Connect with us

Information

ST जात वैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी लागणारी कागदपत्रे | ST Caste Validity Certificate Document in Marathi

Published

on

ST Caste Validity Certificate Document in Marathi

St caste validity certificate document in Marathi: जात पडताळणी करणे हे एक महत्त्वाचे काम आहे. जात पडताळणी केल्यानंतर आपल्याला सरकारी नोकरी तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये प्रवेश घेण्यासाठी त्याचप्रमाणे अनेक सरकारी योजनांसाठी आवश्यक ती मदत मिळत असते.

आज आपण एसटी जात पडताळणी कागदपत्रे कोणकोणते आहेत याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया एसटी जात पडताळणी कागदपत्रे कोणते आहेत.

ST Caste Validity Certificate Document in Marathi एसटी जात पडताळणी कागदपत्रे

आपल्याला एसटी जात पडताळणीसाठी आवश्यक ते कागदपत्रे खालील प्रमाणे सादर करणे गरजेचे असते.

1) ओळखीचा पुरावा

  • पॅन कार्ड
  • आधार कार्ड
  • ड्रायव्हिंग लायसन्स

2) पत्त्याचा पुरावा

  • आधार कार्ड
  • रेशन कार्ड
  • मतदान कार्ड

3) जात प्रमाणपत्र

एसटी जात पडताळणीसाठी जात प्रमाणपत्र हे सर्वात महत्त्वाचे असे असणारे कागदपत्र आहे.

4) वंशावळ

वंशावळ ही आपल्या जात प्रमाणपत्राला जोडून सादर केली जाणारी एक कागदपत्र आहे. यामध्ये अर्जदाराचे वडील आजोबा आणि इतर गोष्टींची माहिती असते.

5) शाळा सोडल्याचा दाखला

आपल्या शिक्षणाचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला लागत असतो.

6) प्रतिज्ञापत्र

प्रतिज्ञापत्र हे अर्जदाराचे जात प्रमाणपत्राची सर्वात मोठी सत्यता दर्शवणारे एक महत्त्वाचे कागदपत्र असते. यामध्ये अर्जदार स्वतःच्या जात आणि वंशावेळी बद्दलचे वचनबद्धता देत असतो.

एसटी जात पडताळणीसाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे

1) आपण केलेला अर्ज हा पूर्णपणे भरलेला असावा तसेच त्यावर ती सही केलेली असावी.

2) आपण दाखल केलेल्या कागदपत्रांवर संबंधित अधिकाऱ्यांची स्वाक्षरी असावी.

3) अर्जाची फी पूर्णपणे भरलेली असावी.

ST Caste Validity Certificate Document in Marathi

एसटी जात पडताळणीसाठी अर्ज फी किती आहे?

एसटी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी फि ही पन्नास रुपये आहे.

एसटी जात पडताळणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?

1) सर्वप्रथम आपण महाराष्ट्र सरकारच्या सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवर जावे.

2) वेबसाईटवर गेल्यानंतर जात पडताळणी प्रमाणपत्र या पर्यायावर क्लिक करावे.

3) त्या ठिकाणी आपल्याला ऑनलाईन अर्ज हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करावे.

4) आपल्याला आवश्यक ती माहिती भरावी आणि अर्ज सबमिट करावा.

5) अर्जाची फी भरण्यासाठी दिलेल्या लिंक वर क्लिक करावे.

6) अर्जाची फी भरल्यानंतर आपल्याला अर्जाची पावतीही आपण डाऊनलोड करावी.

7) अर्जाची पावतीसह संबंधित कागदपत्रे संबंधित जात पडताळणी कार्यालय मध्ये सादर करावी.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती एसटी जात पडताळणी याबद्दलची माहिती नक्कीच आवडली असेल तसेच आपल्या उपयोगाची आहे.

मित्रांनो आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कास्ट व्हॅलिडीटी सर्टिफिकेट फॉर एसटी कास्ट याबद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending