Connect with us

Schemes

Gold Loan Information in Marathi | सोने तारण कर्ज संपूर्ण माहिती, नियम, कागदपत्रे, प्रक्रिया

Published

on

Gold loan information in Marathi

Gold loan information in Marathi: मित्रांनो, आपल्याला रोजच्या आयुष्यामध्ये अनेक अडचणी येत असतात त्याचबरोबर आर्थिक अडचणी देखील खूपच मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात.

सर्वसाधारण मनुष्य हा अशा वेळांसाठी नेहमी बचत गुंतवणूक करत असतो पण काही अडचणी अचानक समोर येऊन उभे राहत असतात.

त्यामध्ये मेडिकल असेल घर घेणे असेल मुलांची शाळा असेल असा प्रश्न अनेकांसमोर पडत असतो. यासाठी आपल्याला गोल्ड लोन हे खूपच मदत करत असते. आज आपण gold लोन बद्दल अगदी सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मित्रांनो कोणताही वेळ न वाया घालवता जाणून घेऊया गोल्ड लोन याबद्दल माहिती.

Gold Loan Information in Marathi सुवर्ण कर्जाची माहिती मराठीत

मित्रांनो, आज आपण गोल्ड लोन म्हणजे सोने तारण ठेवून घेतलेले कर्ज याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

गोल्ड लोन म्हणजे काय

जर मित्रांनो सामान्य माणसाला बचत कमी पडत असेल तर सामान्य माणूस हा नेहमी सोने तारण कर्जाकडे वळला जातो. मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये आणि पूर्वीपासूनच आपल्या भारतीयांचे सुवर्णप्रेम हे नेहमी जग जाहीर आहे.

मित्रांनो भारत देश हा सोने खरेदी करण्यासाठी जगामध्ये सर्वात अग्रस्थानी आहे. मित्रांनो भारत देशामध्ये प्रत्येक घरामध्ये किमान पाच ते सहा तोळे सोने ते जरूर असते.

सोनेतारण कर्ज प्रक्रिया काय आहे

मित्रांनो, सोने तारण कर्जाची प्रक्रिया ही तर कुठल्याही कर्जापेक्षा अत्यंत सोयीस्कर असते. आपल्याकडे जर सोने असेल तर आपण आवश्यक कागदपत्रांसह बँकेमध्ये जाऊन कर्जाची मागणी करू शकता.

बँक ही सोन्याचे मूल्यांकन करत असते आणि आवश्यक कागदपत्रांची पडताळणी देखील करत असते. जर मित्रांनो आपल्या सोन्याचे मूल्यांकन हे एक लाख रुपये असेल तर बँक आपल्याला 75 हजार रुपये पर्यंत कर्ज मंजूर करत असते.

बँकेमध्ये आणि तुमच्या मध्ये करार ठरवला जात असतो जसे की कर्जाची रक्कम व्याजदर आणि परतफेड करण्याचा कालावधी हा करार झाला की बँक तुमचे कर्ज लगेच तुमच्या ठरलेल्या बँक खात्यामध्ये जमा करत असते.

ही संपूर्ण प्रक्रिया सध्याच्या काळामध्ये एकदम सोपी झालेली आहे. अलीकडच्या काळामध्ये आपल्याला दोन तासांमध्ये कर्ज उपलब्ध होऊ शकते.

गोल्ड लोन घेण्यासाठी लागणारी कागदपत्रे

1) कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची ओळखपत्र तसेच पत्त्याचा पुरावा असणे आवश्यक असते.

2) पॅन कार्ड आवश्यक असते.

3) कर्ज घेणाऱ्या व्यक्तीचा फोटो असणे बंधनकारक आहे. जेणेकरून कर्ज घेणाऱ्या व्यक्तीची ओळख नेहमी पटेल.

गोल्ड लोन साठी असणाऱ्या काही नियम व अटी

मित्रांनो, तुम्ही गोल्ड लोन तसेच इतर कोणतेही कर्ज घेतात तेव्हा त्या सर्व बँकांच्या काही नियम व अटी असतात.

1) कर्ज घेत असताना नेहमी सर्व कागदपत्रे नीट वाचून घ्यावीत.

2) बँकेने दिलेल्या अटी व शर्ती यांचे नेहमी पालन करावे.

3) प्रत्येक बँकेचा व्याजदर हा वेगळा असतो.

गोल्ड लोन चे फायदे काय आहेत

1) गोल्ड लोन घेण्यासाठी आपल्याला जास्त कागदपत्रे देण्याची गरज भासत नाही.

2) गोल्ड लोन या कर्जाचा व्याजदर देखील इतर कर्जापेक्षा कमी असतो.

3) सोनेतारण कर्ज मध्ये तुमचा सिबिल स्कोर जरी कमी असला तरी तुम्हाला कर्ज मिळत असते.

4) सोने तारण कर्ज म्हणून घेतलेल्या कर्जाची रक्कम तुम्ही इतर कोणत्याही कारणांसाठी वापरू शकता.

5) सोने तारण या कर्जाचा खूपच महत्त्वाचा फायदा म्हणजे हे कर्ज आपल्याला इमर्जन्सी परिस्थितीमध्ये मिळत असते.

सोने तारण कर्ज घेताना काय करावे


1) जो व्यक्ती कर्ज घेणार आहे त्याच्याकडे सोन्याचे दागिने असावेत.

2) मित्रांनो तुमचे वय हे अठरा वर्षापेक्षा अधिक असावे.

3) सोन्याची शुद्धता ही 18 कॅरेट पेक्षा जास्त असावी

गोल्ड लोन साठी बँकांचे व्याजदर किती आहेत

  • स्टेट बँक ऑफ इंडिया 7.50%
  • बँक ऑफ इंडिया 8%
  • बँक ऑफ बडोदा 9%
  • बँक ऑफ महाराष्ट्र 7%
  • पंजाब नॅशनल बँक 7%

वरील प्रमाणे दिलेली माहिती ही काळानुसार बदलू शकते. त्यामुळे आपण बँकेमध्ये जाऊन एकदा खात्री करून घ्यावी वरील प्रमाणे दिलेले सर्व माहिती ही फक्त शैक्षणिक हेतूने दिलेली आहे.

निष्कर्ष

मित्रांनो, गोल्ड लोन हे आपल्यासाठी खूपच महत्त्वाचे असे असणारे आहे. आपल्याला अडचणीच्या काळामध्ये गोल्ड लोन खूपच महत्त्वाचे आहे.

मित्रांनो वरील प्रमाणे दिलेले माहिती आपल्याला नक्कीच आवडलेली असेल अशी आम्हाला आशा आहे. आपल्याला वरील प्रमाणे दिलेली माहिती कशी वाटली ते आपण आम्हाला कमेंट द्वारे नक्की कळवा.

तसेच आपल्याला कोणतेही आणखी माहिती हवी असेल ते देखील आपण आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. तसेच वरील प्रमाणे दिलेले माहिती आपण आपल्या मित्र परिवारासोबत शेअर करण्यास कदापिही विसरू नका.

Trending