Connect with us

Information

माती परीक्षण कसे करावे Mati Parikshan in Marathi

Published

on

माती परीक्षण कसे करावे

माती परीक्षण कसे करावे मित्रांनो, आज आपण माती परीक्षण कसे करावे याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. माती परीक्षण करणे हे आजकालच्या काळामध्ये खूपच गरजेचे असते त्याचबरोबर आपला मातीचे असणारे महत्त्व देखील आज आपण यामध्ये जाणून घेणार आहोत. त्याच प्रमाणे आपण जर माती परीक्षण केले तर आपल्याला कोणकोणते माती परीक्षणाचे फायदे होऊ शकतात हे देखील आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर मग माती परीक्षण कसे करावे याबद्दल अगदी सविस्तर रीत्या माहिती जाणून घेऊया.

माती परीक्षण कसे करावे Mati Parikshan in Marathi

आपण जर एखादे पीक शेतामध्ये घेत असेल तर आपल्याला माती परीक्षण करणे खूपच गरजेचे असते. आपण शेतामध्ये घेत आहोत या पिकासाठी ती जमीन योग्य आहे का हे देखील माहीत असणे खूप गरजेचे असते. चला तर मग जाणून घेऊया अगदी महत्त्वपूर्ण माती परीक्षण कसे करावे याबद्दल माहिती.

माती परीक्षणाचे महत्व काय आहे

 • आपण आपल्या जमिनीतील माती परिक्षण केल्यामुळे आपल्याला आपल्या जमिनी मध्ये कोणते दोष आहेत हे तसेच कोणते घटक आहेत हे देखील लवकरात लवकर समजते.
 • माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला जमिनीतील येणाऱ्या पिकाचे नियोजन करता येते तसेच कोणते पीक जमिनीमध्ये घ्यावी हे देखील शेतकऱ्याला समजत असते.
 • जमीन सुधारण्यासाठी माती परीक्षण हे महत्वाचे असते माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला त्या पिकांमध्ये आपल्याला कोणती खते वापरावी. तसेच सेंद्रिय खते कोणती वापरावी हे देखील समजत असते.
 • माती परीक्षण केल्यानंतर आपल्याला आपल्या जमिनी मध्ये कोणत्या घटकांची कमी आहे हे जाणून घेण्याचा लवकरात लवकर मदत होते.
 • माती परीक्षण केल्यामुळे जमिनीची सुपीकता हे आपल्याला समजत असते. त्या बरोबरच आपल्याला जमिनीमधील उत्पादन क्षमता देखील वाढवण्यास मदत होत असते.
माती परीक्षण कसे करावे

मातीचा नमुना घेण्याची पद्धत काय आहे

मातीचा नमुना घेण्यासाठी आपण सर्वप्रथम शेतामध्ये जावे. शेता मध्ये गेल्यानंतर आपल्याला शेताची योग्यरीत्या पाहणी करावी. यानंतर आपण मातीची योग्यरीत्या पाहणी केल्यानंतर पृष्ठभागावर असणारा मातीचा रंग हा वेगळा असतो तसेच पृष्ठभागावरील माती ही वेगळ्या प्रकारचे असते. त्याचप्रमाणे चढ-उतार असणाऱ्या जमिनीवरील पृष्ठभागावरील माती ही वेगळ्या प्रकारचे असते.

तसेच सपाट असणाऱ्या जमिनीवरील माती ही वेगळ्या प्रकारचे असते. म्हणूनच आपण माती परीक्षण घेताना योग्य रीतीने माती घ्यावी.

माती परीक्षण कसे करावे
 1. एक सारखे जमिनीमधून आपण माती घेत असल्यास आपण त्या माती मध्ये येणारा कचरा ज्याप्रमाणे तसेच गवत यांसारखा कचरा आपण सर्वप्रथम माती मधून काढून टाकावा.
 2. ज्या ठिकाणी पिकांची लाईन मध्ये पेरणी केली असेल त्या ठिकाणी दोन लाईन मधील आपण मातीचा नमुना घ्यावा.
 3. ज्या ठिकाणी नुकतीच खते टाकलेली असेल तसेच ज्या ठिकाणी पाणथळ जमीन असेल त्याच प्रमाणे खोलगट जमीन असेल अशा ठिकाणच्या आपण माती परीक्षणासाठी मातीचा नमुना घेऊ नये.
 4. सपाट जमिनीवर आपण मातीमध्ये 30 बाय 30 चा खड्डा खणावा. त्यामध्ये आपण त्यामधून माती उचलावी ती माती आपण माती परीक्षणासाठी घ्यावी.
 5. आपण घेतलेली माती स्वच्छ माती एका प्लास्टिकच्या कागदामध्ये टाका व त्याचे चार समान भाग करावेत माती ओली असेल तर ती सुकवा. चार भाग केलेल्या भागांमधील दोन भाग घ्यावे व ते दोन भाग एकमेकांमध्ये मिसळावेत.

  एक किलो ग्रॅम होईपर्यंत ते एकमेकांमध्ये मिसळावे आणि हे एक किलो ग्रॅम चे मातीचे प्लास्टिकचे पॅकेट आपण माती परीक्षणासाठी पाठवू शकतो.

मातीचा नमुना कोठे पाठवतात आणि मातीचा नमुना कशा पद्धतीमध्ये पाठवला जातो

मातीचा नमुना घेतल्यानंतर आपण मातीची भरलेली प्लास्टिक बॅग ही आपल्या तालुक्याच्या तसेच जिल्ह्याच्या माती परीक्षण विभागाकडे पाठवावी. तसेच खालील माहिती त्या प्लास्टकच्या बॅग वरती लावून पाठवावे त्यामध्ये शेतकऱ्याचे नाव सिंचनाचा प्रकार जमिनीचा प्रकार त्याचप्रमाणे मागील जमिनीमध्ये घेतलेले पीक तसेच येणाऱ्या काळामध्ये घेण्यात येणारे पीक असे सर्व प्रकारची नावे लिहून त्या प्लास्टिकच्या बॅग वरती चिकटवा.

मातीचा नमुना घेताना आपण कोणती काळजी घ्यावी

 • मातीचा नमुना घेत असताना आपण वापरलेली अवजारे उदाहरणार्थ फावडा, कुदळ, घमले, खुरपे हे नेहमी स्वच्छ असणे अगदी गरजेचे असते. माती परीक्षण करणे पूर्वी वरील प्रमाणे अवजारे आपण सर्वप्रथम स्वच्छ करून घ्यावी.
 • मातीचा अहवाल हा पीक काढल्यानंतर त्याच प्रमाणे जमिनीची नांगरणी करण्यापूर्वी आपण माती परीक्षणासाठी जमिनीमधील माती घ्यावी.
 • उभे पिकांमध्ये आपल्याला मातीचा नमुना घ्यायचा असेल तर आपण पिकेही सरीवरती लावलेली असतील तर आपण दोन सरीमधील माती घ्यावी.
 • निरनिराळ्या जमिनी मधील मातीचे नमुने गोळा करत असताना एकमेकांमध्ये माती मिसळू नये.
 • मातीचा नमुना गोळा करत असताना माती भरण्यासाठी आपण रासायनिक खतांच्या पिशव्यांचा वापर करू नये.
 • माती ही शेतामधील रासायनिक खते ठेवण्याची जागा तसेच जनावरे बसण्याची जागा त्याच प्रमाणे झाडाखालील असणारी जागा तसेच पाणीसाठ्यात असणारी जागा या ठिकाणावरून मातीचा नमुना घेण्यासाठी आपण माती गोळा करू नये.

माती परीक्षण झाल्यानंतर काय करावे

माती परीक्षण झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या शेतामधील असणाऱ्या अन्नद्रव्यांची तसेच कोणते घटक कमी जास्त आहे त्याची माहिती अगदी योग्य रित्या आणि सखोल माहिती मिळत असते.

तसेच आपल्या शेतामध्ये नत्राचे प्रमाण किती आहे हे देखील शेतकऱ्यांना समजत असते. जर नत्राचे प्रमाण हे जास्त असल्यास आपण खतांची वापरण्याची पद्धत ही 25 टक्‍क्‍यांनी कमी केली पाहिजे. त्याचप्रमाणे नत्राचे प्रमाण हे कमी असल्यास आपण आपल्या शेतामध्ये खते वापरत असल्यास ती खते 25 टक्के जास्त वापरली पाहिजे.

काही जमिनीमध्ये जास्त प्रमाणामध्ये क्षेत्रांमध्ये खत घेतल्यामुळे तसेच डीएपी खत यांचा वापर हा जास्त प्रमाणामध्ये त्या ठिकाणी असणाऱ्या अन्नद्रव्यांमध्ये कॅल्शियम आणि गंधक यांचे प्रमाण हे कमी होत असते.

अशाप्रकारे जर शेतकऱ्यांनी आपल्या शेतामधील माती परीक्षण केले तर त्यांना आपल्या शेतामध्ये असणारे कोणत्या घटकांची कमतरता आहे. तसेच आपल्या शेतामधील माती मध्ये कोणते घटक जास्त आहेत याची माहिती मिळत असते. ज्यामुळे ते घेत असलेले पीक हे चांगल्या पद्धतीने घेऊ शकतात. हा माती परिक्षण केल्यामुळे शेतकऱ्यांना सर्वात मोठा असणारा फायदा होत असतो.

जमीन तपासणीसाठी मातीचा नमुना हा किती प्रमाणामध्ये खोलपर्यंत घ्यावा

मित्रांनो, आपण जर माती परीक्षणासाठी आपल्या जमिनीची तपासणी करत असाल तसेच आपल्याला आपल्या जमिनीमधील असणारी माती ही माती परीक्षण विभागांमध्ये पाठवायचे असेल तर आपण जमिनीमध्ये 60 सेंटिमीटर पर्यंत खोल खड्डा घेऊन जमिनीमधील माती काढावी. अशा प्रकारे जमीन तपासणीसाठी मातीचा नमुना घेण्यासाठी 60 सेंटिमीटर पर्यंत खोलपर्यंत नमुना घ्यावा.

माती परीक्षणाचे असणारे फायदे कोणते आहेत

माती परिक्षण केल्यामुळे आपल्याला जमिनीमधील असणारे घटकांचे प्रमाण समजते तसेच कोणत्या घटकांची कमतरता आहे हे देखील समजत असते.
माती परिक्षण केल्यामुळे आपण जमिनीमधील पिकांची योग्य रित्या निवड करू शकतो. तसेच आपल्या जमिनी मधील योग्य पीक कोणती येऊ शकते हे देखील आपल्याला समजत असते.
माती परिक्षण केल्यामुळे खतांची योग्यरीत्या मात्रा आपल्याला समजत असते म्हणून आपण योग्यरीतीने पिकांची वाढ करू शकतो.
माती परिक्षण केल्यामुळे आपल्याला पिकांची योग्य रित्या निवड करता येते.
माती परिक्षण केल्यामुळे आपल्याला जमिनीची सुपीकता आहे ठेवता येते तसेच पिकांचे योग्य प्रकारे नियोजन देखील करता येते.

अशाप्रकारे आपण आपल्या जमिनी मधील माती परिक्षण केल्यामुळे आपल्याला विविध प्रकारचे हे माती परिक्षण केल्यामुळे फायदे होत असतात.

माती परीक्षण कसे करावे Mati Parikshan in Marathi निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला माती परीक्षण कसे करावे याबद्दल दिलेली माहिती नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. तसेच आपल्याला माती परीक्षण कशा प्रकारे केले जाते हे देखील आम्ही वरील प्रकारे असणाऱ्या माहितीमध्ये आपल्याला सांगितले आहे.

त्याचबरोबर आपण जर माती परीक्षण पहिल्यांदा करत असाल तर आपल्याला योग्य ती माहिती देखील आम्ही वरील प्रमाणे दिलेले आहे. आपल्याला जर माती परीक्षण करताना कोणत्या प्रकारची अडचण येत असेल ते देखील आपण आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आम्ही आपल्यासाठी नेहमी ती अडचण दूर करण्याचा प्रयत्न करू. तसेच आपल्याला माती परीक्षण कसे करावे याबद्दल दिलेली माहिती कशी वाटली ते देखील आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा. आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending