हणूनच मित्रांनो आपण जर व्यवसायाचा विचार करत असाल तर आपल्या साठी हा लेख आज खूपच महत्त्वपूर्ण होणार आहे.
आज आम्ही या लेखांमध्ये सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मिळवण्याचे उद्दिष्ट हे केंद्र सरकारचे खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे त्या मार्फत जिल्हा उद्योग केंद्रामार्फत खूपच मोठ्या प्रमाणामध्ये योजना राबवल्या जातात. त्याचबरोबर पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम हा देखील आजकालच्या काळामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये रोजगार निर्मितीचे उद्दिष्ट ठरत आहे.
अनुक्रमणिका
जिल्हा उद्योग केंद्र योजना District Industries Centre Scheme in marathi
आपल्या साठी जिल्हा उद्योग केंद्र योजना कोणकोणत्या आहेत
चला तर मित्रांनो आपण आज सविस्तररीत्या जाणून घेऊया की जिल्हा उद्योग केंद्राच्या योजना कोणकोणते आहेत ते तसेच आपण जर व्यवसाय सुरू करत असाल तर आपल्याला जिल्हा उद्योग केंद्राच्या योजनेमध्ये कोणकोणत्या योजनेचा फायदा होऊ शकतो हे देखील आपण आज जाणून घेणार आहोत चला तर मग सविस्तर जाणून घेऊया जिल्हा उद्योग केंद्र योजना याबद्दल.

पंतप्रधान रोजगार निर्मिती कार्यक्रम ( जिल्हा उद्योग केंद्र योजना )
ग्रामीण व शहरी भागांमध्ये नेहमी मोठ्या प्रमाणामध्ये रोजगारांच्या संधी निर्माण होण्याकरिता भारत सरकारने पंतप्रधान रोजगार निर्मिती योजना ही संपूर्ण भारत देशामध्ये दोन ऑक्टोबर 2008 पासून राबविण्यात येत आहे.
तसेच मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेचा फायदा देखील उद्योजकांनी घेतलेला आहे या योजनेचा सेवा उद्योग यांच्यासाठी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होत आहे.
या योजनेमध्ये 25 लाखांपर्यंत कमाल उत्पादित उद्योगांना कर्ज दिले जाते तसेच दहा लाखांपर्यंत कामाला व्यवसाय सेवा उद्योग घटकांना अर्थसहाय्य बँकांमार्फत केले जाते.
खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आपण उद्योग सुरू करत असताना पाच ते दहा टक्के रक्कम हे उद्योग घटकास स्वतःची तसेच स्वतः गुंतवणूक करावी लागते 90 ते 95 टक्के कर्ज हे बँक देत असते.
सुधारीत बीज भांडवल योजना
ही योजना महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळातर्फे योजना राबविण्यात येते तसेच महात्मा फुले विकास महामंडळातर्फे विविध योजना देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये राबवले जातात.
यामध्ये बीज भांडवल योजना देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत कमीत कमी 50 हजार ते जास्तीत जास्त पाच लाखांपर्यंत राष्ट्रीयकृत बँकांमार्फत कर्ज देखील मंजूर केले जाते.
यामध्ये बँकेचे कर्ज हे 75 टक्के असते तसेच महामंडळाचे कर्ज हे 20 टक्के असते तसेच उर्वरित पाच टक्के रक्कम ही अर्जदाराची असते.
सुधारीत बीज भांडवल योजना साठी लागणारी कागदपत्रे
जातीचा दाखला |
उत्पन्नाचा दाखला |
व्यवसायाच्या अनुषंगाने कागदपत्रे जसे की, मालाचे किंमतीपत्रक, आवश्यक असल्यास व्यवसायाच्या जागेचा पुरावा, गुमास्ता लायसन्स, व्यवसायानुरुप इतर कागदपत्रे वाहनाकरिता लायसन्स, गुमास्ता लायसन्स, परमिट, बॅच नंबर इत्यादी |
रहिवाशी पुरावा (रेशनकार्ड, मतदार ओळखपत्र, आधारकार्ड, पॅन कार्ड, इलेक्ट्रीक बिल इत्यादी) |

उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम
सुशिक्षित बेरोजगारांना रोजगारासाठी नेहमी प्रवृत्त करण्याच्या उद्दिष्टाने उद्योजकता प्रशिक्षण कार्यक्रम राबवला जातो. सदर प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये मार्गदर्शक शिबिरे व प्रशिक्षण एक खूपच मोठ्या प्रमाणामध्ये घेतली जातात.
या सुशिक्षित बेरोजगार रोजगार शिबिरांमध्ये त्यामध्ये उद्योग सेवा यांकरिता मार्गदर्शन देणे तसेच जागेसंबंधी असणाऱ्या आवश्यक प्रकल्प अहवाल तयार करणे नीर निराळे परवाने मिळवण्याच्या पद्धती विक्रीकरता आवश्यक असणाऱ्या बाबी इत्यादीबाबत उपयुक्त माहिती नेहमी दिले जाते.
ही योजना महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र मिटकॉन उद्योग संचालय ना मार्फत मान्यता दिलेल्या अशासकीय कुशल प्रशिक्षक संस्था मार्फत देखील चालवली जाते.
- उद्योजकता परिचय कार्यक्रम (१ दिवसीय, अनिवासी)
एका दिवसाच्या परिचय कार्यक्रमासंदर्भात व्यवसायाची निवड उद्योजकीय व्यक्तिमत्व विकास व्यवसाय व्यवस्थापन शासनाच्या विविध असणारे संस्था तसेच अर्थसहाय्य देणाऱ्या संस्था यांच्या मार्फत राबविल्या जाणाऱ्या योजनांची माहिती दिली जाते. तसेच या एक दिवसीय अनिवासी प्रशिक्षणासाठी प्रति प्रशिक्षण कार्यक्रम सहाशे रुपये खर्च येत असतो.
- उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम (१२ दिवसीय, निवासी)
हे प्रशिक्षण कार्यक्रम बारा दिवसांचे आहेत या ठिकाणी निवासी व भोजन व्यवस्थेसह हे प्रशिक्षण आहेत. उद्योजकता परिचय कार्यक्रमांमध्ये निवडलेल्या प्रशिक्षण त्यांना उद्योगाशी संबंधित कलागुणांचा विकास व माहिती मिळवण्याचा प्रशिक्षणात प्रामुख्याने खूपच मोठ्या प्रमाणामध्ये समावेश असतो. प्रति प्रशिक्षणार्थी चार हजार रुपये संस्थेस देण्यात येतात.
- तांत्रिक प्रशिक्षण कार्यक्रम (१५ दिवस ते २ महिने अनिवासी)
या असणारे प्रशिक्षण कार्यक्रमामध्ये उत्पादन सेवा उद्योगांचे निगडीत तांत्रिक प्रशिक्षण नेहमी देण्यात येते हे प्रशिक्षण निवासी असून प्रशिक्षणार्थी इस 15 दिवसांकरिता 500 रुपये आणि दरमहा एक हजार रुपये तसेच दोन महिन्याच्या प्रशिक्षण कार्यक्रमासाठी दोन हजार रुपये विद्यावेतन देण्यात येते. तसेच प्रति प्रशिक्षणार्थी प्रतिमहा तीन हजार रुपये संस्थेस देण्यात येतात.
समूह विकास प्रकल्प
समूह विकास प्रकल्प ही एक केंद्र शासनाची योजना आहे या योजनेअंतर्गत जिल्ह्यामध्ये बांबू समूह प्रकल्प विकसित करण्यात येत असून केंद्रशासनाच्या समूहाच्या नैदानिक चाचणीत अहवालाला याठिकाणी मान्यता मिळालेले आहे.
कारागिरांच्या क्षमता वृध्दी कार्यक्रमास नेहमी उत्तेजन मिळावे याकरिता सात लक्ष रुपये केंद्र शासनाचे अनुदान देखील या योजनेमध्ये आहे.
या समूह विकास प्रकल्प योजनेद्वारे सुविधा केंद्र उभारण्याचे प्रस्तावित या योजनेमध्ये या समूह विकास प्रकल्प योजनेमध्ये 1000 कारागिरांना प्रत्यक्ष रोजगार मिळवण्याची अपेक्षा या योजनेमध्ये आहे.
तसेच राईस मिल समूह विकास प्रकल्प जिल्ह्यामध्ये विकसित करण्याचे प्रस्तावित देखील या योजनेमध्ये आहे.
जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना
ग्रामीण भागामध्ये ग्रामीण कारागीर यांकरिता जिल्हा उद्योग केंद्र योजनेअंतर्गत कर्ज योजना राबविण्यात येत असून या योजनेअंतर्गत रुपये दोन लक्ष प्रकल्प रकमेची सेवा उद्योग
उद्योगांसाठी कर्ज प्रकरणे बँकांना शिफारस केली जातात.खूपच मोठ्या प्रमाणामध्ये या योजनेमध्ये लाभार्थ्यांना वयाची व शिक्षणाची अट नाही परंतु तो ग्रामीण कारागिर असावा.
या योजनेअंतर्गत लाभार्थ्याला 20 टक्के ते 30 टक्के जिल्हा उद्योग केंद्र कर्ज जास्तीत जास्त रुपये 60 लक्ष चार टक्के व्याजाने देण्यात येते.
अर्जदार हा अनुसूचित जाती जमाती मध्ये असल्यास 30 टक्के प्रमाणे मार्जिन मनी देण्यात येते. आपण जर ग्रामीण असाल हा देखील जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजने साठी आपल्याला खूपच महत्त्वाचा असणारा फायदा होऊ शकतो या योजनेचा.
जिल्हा पुरस्कार योजना
लघु उद्योग सुरू करणाऱ्यांना उद्योजकास नेहमी प्रोत्साहन मिळावे व त्यांनी संपादन केलेल्या प्रतीत यशाची साभार पोच द्यावी या हेतूने राज्य सरकारतर्फे जिल्हा पातळीवर जिल्हा पुरस्कार योजना 1985 साली सुरू करण्यात आली.
या योजनेसाठी कमीत कमी तीन वर्षे नोंदणी झालेला तसेच सलग दोन वर्षे उत्पादन करीत असलेल्या घटकांचा मालक भागीदार संचालक जिल्हा पुरस्कारासाठी पात्र ठरू शकतो.

जिल्हा उद्योग केंद्र योजना या योजेनचे असणारे निकष
- वयोमर्यादा : १८ ते ४५ ( अनुसुचीत जाती, अनुसुचित जमाती, महिला व माजी सैनिक यांना ५० वर्ष)
- शैक्षणिक पात्रता : प्रकल्प रु. १० ते २५ लाखासाठी ७ वी पास, प्रकल्प रु. २५ ते ५० लाखासाठी १० वी पास
- उत्पादन उद्योग : कमाल प्रकल्प मर्यादा ५० लाख असायला हवे
- सेवा उद्योग : कमाल प्रकल्प मर्यादा १० लाख असावी.
जिल्हा उद्योग केंद्र योजना या योजनेसाठी लागणारी कागदपत्रे
- पासपोर्ट साइज फोटो
- आधार कार्ड
- जन्म दाखला (शाळा सोडल्याचा दाखला, डोमिसीयल सर्टिफिकेट)
- शैक्षणीक पात्रता प्रमाणपत्र (आपले शिक्षण किती झाले याचा पुरावा जसे दहावी, बारावी, पदवीचे गुणपत्रक)
- हमीपत्र
- प्रकल्प अहवाल
- जातीचे प्रमाणपत्र ( अ. जा., अ. ज. असेल तर)
- विशेष प्रवर्ग असेल तर प्रमाणपत्र ( माजी सैनिक, अपंग)
- कौशल्य विकास प्रशिक्षण झाले असेल तर प्रमाणपत्र
- लोकसंख्याचा दाखला (२० हजार पेक्षा कमी लोकसंख्या असेल तर)
- पार्टनरशिप उद्योग असेल तर रजिस्ट्रेशन प्रमाणपत्र
- अधिकार पत्र व घटना
जिल्हा उद्योग केंद्र योजना District Industry Center Scheme निष्कर्ष
मित्रांनो, आपल्याला जिल्हा उद्योग केंद्र योजना या कोण कोणते आहेत याची सविस्तर माहिती आम्ही वरीलप्रमाणे दिलेले आहेत. तसेच मित्रांनो आपल्याला जिल्हा उद्योग केंद्र योजना यासाठी लागणारी कागदपत्रे कोणकोणती आहेत हे देखील आम्ही आपल्याला सांगितलेले आहे.
तसेच जिल्हा उद्योग केंद्र योजने साठी कोण कोणते निकष आहेत हे देखील आपण याला आम्ही सांगितलेले आहे. मित्रांनो आपल्याला जर कोणताही व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असाल तर वरील दिलेल्या योजना आपल्यासाठी खुपच महत्वाच्या आहेत.
मित्रांनो आपल्याला जिल्हा उद्योग केंद्र योजना याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला नक्की कमेंट द्वारे कळवा. आम्हाला अशी आशा आहे की आपल्याला जिल्हा उद्योग केंद्र योजना याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडले असेल.
मित्रांनो आपल्याला जर जिल्हा उद्योग केंद्र योजना याबद्दल कोणतीही माहिती आणखी हवी असतील तर आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.
किराणा दुकान कर्ज योजना माहिती