Connect with us

business ideas

अगरबत्ती व्यवसाय कसा सुरु करावा । How to Start Agarbatti Business in Marathi

Published

on

अगरबत्ती व्यवसाय

अगरबत्ती व्यवसाय कसा सुरू करावा मित्रांनो, आपल्या भारत देशामध्ये लोकांना नेहमी धार्मिक कार्यामध्ये विशेष प्रमाणे रस खूपच मोठ्या प्रमाणे आहे. भारत देशामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये सर्व धर्माचे लोक आपले सण हे मोठ्या थाटामाटा मध्ये साजरे करत असतात.

भारत देशामध्ये सण असेल आणि पूजन नसेल तर काहीच होऊ शकत नाही हेच लक्षात घेता आम्ही आज तुमच्यासाठी अगरबत्ती व्यवसाय कसा करायचा याबद्दल माहिती घेऊन आलेलो आहोत.

अगरबत्ती व्यवसाय कसा सुरू करावा

मित्रांनो, अगरबत्ती व्यवसाय हा नेहमी दोन स्तरावरून सुरू करता येतो ज्यामध्ये एक लहान प्रमाणामध्ये अगरबत्ती व्यवसाय सुरू करता येतो.

दुसरा मोठ्या प्रमाणामध्ये अगरबत्ती व्यवसाय सुरू करता येतो. मित्रांनो व्यावसायिक सुरू करण्यापूर्वी तुम्हाला किती प्रमाणामध्ये मोठे व्हायचे आहे यावर व्यवसायाचे गणित अवलंबून असते.

यासाठी आपण बजेट देखील लक्षात घेतले पाहिजे मित्रांनो तुम्ही लहान किंवा मोठ्या स्तरावर देखील व्यवसाय सुरू करू शकता.

तसेच अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला कोणत्या प्रकारची नोंदणीची गरज लागणार आहे याची देखील आपण माहिती जाणून घेणारच आहोत.

मित्रांनो जर आपल्याला मोठ्या प्रमाणावर अगरबत्तीचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार आपण करत असाल तर आपल्याला कंपनीची नोंदणी करावी लागते.

अगरबत्ती व्यवसाय मध्ये वाव काय आहे

मित्रांनो, अगरबत्ती व्यवसायाची बाजारपेठ नेहमीच भारत देशामध्ये खूपच मोठ्या प्रमाणामध्ये आहे. सर्व धर्माचे लोक पूजेमध्ये अगरबत्तीचा वापर हा खूपच मोठ्या प्रमाणामध्ये करत असतात.

तसेच बरेच लोक आपल्या घरांना नेहमी सुगंधित ठेवण्यासाठी देखील घरामध्ये अगरबत्ती खूपच मोठ्या प्रमाणामध्ये लावत असतात.

भारत देश व्यतिरिक्त श्रीलंका तसेच अनेक परदेशी अमेरिका यांसारख्या परदेशात राहणारे भारतीय समुदाय देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अगरबत्तीचा वापर करत असतो.

यामुळे अगरबत्तीची मागणी ही वर्षभर बाजारामध्ये राहत असते. तसेच सणासुदीच्या काळामध्ये अगरबत्तीची मागणी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये वाढत असते.

अगरबत्तीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी टिप्स कोणत्या

मित्रांनो, आपण सर्वप्रथम बजेट ठरवले पाहिजे त्यानंतर आपण आपल्या बजेटमध्ये असलेल्या योजनांची यादी देखील तयार केली पाहिजे.

1) मित्रांनो, आपण आपल्या जवळच्या बाजारपेठेची माहिती घेणे खूपच आवश्यक असते ज्यामुळे मित्रांनो आपल्याला या व्यवसाय संदर्भात समस्या बद्दल तयारी ठेवता येईल.

2) व्यवसाय आपण कोठे सुरू करावा याबद्दल देखील माहिती असणे खूपच गरजेचे आहे.

3) अगरबत्ती व्यवसायासाठी आवश्यक वस्तूंची खरेदी कशी करायची तसेच त्याचे पॅकेजिंग कसे करायचे या गोष्टींची यादी आपण सर्वप्रथम तयार करणे खूपच गरजेचे असते.

अगरबत्ती व्यवसायासाठी योग्य जागा कशी निवडावी

मित्रांनो, व्यवसाय कोणताही सुरू करण्यापूर्वी त्या व्यवसायासाठी जागा शोधणे ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. ज्यामुळे आपल्याला कोणताही त्रास न होता व्यवसाय सुरू करता येईल जर मित्रांनो आपण अगरबत्तीचा छोट्या प्रमाणावर व्यवसाय सुरू करत असाल तर तुम्ही हा व्यवसाय घरबसल्या देखील करू शकता.

यासाठी तुम्हाला कमी जागा लागेल परंतु तुम्ही जर अगरबत्तीचा व्यवसाय हा मोठ्या प्रमाणावर सुरू करण्याचा विचार करत असाल तर यासाठी आपल्याला जागा जास्त प्रमाणामध्ये लागणार आहे.

तसेच त्यामधील असणारे अगरबत्ती बनवण्याचे यंत्र साहित्य सुरक्षित ठेवण्यासाठी जागा देखील आपल्याला लागणार आहे. यासाठी आपल्याला किमान पंधराशे चौरस फूट जागा लागत असते.

अगरबत्ती बनवण्यासाठी वेळ किती लागत असतो

मित्रांनो, अगरबत्ती बनवण्यासाठी वेळ हा तुम्ही कोणती मशीन वापरत आहात यावर खूपच मोठ्या प्रमाणामध्ये अवलंबून असतो. मित्रांनो आपण जर स्वयंचलित अगरबत्ती मशीन वापरत असाल तर आपल्याला एका मिनिटांमध्ये 200 ते 300 अगरबत्ती आपण बनवू शकता.

तसेच आपण जर हाताने अगरबत्ती बनवत असो तर लागणारा वेळ हा आपल्या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या गतीवर अवलंबून आहे.

अगरबत्ती बनवण्यासाठी कच्चा माल कोणता

  • कोळशाची धूळ
  • जिगट पावडर
  • पांढरी पावडर
  • चंदन पावडर
  • बांबूची काठी
  • परफ्युम
  • पेपर बॉक्स
  • रॅपिंग पेपर

अशाप्रकारे अगरबत्ती बनवण्यासाठी कच्चामाल लागत असतो.

अगरबत्ती व्यवसाय मध्ये जबाबदारी काय आहे

मित्रांनो, कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी त्या व्यवसायाची सर्व माहिती गोळा करणे खूपच गरजेचे असते. अगरबत्ती कधीही उन्हामध्ये वाळवू नये अगरबत्ती नेहमी सावलीत वाळवाव्यात तसेच वाळवण्याच्या यंत्रानेच अगरबत्ती वाळवाव्यात.

अगरबत्ती व्यवसायासाठी नोंदणी कशी करावी

1) अगरबत्ती व्यवसाय सुरू करण्यासाठी आपल्याला अगरबत्ती कंपनीची नोंदणी करणे खूपच गरजेचे असते.

2) तसेच आपल्याला अगरबत्ती व्यवसायाचे पॅन कार्ड असणे देखील गरजेचे आहे.

3) अगरबत्ती व्यवसाय ज्या नावाने केलेला आहे त्या नावाचे बँक खाते असणे गरजेचे आहे.

4) जीएसटी नोंदणी करणे गरजेचे असते अगरबत्ती व्यवसाय मध्ये.

अगरबत्ती व्यवसायाचे मार्केटिंग कसे करावे

मित्रांनो, कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी त्या व्यवसायाचे मार्केटिंग धोरण खूपच महत्त्वाची भूमिका बजावत असते. मित्रांनो अगरबत्ती विकण्यासाठी आपण जवळच्या किराणा दुकान मॉल किंवा खाऊक विक्रेत्यांची नेहमी संपर्क साधू शकता.

निष्कर्ष

मित्रांनो, आपल्याला जर अगरबत्ती व्यवसाय सुरू करायचा असेल तर आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती खूपच उपयोगी पडणार आहे.

तसेच अगरबत्ती व्यवसाय संदर्भात आपल्याला आणखी कोणत्याही प्रकारची माहिती हवी असल्यास आपण ते आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

आम्ही आपल्यासाठी नेहमी नवनवीन माहिती घेऊन येत असतो. तसेच वरील प्रमाणे दिलेली माहिती आवडली असेल तर आपण अगरबत्ती व्यवसाय या संदर्भात दिलेली माहिती आपण आपल्या मित्रपरिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Click to comment

Leave a Reply

Your email address will not be published.

Trending