Connect with us

Information

Income Certificate Document in Marathi | उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी महत्वाची कागदपत्रे

Published

on

Income certificate document in Marathi

Income certificate document in Marathi: मित्रांनो आज आपण उत्पन्नाचे प्रमाणपत्र याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो उत्पन्नाचे प्रमाणपत्र हे प्रमाणपत्र आहे जे आपल्या कुटुंबाचे मासिक आणि वार्षिक उत्पन्न दाखवत असते.

आज आपण जाणून घेणार आहोत की उत्पन्नाच्या प्रमाणपत्राचा वापर हा कुठे कुठे होत असतो, त्याबद्दल तसेच उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कोण कोणती कागदपत्रे लागतात याबद्दल चे सर्व माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारे कागदपत्रे कोणकोणते आहेत याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे income certificate document in Marathi

आपल्याला जर उत्पन्नाचा दाखला काढायचा असेल तर आपण ऑफलाइन तसेच ऑनलाईन अशा दोन प्रकारे उत्पन्नाचा दाखला काढू शकतो. मित्रांनो ऑनलाईन अर्ज केल्याने आपला वेळ देखील वाचत असतो तसेच आपल्याला रांगेत उभे राहावे देखील लागत नाही.

तसेच उत्पन्नाचा दाखला ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जास्त धावपळ देखील करावी लागत नाही. चला तर मित्रांनो जाणून घेऊया उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागतात याबद्दल अगदी सविस्तर माहिती.

Income certificate document in Marathi

1) ओळख पुरावा

 • पॅन कार्ड
 • मतदान कार्ड
 • आधार कार्ड

2) पत्त्याचा पुरावा

 • टेलिफोन बिल
 • विज बिल
 • शिधापत्रिका
 • चालक परवाना

3) जन्म तारखेचा पुरावा

 • जन्म प्रमाणपत्र
 • शाळा शिकत असलेला तसेच शाळा सोडल्याचा दाखला

4) उत्पन्नाचा पुरावा

 • आयकर प्रमाणपत्र जोडावे लागते
 • सातबारा तसेच तलाठी अहवाल जोडावा लागतो
 • निवृत्तीवेतनधारकांसाठी बँकेचे प्रमाणपत्र देखील जोडावे लागते

ऑनलाइन इनकम सर्टिफिकेट कसे काढावे

मित्रांनो, आपल्याला ऑनलाइन करण्यासाठी तुम्हाला तुमच्या राज्याच्या असणाऱ्या वेबसाईटवर जावे लागेल जसे की उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, महाराष्ट्र इत्यादी राज्यांसाठी वेगवेगळे पोर्टल तयार करण्यात आलेली आहे.

या पोर्टलवर आल्यानंतर तुम्हाला तुमच्या सिटीजन पोर्टल निवडावे लागेल तसेच लॉगिन करावे लागेल. त्याचप्रमाणे आयडी आणि पासवर्ड तयार करावा लागेल जर तुम्ही उमेदवार असाल तर तुम्हाला नवीन खाते तयार करावे लागेल नोंदणीसाठी एक तुम्हाला फॉर्म देखील भरावा लागेल.

Income certificate document in Marathi

उत्पन्नाचा दाखला ऑफलाईन कसा काढावा

 • मित्रांनो, ऑफलाईन उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी सर्वप्रथम आपण तहसील कार्यालयामध्ये गेले पाहिजे.
 • तहसील कार्यालय मध्ये गेल्यानंतर आपल्याला उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी फॉर्म घेतला पाहिजे त्यामध्ये व्यवस्थित माहिती भरली पाहिजे.
 • मित्रांनो, तुम्ही जर गावांमध्ये राहत असाल तर तहसीलदारांकडून पडताळणी करून घ्या.

अशाप्रकारे सर्व प्रक्रिया तसेच कागदपत्रे जमा केल्यानंतर आपल्याला दहा दिवसांपर्यंत उत्पन्नाचा दाखला मिळू शकेल तसेच मित्रांनो तुम्ही उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी कॉमन सर्विस सेंटरला भेट देऊन देखील तुमचे इन्कम सर्टिफिकेट मिळवू शकता.

मित्रांनो, आजकालच्या काळामध्ये उत्पन्नाचा दाखला हा देशातील प्रत्येक नागरिकांकडे असणे आवश्यक आहे. उत्पन्नाचा दाखला हा अनेक कारणांसाठी योग्य मानला जात असतो.

मित्रांनो उत्पन्नाचा दाखला हा दरवर्षी एप्रिल महिन्यांपासून ते पुढील महिन्याच्या मार्चपर्यंत तयार केले जाते जरी हे प्रमाणपत्र तहसीलदारांकडून प्रमाणीत केले जाते. म्हणजेच काही राज्यांमध्ये जिल्हा दंडाधिकारी जिल्हाधिकारी महसूल मंडळ त्याचप्रमाणे अधिकारी किंवा उपविभागीय दंडाधिकारी इत्यादी देखील हे प्रामाणिक करू शकतात.

निष्कर्ष

मित्रांनो, आपण लक्षात घेतले पाहिजे की अर्ज फॉर्म तसेच आवश्यक कागदपत्रे हे तुमच्या स्थानिक तहसीलदार कार्यालय मध्ये नेहमी उपलब्ध असतात तुम्ही त्यांची वेबसाईट देखील तपासू शकता किंवा अधिक माहितीसाठी तहसील कार्यालयाशी संपर्क देखील साधू शकता.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती ही इन्कम सर्टिफिकेट कागदपत्रे याबद्दलची नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपल्याला आणखी कोणतीही माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा.

तसेच वरील प्रमाणे दिलेली उत्पन्नाचा दाखला कागदपत्रे याबद्दलची माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending