कोंबडी देवी रोग उपचार नमस्कार मित्रांनो, आज आपण कोंबड्यांना होणारा देवी रोग यावर उपचार कोणते आहेत याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. कोंबड्यांमध्ये रोगप्रतिकारक शक्ती कमी झाली तर त्यांना खूपच मोठ्या प्रमाणामध्ये रोगांशी सामना करावा लागतो.
तसेच देवी रोग हा त्यांच्यासाठी खूपच घातक असा असणारा रोग आहे. म्हणूनच आज आपण कोंबडी देवी रोग उपचार याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. तसेच देवी रोग हा कशामुळे होतो याची देखील माहिती आज जाणून घेणार आहोत.
अनुक्रमणिका
कोंबडी देवी रोग उपचार काय आहेत
देवी रोग
मित्रांनो, देवी रोग हा विषाणूपासून निर्माण होत असतो. या रोगाची लागण झाल्यानंतर कोंबड्याचा तुरा व डोळे लाल होत असतात तसेच पायावर पिसे नसलेल्या भागावर नेहमी पिवळे फोड येत असतात.
त्याचप्रमाणे दोन ते चार दिवसांनी त्या फोडावर खपली येत असते परंतु ती पडत असते या खपलीतून विषाणूंचा प्रसार हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये होत असतो. देवी या रोगाची लागण झाल्यानंतर कोंबड्यांची भूक ही मंदावत असते.
तसेच त्यांच्या नाकातून द्रव्य पदार्थ हा बाहेर पडत असतो. त्याचप्रमाणे तोंडामध्ये चिकट पदार्थ तयार होत असतो. त्यामुळे कोंबड्यांना खाद्य खाता येत नाही व कोंबड्या भुकेने मरत असतात.
देवी रोग लक्षणे
1) देवी रोगाचे फोड हे अन्ननलिका व श्वासनलिका यामध्ये येत असतात. तसेच घसा, नाक, तुरा, कानाचे भाग, डोळे यावर देखील लहान मोठे फोड हे येत असतात.
2) फोड आलेल्या जागे हे फोड फुटून त्यामधून पातळ व घाणेरडा चिकट द्रव वाहत असतो. त्या ठिकाणी जखमा होत असतात त्या बऱ्या झाल्यास त्या ठिकाणी खपल्या ह्या खूपच मोठ्या प्रमाणामध्ये पडत असतात.
3) बऱ्याच पक्षांमध्ये डोळ्यांवर आलेल्या फोडामुळे त्यांचे डोळे देखील जात असतात.
4) देवी आजारांमध्ये पक्षांना ताप येत असतो. तसेच अंडी उत्पादन देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये कमी होत असते.
5) देवी आजारामध्ये पक्षी हे खाणे पिणे बंद करत असतात.
6) शेवटी या आजारांमध्ये पक्षी हे अशक्तपणा येऊन खूपच दुबळे होत असतात आणि मरण पावत असतात.
देवी रोग उपचार
मित्रांनो, देवी या रोगाची पक्षांना लागण होऊ नये म्हणून आपण सहाव्या आठवड्यामध्ये देवी रोग प्रतिबंधक लस टोचून पक्षांना घ्यावी. हा रोग झाल्यास फोड आलेली जागा नेहमी पोटॅशियम परमॅग्नेटच्या पाण्याने धुऊन घ्यावी. अशा प्रकारे देवी रोगावर उपचार करावेत.
कोंबडी देवी रोग उपचार याबद्दलचा निष्कर्ष
मित्रांनो, कोंबडी देवी रोग उपचार याबद्दल दिलेली माहिती आपल्याला कुक्कुटपालनामध्ये खूपच उपयोगी पडणार आहे. तसेच आपल्याला कोंबडी देवी रोग उपचार याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आशा आम्हला आहे.
मित्रांनो आपल्याला कोंबडी देवी रोग उपचार याबद्दल आणखी माहिती हवी असल्यास ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. तसेच आपण आपल्या मित्रांसमवेत कोंबडी देवी रोग उपचार ही माहिती शेअर करण्यास कदापिही विसरू नका.