Connect with us

Information

शिक्षणातील गॅप सर्टिफिकेटसाठी लागणारी कागदपत्रे | Gap Certificate Document in Marathi

Published

on

Gap certificate document in Marathi

Gap certificate document in Marathi: आपल्या जर शिक्षणामध्ये खंड (गॅप ) पडला असेल तर आपल्याला कॅप सर्टिफिकेट सबमिट करण्याची आवश्यकता असते.

मित्रांनो आज आपण गॅप सर्टिफिकेट बद्दल कोण कोणते कागदपत्रे लागतात याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत. चला तर कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया गॅप प्रमाणपत्र साठी लागणारी कागदपत्रे कोणकोणते आहेत याबद्दल माहिती.

Gap certificate document in Marathi गॅप प्रमाणपत्रासाठी लागणारी कागदपत्रे

आपल्याला काही कारणांसाठी एका विशिष्ट कालावधीमध्ये शिक्षण पूर्ण करता येत नसेल तसेच त्या शिक्षणा मधून आपल्याला बाहेर पडायचे असेल तर काही संस्थांना अर्ज सोबतच गॅप सर्टिफिकेट देणे खूपच बंधनकारक असते. गॅप सर्टिफिकेट नसेल तर काही संस्था आपला प्रवेश देखील रद्द करू शकतो.

1) ओळखीचा पुरावा लागत असतो ज्यामध्ये आपण पॅन कार्ड, आधार कार्ड, मतदान कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स हे देऊ शकता.

2) शिक्षणामध्ये गॅप असण्याच्या कारणाचे समर्थन करणारे दस्तऐवज.

3) शाळा किंवा कॉलेज डिप्लोमा प्रमाणपत्र.

4) मागील शाळा किंवा संस्थेचे पत्र.

5) निवासी पत्त्याचा पुरावा.

6) नागरिकत्वाचा पुरावा.

7) शेवटची चाचणी पात्रता गुणपत्रिका.

गॅप सर्टिफिकेट चा उपयोग कशासाठी होतो?

ज्या लोकांनी शैक्षणिक क्षेत्रांमध्ये विश्रांती घेतलेली आहे अशा लोकांसाठी गॅस सर्टिफिकेट पात्र असते. तसेच शाळा कॉलेज विद्यापीठांमध्ये त्याचप्रमाणे भविष्यामध्ये अभ्यास करण्यासाठी प्रवेश घेण्यासाठी अर्ज करताना गॅप प्रमाणपत्र दाखल करणे काही संस्थांमध्ये बंधनकारक असते.

Gap certificate document in Marathi

1) आपण जर बेरोजगार असाल तर नोकरी मिळवण्यासाठी गॅप सर्टिफिकेट चा आपल्याला उपयोग होतो.

2) गॅप सर्टिफिकेट चा उपयोग हा परदेशामध्ये विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी केला जातो.

3) आपण जर आपले शालेय शिक्षण का पूर्ण केले नाही याचे देखील हे गॅप सर्टिफिकेट स्पष्ट करत असते.

4) गॅप सर्टिफिकेट असल्यास विद्यार्थ्यांना चिंता न करता शैक्षणिक तणावातून सुट्टी खूपच मोठ्या प्रमाणामध्ये घेता येते.

गॅप सर्टिफिकेट मध्ये कोणकोणती कारणे एक्सेप्ट तसेच स्वीकारले जातात?

1) आपली जर हालाखीची आर्थिक परिस्थिती असल्यास

2) आपण सतत आजारी असल्यास

3) आपले इतर वैयक्तिक कारण असल्यास

गॅप सर्टिफिकेट साठी अर्ज करण्याची प्रक्रिया

Gap certificate document in Marathi


1) आपण सर्वप्रथम संबंधित सरकारी कार्यालय मध्ये तसेच नोटरी कार्यालय मध्ये जावे.

2) कार्यालय मध्ये गेल्यानंतर गॅप सर्टिफिकेट अर्ज पूर्ण भरावा आणि त्याबरोबर आवश्यकते कागदपत्रे जोडा.

3) कागदपत्रे जोडल्यानंतर अर्ज फी भरा.

4) संबंधित अधिकाऱ्यांनी अर्जाची तपासणी केल्यानंतर आपल्याला गॅप सर्टिफिकेट मिळेल.

गॅप सर्टिफिकेट साठी अर्जाची प्रक्रिया ही राज्यानुसार बदलत असते. त्यामुळे अर्ज करण्यापूर्वी संबंधित सरकारी कार्यालय तसेच नोटरी कार्यालयाशी आपण संपर्क साधावा तसेच गॅप सर्टिफिकेट बद्दल अधिक माहिती जाणून घ्यावी.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला जर गॅप सर्टिफिकेट बद्दल दिलेली माहिती नक्कीच उपयोगी पडणार आहे अशी आम्हाला आशा आहे. तसेच आपल्याला गॅप सर्टिफिकेट बद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच मित्रांनो गॅप सर्टिफिकेट बद्दल दिलेली माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending