Connect with us

Information

विवाह नोंदणी कशी करावी | लग्नाची नोंदणी कशी करावी

Published

on

विवाह नोंदणी कशी करावी

विवाह नोंदणी कशी करावी मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये विवाह कायद्यांतर्गत विवाहाच्या नोंदणीसाठी नोंदणी करणे अतिशय सोपी झालेली आहे. तसेच महाराष्ट्र मध्ये ही प्रक्रिया अतिशय सोपी झालेली आहे.

चला तर मित्रांनो आपण आज जाणून घेऊयात की विवाह नोंदणी कशी करावी तसेच विवाह नोंदणी करण्यासाठी आपल्याला कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता असते याची देखील माहिती आज आपण जाणून घेणार आहोत.

त्याचबरोबर विवाह नोंदणी करण्यासाठी आपल्याला पात्रता काय असावी लागते याबद्दल देखील आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.

अनुक्रमणिका

घरबसल्या (लग्नाची) विवाह नोंदणी कशी करावी

मित्रांनो, विशेष विवाह कायद्यांतर्गत 1954 नुसार वधू-वरांना नियोजित विवाहाची नोटीस वय रहिवासी पुराव्यांच्या कागदपत्रासह जिल्ह्याच्या विवाह अधिकाऱ्यांकडे शुल्कासह सादर करावे लागते.

तसेच वधू वर अटींची पूर्तता करीत असल्यास ही नोटीस स्वीकारून विवाह अधिकारी ती नोटीस बोर्ड वर प्रसिद्ध करत असतात.

त्यापैकी दोघांपैकी एक जण इतर जिल्ह्यातील असल्यास या नोटीस ची प्रत जिल्ह्याच्या विवाह अधिकाऱ्याकडे देखील पाठवली जाते. ही प्रत नोटीस बोर्डवर प्रसिद्ध झाल्यानंतर

तीस दिवसांच्या कालावधीमध्ये आक्षेप न आल्यास कायदेशीर पद्धतीने विवाह करता येतो. जिल्हा मुख्यालयातील दुय्यम निबंधक हे विवाह अधिकारी म्हणून या ठिकाणी कार्यरत असतात.

सरकारने विशेष विवाह नोंदणी प्रक्रियेचे देखील संगणकीकरण केलेले आहे. खूपच मोठ्या प्रमाणामध्ये तसेच राज्यातील विवाह अधिकाऱ्यांची कार्यालय देखील मध्यवर्ती सर्वर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये जोडली गेलेली आहेत.

त्याचप्रमाणे ही एक ऑनलाईन प्रक्रिया ऑनलाईन अर्ज भरल्यानंतर आपल्याला संगणकीय प्रणाली द्वारे नोटीस क्रमांक व नोटीस दिल्यापासून 30 दिवसानंतर आणि सात दिवसांच्या आत अगोदर विवाह साठी तारीख sms द्वारे कळविण्यात येते.

तसेच अर्ज भरताना वधू वर यांचे आधार कार्ड त्याचप्रमाणे मोबाईल क्रमांक तसेच वधू वर यांच्या वयाचा आणि ओळखीचा तसेच रहिवासी पुरावा या तीन साक्षीदारांच्या ओळखीचा वर अशी पत्ता असणारा पुरावा आवश्यक आहे. तसेच ऑनलाईन नोटीस अर्ज भरण्यापूर्वी संगणकाला वेब कॅमेरा व थंब स्कॅनर देखील असणे गरजेचे आहे.

भारतामध्ये विवाह प्रमाणपत्र चे महत्व काय आहे

मित्रांनो, विवाहित असणे ही एक प्रकारचे अधिकृत घोषणा असते भारत देशामध्ये विवाह नोंदणीसाठी दोन कायदे करण्यात आलेले आहेत. एक म्हणजे हिंदू विवाह कायदा आणि दुसरा म्हणजे विशेष विवाह कायदा.

मित्रांनो हिंदू विवाह कायद्यांतर्गत दोन्ही पक्ष अविवाहित किंवा घटस्फोटीत असतील किंवा पहिल्या लग्नाच्या वेळी जोडीदार जिवंत नसेल तर लग्न केले जाऊ शकते हा कायदा हिंदूंना लागू आहे.

तर विशेष कायदा भारतातील सर्व नागरिकांना लागू आहे. हे दोन्ही फायदे हे निश्चित करतात की एखाद्या जोडप्याचे लग्न केला आणि हे दोघांवर एकमेकांबद्दल काही कायदेशीर जबाबदारी आहेत 2006 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचे लग्नाचे प्रमाणपत्र बनवण्याचा निर्णय घेतला स्त्रियांना त्यांचे हक्क मिळवून देणे हा त्याचा हेतू होता.

लग्नाची नोंदणी केली नसेल तर काय होते

एखाद्याने लग्नाची नोंदणी केली नसेल तर त्याचा विवाह अवैध ठरतो का या प्रश्नाचे उत्तर आज आपण घेऊन आलेलो आहोत. विवाहाची नोंदणी केली नाही आणि सामाजिक पुरावे असतील तर ते लग्न वैध आहे.

घटस्फोटाची कारवाई याच पद्धतीने केली जाईल विवाहाची नोंदणी करणे हा लग्नाचा कायदेशीर पुरावा आहे. विवाह नोंदणी प्रमाणपत्र अनेक ठिकाणी महत्त्वाचे ठरते.

मुलाचा ताबा मिळवणे, विमा दावा, बँकेतील नॉमिनेशन, आणि वारसा हक्कासाठी विवाह नोंदणी प्रमाणपत्र खूपच उपयुक्त ठरत असते.

भारत देशामध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र कोण जारी करत असते

मित्रांनो, विवाह कायद्यांतर्गत हिंदू विवाह कायद्यांतर्गत विवाह नोंदणीसाठी पती-पत्नी ज्या भागांमध्ये राहत असतात त्या भागाच्या असणाऱ्या उपविभागीय दंडाधिकारी कडे अर्ज करता येतो हा अर्ज सरकारी सुट्टीचा दिवस वगळता कोणत्याही दिवशी आपण करू शकतो.

भारत देशामध्ये कोठेही लग्नाची नोंदणीसाठी अर्ज करता येतो का

विवाह नोंदणीसाठी अर्ज ज्या भागांमध्ये जोडप्याचे वास्तव आहे त्या भागामध्ये त्या भागाच्या असणाऱ्या दंडाधिकारीच्या कार्यालयामध्ये विवाह अर्ज करता येतो. हे केवळ ऑफ लाईन नोंदणीसाठी आहे आता ऑनलाईन नोंदणी देखील आजकालच्या काळामध्ये करता येते.

भारत देशामध्ये पासपोर्टसाठी लग्नाचे प्रमाणपत्र आवश्यक आहे का

मित्रांनो, नवीन पासपोर्ट नियमानुसार 2018 मध्ये पासपोर्ट बनविताना विवाह प्रमाणपत्र आवश्यक नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे.

लग्नात अडचणी येत असतील तर स्त्रियांना पासपोर्ट मध्ये देखील यामुळे अडचणी येत होत्या अशा प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सरकारने हा निर्णय घेण्यात आलेला आहे. आता लग्नशिवाय जन्मलेल्या मुलांकडे देखील पासपोर्ट असू शकतात मात्र यासाठी काही वेगळे नियम तयार करण्यात आलेले आहेत.

विवाह नोंदणी कशी करावी

विवाह नोंदणी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किती टाइम लागत असतो

मित्रांनो, अलीकडच्या काळामध्ये ही प्रक्रिया खूपच वेगवान झालेले आहे आता केवळ सात ते पंधरा दिवसांमध्ये आपल्याला विवाह प्रमाणपत्र मिळत असते.

मात्र यासाठी जोडप्याला दंडाधिकारीच्या कार्यालयामध्ये जाऊन काही फॉर्म भरावे लागत असतात. याशिवाय ऑनलाइन नोंदणी मध्ये देखील आपल्याला अपॉइंटमेंट मिळण्यास काही दिवसांचा कालावधी लागतो.

हिंदू विवाह कायद्यांतर्गत अपॉइंटमेंट साठी सुमारे पंधरा दिवस लागतात. तसेच विवाह विशेष विवाह कायद्यांतर्गत 30 दिवसांचा कालावधी लागू शकतो.

विवाह प्रमाणपत्र बनवण्यासाठी किती खर्च येतो

मित्रांनो, हिंदू विवाह कायद्यांतर्गत विवाह नोंदणीसाठी फक्त शंभर रुपये शुल्क आकारण्यात येते ते ही अर्जाची फी आहे. तर विशेष विवाह कायद्याअंतर्गत ही दीडशे रुपये करण्यात आलेली आहे. याशिवाय अर्ज सोबत जमा करावे लागणाऱ्या प्रतिज्ञापत्रासाठी पाचशे रुपये खर्च येत असतो.

विवाह प्रमाणपत्र बनवण्यासाठी किती खर्च येतो

विवाह नोंदणीसाठी ऑनलाईन अर्ज कसा करावा

मित्रांनो, आपल्याला विवाह ऑनलाईन नोंदणी करायचे असेल तर त्यासाठी आपल्याला संबंधित राज्याच्या अधिकृत वेबसाईटवर जावे लागेल. जिल्ह्यात आपण राहतो तो जिल्हा निवडा व तिथे नोंदणीचा पर्याय मिळेल यावर क्लिक करून आपण सर्व माहिती भरावी लागेल.

सर्व माहिती काळजीपूर्वक तपासल्यानंतर आपण ती माहिती सबमिट करावे. यानंतर नोंदणीसाठी तारीख आपल्याला मिळते हिंदू विवाह कायद्यांतर्गत सुमारे दोन आठवड्याच्या आत आणि विशेष विवाह कायद्याअंतर्गत एक महिन्यात नोंदणी केली जाते.

विवाह नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

विवाह नोंदणीसाठी आवश्यक कागदपत्रे

1) वधू किंवा वराच्या नावावर असणारा रहिवासी पत्त्याचा दाखला, रेशन कार्ड पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, फोटो आयडी, शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र.

2) पाच पासपोर्ट आकाराची छायाचित्रे आधार कार्ड.

3) लग्न समारंभामध्ये घेतलेले लग्नाच्या वेशभूषांमधील वधू-वरांची लग्नाची छायाचित्रे.

4) वधू आणि वरांचे एफिडेविट.

5) वधू-वरांचे दहावीचे मार्क्स प्रमाणपत्र.

6) विवाह निमंत्रण पत्र कार्ड.

7) लग्नाची मंजुरी मिळवण्याकरता तीन साक्षीदार.

8) वधू-वरांचे प्रतिज्ञापत्र.

9) घटस्फोटीत असेल तर घटस्फोटाची कायदेशीर प्रत.

10) तीन साक्षीदार तीन साक्षीदारांचे पासपोर्ट साईज फोटो व तीन साक्षीदार राहण्याचा पुरावा.

11) वर वधू विधवा विधुर असतील तर जोडीदाराची मृत्यू प्रमाणपत्र.

अशाप्रकारे विवाह नोंदणीसाठी कागदपत्रे आवश्यक असतात.

लग्नाच्या नोंदणीसाठी कोणती पात्रता आहे

1) वधू वर हे कायमचे भारतामधील असणारे नागरिक असले पाहिजे.

2) वर 21 वर्षाचा असावा आणि वधूचे वय अठरा वर्ष पूर्ण असणे आवश्यक आहे.

3) जर मित्रांनो आपण वयोमर्यादाचा निकष पूर्ण करू शकत नसाल तर आपल्याला विवाह प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येत नाही.

विवाह नोंदणी कशी करावी याबद्दल शेवटचे शब्द

मित्रांनो, आपल्याला विवाह नोंदणी कशी करावी याबद्दल दिलेली माहिती आपण विवाह नोंदणी करण्यासाठी खूपच उपयोगी पडणार आहे. तसेच आपल्याला येणाऱ्या काळामध्ये जर विवाह करायचा असेल तरी देखील ही माहिती खूपच उपयोगी पडणार आहे.

मित्रांनो विवाह नोंदणी कशी करावी याबद्दल दिलेले माहिती आपण आपल्या मित्रांसमवेत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

तसेच आपल्याला विवाह नोंदणी कशी करावी याबद्दल आणखी काही माहिती हवी असल्यास आपण ते आम्हाला कमेंट द्वारे नक्की विचारा आम्ही आपल्याला ती माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करू.

1 Comment

1 Comment

  1. Pingback: मॅरेज सर्टिफिकेट साठी लागणारी कागदपत्रे [8 Documents Required]

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending